सूरमाय - ओळख

Submitted by संयोजक on 14 September, 2012 - 13:52

मायबोली शीर्षकगीताच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मायबोलीकरांचा, त्यांच्या सहभागी कुटूंबियांचा सूरेल प्रवास पुढे चालू रहावा या विचारातून 'सूरमाय' हा संगीत गृप फेब्रुवारी २०१२ मध्ये स्थापन केला गेला. मायबोलीकर आणि सप्तसूर यांचे मिश्रण खेरीज सप्तसूर हेच माय बाप असे मानणारा समूह या अर्थी- 'सूरमाय'

निव्वळ गीत, संगीत, निर्मीती वा गायन एव्हढेच ध्येय न ठेवता त्या मागील निर्मीती प्रक्रिया, अनुभव, विचार इतरांसमोर मांडणे, त्याच बरोबर टीका, चिकित्सा, सुधारणा आणि एकंदर तंत्र, तंत्रप्रणाली, इ. सर्व देवाण घेवाण करणे आणि एकमेकांच्या अनुभव, ज्ञानातून अधिक शिकवण घेत संगीत प्रवास सुरू ठेवणे अशी अनेक उद्दीष्टे यात समाविष्ट आहेत.

त्या अनुशंगाने सूरमाय मध्ये एखाद्याने गीत लिहीणे, दुसर्‍याने त्याला चाल देणे, अजून कुणीतरी त्याला संगीतबध्द करणे व दुसर्‍या एखाद्या सदस्याने ते गीत गाणे अशी एक सामूहिक निर्मीती देखील होते. आणि ठराविक महिन्याला वा काही निमित्ताने रोटेशन तत्वावर हे काम सुरूच रहाते. थोडक्यात, एक "फ्री फोरम" ज्यामध्ये तुमच्यातील प्रतिभेला कसलेही बंधन नाही. त्यामुळे निव्वळ ताल सूर अशा काटेकोर चौकटीत वा तराजूत त्या निर्मीतीचे मूल्यमापन न करता एकंदर सर्व प्रक्रियेतून झालेले मूल्यवर्धन (व्हॅल्यू अ‍ॅडीशन), प्रयोगशीलता, गुण संवर्धन याला अधिक मह्त्व दिले जाते.

मायबोली गणेशोत्सव २०१२ मध्ये सूरमाय च्या सदस्यांनी निर्मीती केलेली गीते सर्व मायबोलीकरांसमोर प्रकाशित करण्याची संधी दिल्याबद्दल संयोजक व मायबोली व्यवस्थापन यांचे सर्व सूरमाय सदस्यांच्या वतीने अनेक आभार. त्याच बरोबर सर्व मायबोलीकर नेहेमीप्रमाणे या निर्मीतीचे स्वागत करतील व आपले अभिप्राय, टीका, कौतुक, याद्वारे सूरमाय ला प्रोत्साहन देतील अशी आशा व विनंती आहे.

सूरमाय च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार इथे प्रकाशीत केल्या जाणार्‍या प्रत्येक गीताबरोबर कवी, संगीतकार, संगीत संयोजक, मुख्य गायक यांचे निवेदन/मनोगत देखील प्रकाशीत केले जाईल. जेणेकरून सूरमाय मधील सदस्यां प्रमाणेच, इतर वाचक व श्रोत्यांना त्या निर्मीतीमागील एक सर्वांगीण अनुभव मिळावा हा उद्देश काही प्रमाणात साध्य होईल.

शेवटी, सूरमाय चा उद्देश प्रसिध्दी हा नसून वैयक्तीक व एकंदर गृप ची सांगीतिक वाटचाल कायम सुरेल रहावी यासाठी प्रयत्नशील रहाणे हाच आहे. त्यामुळे गीत संगीत या विषयी कळकळ व ध्यास असलेल्या व त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायची तयारी असलेल्या सर्वांचेच सूरमाय गृप मध्ये स्वागत आहे. तसेच, जोडीला गीत संगीतातील थोडा पूर्वानुभव, थोडे प्राथमिक ज्ञान हेही आवश्यक आहेच. सूरमाय मधील सदस्य हे जगभरातील वेगळ्या भागात असल्याने सूरमायचे बरेचसे काम हे आंतरजालामार्फत होते. त्यामुळे तुमच्याकडे संगणक, आंतरजालाची सुविधा असेल तर उत्तमच, त्यामुळे तुमचा सहभाग अधिक सुकर होईल.

तेव्हा 'सूरमायकर्स' व्हायचे असेल तर सूरमाय मधील मायबोलीकर सदस्यांपैकी कुणालाही संपर्क साधावा.

योग
सूरमाय संस्थापक
(सदस्यः अनिताताई, अगो, जयंती, जयश्री, श्यामली, रैना, सई, क्रांति, पद्मजा, सारीका (सौ. योग), दिया, भुंगा, प्रमोद देव, पेशवा, ऊल्हास भिडे, सायबरमिहीर, चैतन्य दिक्षीत, कौशल

गणेशोत्सवासाठी खास गाणी:
सूरमाय (१) - गणा ये
सूरमाय (२) - हे गणेशा श्री गणेशा
सूरमाय (३) - शिवगौरीच्या बाळा
सूरमाय (४) - गजवदना
सूरमाय (५) - तुज शरण गणनाथा

सूरमाय चे फेसबुक पान-
http://www.facebook.com/groups/342120322475708/#!/groups/342120322475708

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक Happy
सूरमाय उपक्रमाअंतर्गत जी गाणी प्रकाशित होत आहेत त्यांची लिंक इथे देत गेल्यास लोकांना पटकन रेफरन्स मिळेल. गाणी शोधावी लागणार नाहीत Happy

मस्त उपक्रम आहे. ओळख छानच करून दिलीत. धन्यवाद, योग. Happy

नाव जरा सामिष वाटतंय. Proud सूरबोली का नाही ठेवलं?

या उपक्रमाला उत्तेजन दिलं म्हणून संयोजकांचे मनापासून आभार.
सामिष नावामुळे तरी संगीताची आवड नसणारे मत्स्यप्रेमी सूरमायकडे आकृष्ट झाले तरी छान होईल!:स्मित:
सुरांचे प्रवासी असलेल्या मायबोलीकरांना आईप्रमाणे प्रोत्साहित करणारी मायबोली म्हणून ''सूरमाय'' हे नाव योग्य वाटतं मामी.

सूरमायचा सदस्य असल्याबद्दल खूप छान वाटतंय.
त्याबद्दल योग आणि सूरमायच्या जुन्या सभासदांचे मनापासून आभार मानतो.
मायबोलीच्या शीर्षकगीतातली 'सहजीच जीवनाचा अविभाज्य भाग झाली' ही ओळ अगदी यथार्थ आहे.
धन्यवाद 'मायबोली' !

गाणी ऐकताना, सुरमाय काय आहे हे विचारणार तितक्यात हा धागा दिसला. छान ओळख करुन दिली आहे. खुप शुभेच्छा.

सूरमाय मध्ये नविन मायबोलीकर्स प्रवेश घेत आहेत व घेऊ ईच्छीत आहेत ही आनंदाची बाब आहे. फक्त त्या फेसबूक लिंक वर प्रवेश अर्ज करताना तुमचा मायबोली आयडी पण दिलात तर संदर्भासाठी बरे पडेल..

आभारी!