मुतखडा

Submitted by अविगा on 10 September, 2012 - 07:52

मला मुतखडा बद्द्ल माहिति हवी आहे! तो कशामुळे होतो?
आयुर्वेदिक उपायाने ८ मि.मि.चा मुत्खडा विरघळु शकतो का?
किंवा ओपरेशनचा साधारण किति खर्च होतो?
कोण्त्या टेस्ट कराव्या लागतात?
माझ्या एका स्त्रि नातेवाइकाला झाला आहे....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या तरी वरच्या उपायाने फोडून घ्या.

मग नियमितपणे पथरीना किंवा सी स्टोन या गोळ्या घेत चला.
दूध, टोंमॅटो, पालक, अळू वगैरे कमी खायचे. मूळा व केळीच्या सोपाची भाजी खायची. पाणी प्यायचे भरपूर आणि
लघवी रोखायची नाही.
मला याच आहारामूळे १९९४ साली त्रास झाला, नंतर या उपायांनी आजवर त्रास नाही.

आठ सेंटिमीटर व्यासाचा असेल तर फार डेंजरस आहे. तडक अ‍ॅलोपाथी स्पेशालिस्ट कडे घेऊन जा. तुम्हाला आठ मिलिमीटर म्हणायचे आहे का? प्रोपर टेस्टिन्ग जरूरी आहे.

८से.मि. >> की ८ मिमी.. ८से.मि. असेल तर हॉरीबल्च आहे.. लगेचच अ‍ॅलोपथी ट्रीट्मेंटच घ्या..

अश्विनी मामी,

हॅट्स ऑफ टू यु !! आपण बरोबर सावध केलत !!!

बाकी इथे डॉक्टरना काय त्याच ८ सें टी की ८ मि मि ?

पेशंटने विचारल, किंवा कोणीही त्यावर पिंक टाकल्या शिवाय कसे रहाणार ?

खडा ८ मिमि असेल..
डॉक्टर कदाचित सिटाल (Cital) नावाचं औषध देतील खडा विरघळावा यासाठी. तो आपोआप नाहीसा नाही झाला तर शस्त्रक्रिया हा उपाय. एका दिवसात घरी जाता येतं.

मुतखडे निर्माण होण्याची कारणे
कमी पाणी पिणे.
जठर व आतड्यांमधून कॅल्शियमचे वाढत्या प्रमाणात शोषण.
कॅल्शियमची गळती असणारे मूत्रपिंड ज्याला Hypercalciurea म्हणतात.
ऑक्सलेटचे वाढत्या प्रमाणात शोषण.
लाल मांसामध्ये आढळणार्‍या प्रथिन पदार्थांच्या घटकांचे सेवन

प्रकार -

कॅल्शियम फॉस्फेट
कॅल्शियम ऑक्सालेट
युरिक ऍसिड
मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट (Struvite)

उत्तम उपाय ३ लिटर पाणी् रोज पिणे , गोक्षुरदी गुगुळ घ्यावे
जर आतड्यात कॅल्शियम चे शोषण होते आहे अशी शंका असेल तर दुधाच पदार्थ आणि इतर कॅल्शियम जास्त असलेले पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे.
जास्त मीठ टाळले पाहिजे, जर खड्यात कॅल्शियम असेल तर सोडियम घेण्याचे प्रमाण वाढून ते कॅल्शियम शरीराबाहेर टाकते.
कॅल्शियम ऑक्सलेट खडे असतील तर हिरव्या पालेभाज्यांसारखे ऑक्सलेट असलेले अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे.

च्च!

चिनुक्स. सिटाल वापरून कधीही खडा विरघळत नाही हो. पण असो.

डांबीस, तुम्ही काय बोललात ते तुम्हाला तरी समजले काय?

(सर्जन) इब्लिस.

३ लि. पाणी पिणे हे तर आहेच. त्याशिवाय चहा, चॉकलेट्स, सोडा (कोक, पेप्सी कोल्डड्रींक्स) हे वर्ज.
काय खावे/ खाउ नये ह्या विषयी अनेक (डॉक्टरेतर) लोकांनी अनेक सल्ले दिले. एकाने सांगितले की बीअर प्यावी त्याने स्टोन डिझॉल्व होतो म्हणे. हा सल्ला त्याला डॉक्टरकडुन मिळालाय म्हणे.
मला फेसबुकवर ही लिंक मिळाली. स्पेशलिटी हॉस्पिटलची लिंक असल्याने आत्तापर्यंत तेच प्रमाण मानले आहे.

एकाने सांगितले की बीअर प्यावी त्याने स्टोन डिझॉल्व होतो म्हणे. हा सल्ला त्याला डॉक्टरकडुन मिळालाय म्हणे>>> Rofl
पिनेवालोंको पिनेका बहाना चाहिये... Happy

मला झाला होता त्रास. लयी वाइट्ट राव.
डॉ सल्ला घ्यावा. झाडपाला, आयुरवेदीक, होमिओपथीक जे करायच ते करा पण आधी अ‍ॅलोपथी डॉ कडे जाउन उपचार करा. एका डॉ च पटल नाही तर सेकंड ओपीनियन घ्या.

१० मीमी पेक्षा कमी व्यासाचा स्टोन किडनीतून पेल्विस -- मूत्रवाहिनी---- मूत्रनलिका---- याद्वारे उत्सर्जित होउ शकतो.... या साठी हायड्रोथेरपी देण्यात येते............म्हणजे सलाईनद्वारे शरीर हायड्रेट केले जाते आणि मूत्रविसर्जन वेगाने व्हावे म्हणून डाययुरेटीक्स दिले जाते की ज्याद्वारे मुतखडा उत्सर्जित होउ शकेल... अर्थात हे सर्व अ‍ॅडमिट होउनच करावे.

या खेरिज भरपूर पाणी घेणे....... खाण्यापीण्याच्या सवयी चांगल्या असणे ...पोटात दुखू लागल्यास डॉक्टरकडे तात्काळ जाणे वगैरे काळजी घेतल्यास ह्या आजाराचा प्रतिबांध करता येतो.

इब्लिस,

सिटाल अल्कलायझिंग एजंट आहे. डायसोडियम हायड्रोजन सायट्रेट. त्यामुळे सिस्टिन / कॅल्शियम ऑक्झलेट / युरिक अ‍ॅसिड विरघळणार नाही?

ज्ञानेश,

खडा विरघळवण्याच्या प्रक्रियेला 'केमोलिसिस' असं म्हणतात. ती 'रम्य कल्पना' नक्की नव्हे. बीएमजेमध्ये ढीगभर पेपर सापडतील या विषयावर.

सिटाल हे सिस्टिमिक अल्कलायझर आहे. लघवी चे इन्फेक्शन झाले असता ( युटीआय ) लघवीला होणारी जळजळ सिटालने कमी होते. खडा विरघळणे वगैरे चूक आहे.

कावळा,
जळजळ कमी होते, कारण अ‍ॅसिडिटि कमी होते. यामुळेच पुढे ऑक्झलेट , सिस्टिनचे खडे लहान कणांमध्ये तुटतात, आणि त्यांची वाढ होत नाही. अल्कलायझिंग एजंटमुळे खडे विरघळून बाहेर पडले, आणि शस्त्रक्रियेची गरज राहिली नाही, अशी उदाहरणं अनेक सापडतील.

@चिनुक्स-
केमोलिसिस होण्यासाठी सरळ त्या जागी औषधे देतात. (युरेथ्रा- मूत्रवाहिनीतून.) तोंडावाटे घेतलेल्या (सिटालसारख्या) औषधांनी खडे विरघळण्यावर काही रिसर्च पेपर्स आहेत का? वाचायला आवडेल.

surechemवर पेपर शोधतो..पण ही विकीवरची माहिती -
The mainstay for medical management of uric acid stones is alkalinization (increasing the pH) of the urine. Uric acid stones are among the few types amenable to dissolution therapy, referred to as chemolysis. Chemolysis is usually achieved through the use of oral medications, although in some cases, intravenous agents or even instillation of certain irrigating agents directly onto the stone can be performed, using antegrade nephrostomy or retrograde ureteral catheters.[18] Acetazolamide (Diamox) is a medication that alkalinizes the urine. In addition to acetazolamide or as an alternative, certain dietary supplements are available that produce a similar alkalinization of the urine. These include sodium bicarbonate, potassium citrate, magnesium citrate, and Bicitra (a combination of citric acid monohydrate and sodium citrate dihydrate). Aside from alkalinization of the urine, these supplements have the added advantage of increasing the urinary citrate level, which helps to reduce the aggregation of calcium oxalate stones

हो, ती माहिती मीसुद्धा वाचली. युरिक अअ‍ॅसिड स्टोन्सबद्दल काही प्रमाणात ते लागू पडते. पण प्रत्यक्ष अनुभव बराच वेगळा आहे. ओरल मेडिकेशन्सनी स्टोन्स विरघळवणे फार क्वचित घडते. जनरली असे होत नाही, असा माझा अनुभव आहे. स्टोनच्या प्रकार / साईज /जागा यावरही ते अवलंबून असते. सिटालचा वापर युरिन अल्कलायजर म्हणूनच केला जातो.

असो.
माहितीबद्दल आभार !

माझा अनुभव बरोब्बर उलटा. ही औषधं तमाम मूत्रविकारतज्ज्ञ देतात, आणि त्याचा फायदा झालेला बघितलेला आहे.

वरची माहिती फक्त युरिक अ‍ॅसिडलाच नव्हे, तर कॅल्शियम ऑक्झलेट आणि सिस्टिन यांनाही लागू पडते.
गेली अनेक वर्षं बायोमिनरलायझेशनवर मी काम करतोय. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्झलेट यांचे क्रिस्टल प्रयोगशाळेत वेगवेगळ्या मॉर्फोलॉजीचे तयार करणं, हा उद्देश. सिट्रेट वापरून तयार केलेलं नॅनोसोनं हे टेम्प्लेट म्हणून वापरल्यास, आणि pHमध्ये फेरफार केल्यास, सिट्रेट वापरल्यास क्रिस्टल तयार होण्याची प्रक्रिया कशी बदलते, हे अनेक प्रयोगांमधून बघितलं आहे. त्यामुळे सिट्रेटच्या वापरामुळे सिस्टिन / ऑक्झलेट यांच्या सायट्रेटचा होणारा परिणाम अमान्य करता येणं शक्य नाही.

सिटालचा वापर युरिन अल्कलायजर म्हणूनच केला जातो.

हो.

इन विट्रो स्टोन डिसॉल्व होईलही. पण इन विवो हाच इफेक्ट मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे एवढा मोठा खडा विरघळायला सिटाल हे प्रायमरी मेडिकेशन ठरु शकन नाही.

अर्थातच..सरसकट अल्कलायझर कसं देता येईल? खडा कुठे, आणि कसा आहे, ते बघायला लागेलच. पण 'खडा विरघळतच नाही', आणि 'सायट्रेटचा उपयोगच नस्तओ' हे आल्यामुळे पुढचं लिहावं लागलं.

'खडा विरघळतच नाही' हे माझे विधान योग्य त्या इफ्स आणि बट्स सोबत हवे होते. ते नुसतेच लिहिले गेल्याने ते विधान मी मागे घेतो. Happy

माझा स्वतःचा अनुभव ज्ञानेशसारखाच, सलाईनच्या सहा बाटल्या आणि डाययुरेटिक्स चा फायदा झाला नाही. ३ दिवस अ‍ॅडमिट होतो. गोक्षुरादी गुग्गुळ आणि पथरिनानेच फायदा झाला.
नंतर एकदा प्राथमिक लक्षणानेच अंदाज आला आणि वरील औषधे घेऊन फायदा झाला.

स्त्री आणि पुरुष, यांच्या ट्रिटमेंटमधे फरक असू शकेल. खरे तर स्त्रियांना हा त्रास व्हायचे प्रमाण कमी आहे, असेही
वाचले होते.

आहारात चिंच पण नेहमी असावी. त्याने फायदा होतो.

प्रतिसादाब्द्द्ल धन्यवाद......
८ मिमिच चुकुन सेंमि टाइप केल
आयुर्वेदिक उपायाने काहि फाय्दा आहे का? खडा पुर्ण विरघळु शकतो का?????

अमृता, सध्या तरी अलोपथी ट्रीटमेंट घ्या. मग काळजी म्हणून वरील उपाय करा.

वर लिहिलेल्या गोळ्यांनी मला तरी नक्कीच फायदा झाला होता.

बियरचा सल्ला मलाही मिळाला होता, मी मानला नाही.

झकासराव महागुरुंनी बरोबर सांगीतले आहे. कारण बीअरमुळे लघवीला साफ होते, त्यातुन बरेचसे क्षार निघुन जातात. अर्थात, हा उपाय डॉ. नी सांगीतल्याशिवाय करु नये, कारण मग बीअर औषधाच्या नावाखाली जास्तच प्यायली जाईल. ( तुमची ही शक्यता चुकीची नाही )

पाणी भरपूर पिणे, ज्युस, सूप वगैरे लिक्विड पदार्थ आहारात असावेत. सिझन नुसार कलिंगड, शहाळे जरुर घ्यावे.

इब्लिस गोक्षुरादी गुग्गुळ बरोबर आहे, त्याने लहान खडे विरघळतात. माझ्या चुलतभावाचाच अनूभव आहे हा. मात्र मोठा खड्याला ऑपरेशनशिवाय काहीच पर्याय नाही.

माझी नातेवाईक उद्या आयुरवेदिक डॉ.कडे जाणार आहे.
D.Y.PATIL HOSPITAL (नवि मुबंई)ची २५ तारिख घेतली आहे
तोपर्यंत तिला फरक जाणवेल का?
आयुरवेदिक उपचाराने साधारण किति दिवसात फरक जाणवेल??
आयुरवेदिक औषध साधारण र्किति काळ घ्यावि लागतिल?
पण तिने कोणत्या प्रकारचे मासे खाउ नयेत अस तुम्हि सुचवाल???
किंवा इतर काहि माहिति ज्यामुळे तिला सध्या त्रास कमी होइल...

Pages