(कृती लिहून लेख संपादित केला आहे)
दोन दिवसांपूर्वी विमुक्त ह्यांनी प्रकाशित केलेल्या धाग्यावरची त्यांनी बनवलेली गणेशमूर्ती खूप आवडली. ती पाहून आपणही गणेशमूर्ती बनवूया अशी अतीव इच्छा झाली. इथे शाडूची माती मिळत नाही. मग घरातील वस्तूंपासून गणेशमूर्ती बनवायचं क्राफ्ट करायचं ठरलं.
क्राफ्ट करण्यासाठी म्हणून साठवून ठेवलेल्या वस्तूंमधून आमच्या गणेशमूर्तीने घेतलेला आकार...
जवळून...
वापरलेल्या वस्तू...
डिटेलात कृती...
१. बिस्कीटच्या पॅकच्या आत प्लॅस्टिकचे बॉक्स असतात (वरच्या चित्रातील केशरी रंगाचा बॉक्स आहे तसला) त्यातल्या एकाला (रद्दीतल्या) कागदी पट्ट्या चिकटवून बळकटी दिली.
२. कॉर्न फ्लेक्सच्या बॉक्सची एक बाजू कापून त्याचा उपयोग बाप्पांच्या पाठीसाठी केला.
३. ह्या पाठीवर बाप्पांचं पोट, चेहरा आणि मांड्या बसवून घेतल्या.
पोट - जेम्सच्या गोळ्यांचा गोल डब्बा येतो त्याचा अर्धा भाग
चेहरा आणि दोन मांड्या - किन्डर जॉयचे वरचे अंडाकृती भाग
ह्याच्यातही रद्दीच्या कागदांचे तुकडे भरून मग पुठ्ठ्यावर चिकटवून घेतले. चिकटवण्याआधी सगळ्यांवर कागदाच्या पट्ट्या लावून बळकटी दिली होती.
४. डोळ्यात घालायच्या औषधाच्या रिकाम्या खोक्याला क्रेपचा कागद लावून तो बाप्पांना पाय टेकवायला चौरंग म्हणून वापरला.
५. बाप्पांचे हात आणि सोंड बनवण्यासाठी प्ले-डो (क्ले) वापरला.
(हट्टाने रंगवताना लेकाच्या हातून सोंड थोडी खाली ओघळलीये. पण नंतर पूर्ण बाप्पा बघण्याची घाई झाली म्हणून ती दुरुस्त करायला नकार आला.)
६. सर्व चिकटवून झाल्यावर आधी मिल्कपेंटचा एक थर लावला. त्यावर नंतर पीतांबरासाठी अॅक्रिलिक रंग लावला.
७. नुसत्या कागदाचा मुकुट नीट बसत नव्हता. शॉवर जेलच्या बाटलीचं झाकण (चित्रात पोपटी रंगाचं दिसतंय ते) बाप्पांच्या डोक्यावर नीट बसत होतं. मग त्यावरच पाठीतून उरलेल्या कार्डबोर्डने मुकुटाचा आकार चिकटवला. वरून सोनेरी कागद चिकटवला. मुकुटाचे आणि गळ्यातील कंठीचे हिरे रंगवण्यासाठी नेलपेंटस वापरले. कान, पाशांकुश कार्डबोर्डचे बनवले.
८. शेला बनवण्यासाठी निळ्या रंगाचा क्रेप पेपर वापरला. त्यावर सोनेरी ग्लिटर.
(फोटो स्पष्ट आला नाहीये, वास्तवातला शेला खूप गोडु दिसतोय. लेक येता-जाता हळूच त्याला हात लावतोय स्मित)
९. जानवं रंगवण्यासाठी पांढरा अॅक्रिलिक रंग वापरलाय.
१०. कमरेचा सर्प नेलपेंटने रंगवून त्याचा फणा क्लेने बनवलाय.
११. डोळे रंगवण्यासाठी काळा मार्कर आणि रंगीत पेन्सिल्स वापरल्या आहेत.
१२. लाल फूल क्रेपच्या कागदाने आणि दात, लाडू, उंदीरमामा क्लेने बनवले आहेत.
गणपती बाप्पा मोरया !!
(ह्या मूर्तीची स्थापना/प्राणप्रतिष्ठा केलेली नाही.)
गणपतीचे दात, उंदीरमामा,
गणपतीचे दात, उंदीरमामा, लाडवांचं ताट आणि लाडू हे लेकाने बनवलंय. बाकी कामातही लुडबुड होतीच. पण एवढ्या गोष्टी पूर्णपणे स्वतःच्या कल्पनेने...
मस्त दिसत आहेत बाप्पा!
मस्त दिसत आहेत बाप्पा! कोणत्या वस्तू वापरल्यात हेही लिही ना.
सुंदर झालाय बाप्पा... पुढच्या
सुंदर झालाय बाप्पा...
पुढच्या वर्षी स्वतः पूर्ण बनवणार आहे तो ! प्रॉमिस !!
शैलजा, वापरलेल्या वस्तूंचा
शैलजा, वापरलेल्या वस्तूंचा फोटो टाकलाय गं.
अगदी अगदी दिनेशदा.
छान
छान
मस्तच गं!
मस्तच गं!
छानच ग.
छानच ग.
सुरेख!
सुरेख!
सुंदर झालेत बाप्पा, रुणु हौशी
सुंदर झालेत बाप्पा, रुणु हौशी आहेस
मस्तच. एकदम भारी.
मस्तच. एकदम भारी.
sunder
sunder
sunder
sunder
फार सुरेख! नेमक्या कुठल्या
फार सुरेख! नेमक्या कुठल्या वस्तू वापरून मूर्ती कशी तयार केली ते पण लिहा.
मस्तच आहे मूर्ती. रुणु,
मस्तच आहे मूर्ती. रुणु, तुझ्या अवलोकनात तुझ्या लेकाचा फोटो आहे ना, तसेच दिसतायत गणपतीचे डोळे.
मस्त नेमक्या कुठल्या वस्तू
मस्त
नेमक्या कुठल्या वस्तू वापरून मूर्ती कशी तयार केली ते पण लिहा. >>> +१
मस्त!!!
मस्त!!!
भारीच! मस्त आयडिया आणि मस्त
भारीच! मस्त आयडिया आणि मस्त बाप्पा
लेकाची लुडबुड एकदम सुबक आहे
मस्तच!
मस्तच!
मस्त!
मस्त!
मस्त रुणू!
मस्त रुणू!
मस्त आहेत गणपती बप्पा
मस्त आहेत गणपती बप्पा
मस्त झालीये मूर्ती. कोणत्या
मस्त झालीये मूर्ती. कोणत्या वस्तूंपासून कसं काय बनवलं हे लिहिणं गरजेचं आहे.
रुणू तुझं आणी तुझ्या लेकाचं
रुणू तुझं आणी तुझ्या लेकाचं अपरंपार कौतुक वाटलं..
खूपच सुरेख तयार झालाय गणपती बाप्पा..
दिनेश दा +१००
झकास.
झकास.
धन्यवाद आमच्याकडे काल दिवसभर
धन्यवाद
आमच्याकडे काल दिवसभर येता-जाता गणुच्या मूर्तीजवळ दोनेक मिनिटे थांबून पुन्हा-पुन्हा निरीक्षण करणं चाललंय
डिटेलात कृती लिहिते.
१. बिस्कीटच्या पॅकच्या आत प्लॅस्टिकचे बॉक्स असतात (वरच्या चित्रातील केशरी रंगाचा बॉक्स आहे तसला) त्यातल्या एकाला (रद्दीतल्या) कागदी पट्ट्या चिकटवून बळकटी दिली.
२. कॉर्न फ्लेक्सच्या बॉक्सची एक बाजू कापून त्याचा उपयोग बाप्पांच्या पाठीसाठी केला.
३. ह्या पाठीवर बाप्पांचं पोट, चेहरा आणि मांड्या बसवून घेतल्या.
पोट - जेम्सच्या गोळ्यांचा गोल डब्बा येतो त्याचा अर्धा भाग
चेहरा आणि दोन मांड्या - किन्डर जॉयचे वरचे अंडाकृती भाग
ह्याच्यातही रद्दीच्या कागदांचे तुकडे भरून मग पुठ्ठ्यावर चिकटवून घेतले. चिकटवण्याआधी सगळ्यांवर कागदाच्या पट्ट्या लावून बळकटी दिली होती.
४. डोळ्यात घालायच्या औषधाच्या रिकाम्या खोक्याला क्रेपचा कागद लावून तो बाप्पांना पाय टेकवायला चौरंग म्हणून वापरला.
५. बाप्पांचे हात आणि सोंड बनवण्यासाठी प्ले-डो (क्ले) वापरला.
(हट्टाने रंगवताना लेकाच्या हातून सोंड थोडी खाली ओघळलीये. पण नंतर पूर्ण बाप्पा बघण्याची घाई झाली म्हणून ती दुरुस्त करायला नकार आला.)
६. सर्व चिकटवून झाल्यावर आधी मिल्कपेंटचा एक थर लावला. त्यावर नंतर पीतांबरासाठी अॅक्रिलिक रंग लावला.
७. नुसत्या कागदाचा मुकुट नीट बसत नव्हता. शॉवर जेलच्या बाटलीचं झाकण (चित्रात पोपटी रंगाचं दिसतंय ते) बाप्पांच्या डोक्यावर नीट बसत होतं. मग त्यावरच पाठीतून उरलेल्या कार्डबोर्डने मुकुटाचा आकार चिकटवला. वरून सोनेरी कागद चिकटवला. मुकुटाचे आणि गळ्यातील कंठीचे हिरे रंगवण्यासाठी नेलपेंटस वापरले. कान, पाशांकुश कार्डबोर्डचे बनवले.
८. शेला बनवण्यासाठी निळ्या रंगाचा क्रेप पेपर वापरला. त्यावर सोनेरी ग्लिटर.
(फोटो स्पष्ट आला नाहीये, वास्तवातला शेला खूप गोडु दिसतोय. लेक येता-जाता हळूच त्याला हात लावतोय :))
९. जानवं रंगवण्यासाठी पांढरा अॅक्रिलिक रंग वापरलाय.
१०. कमरेचा सर्प नेलपेंटने रंगवून त्याचा फणा क्लेने बनवलाय.
११. डोळे रंगवण्यासाठी काळा मार्कर आणि रंगीत पेन्सिल्स वापरल्या आहेत.
१२. लाल फूल क्रेपच्या कागदाने आणि दात, लाडू, उंदीरमामा क्लेने बनवले आहेत.
छानय गं रुणू तुमचा
छानय गं रुणू तुमचा बाप्प्पा!!
आवडला खूप
मामी, तुम्ही लिहिलेलं वाचून
मामी, तुम्ही लिहिलेलं वाचून अवलोकनात जाऊन पुन्हा फोटो बघून आले पटलं.
मस्तच झालेत बाप्प ! रुणू, तू
मस्तच झालेत बाप्प !
रुणू, तू लेकाला पुर्वी 'राम' पण बनवलं होतंस ना? तुझी ती राम जन्माला घालायची झटापट पण आठवतेय
वा !! मस्त खुप छान झाला आहे
वा !! मस्त खुप छान झाला आहे गणपती. तुझ्या कल्पकतेची खंरच कमाल आहे. तुझ्या सारखाच तुझा लेक. आतापासुन तुझ्या पावलावर पाउल टाकतो आहे. किती वर्षाचा आहे?
मस्तच कल्पना रुणुझुणु !
मस्तच कल्पना रुणुझुणु !
Pages