प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, हा फुललेल्या पिसार्‍यांचा झब्बू Happy

(मोबाईल फोटोग्राफी)

या लोकांनी बार इतका रेज केलाय की मला आता माझे फोटो टाकवत नाहीयेत. लेक टाहो आणि १७ माईल्स चे बरेच आहेत, पण मी टाकणार नाही. Proud

rmd Happy

या लोकांनी बार इतका रेज केलाय की मला आता माझे फोटो टाकवत नाहीयेत>> +१.
Happy

जिप्स्या पिसारा फुललेला मोर भारीये Happy

IMG_2202_RS.jpg

DSC05160.JPG

Pages