लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.

तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...

विनय

तुमच्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढा खर्च येतो आता? :चक्कर आलेली बाहुली:

फुलं - १० लाख???????
अल्बम - ७५००० रुपये?????
आमंत्रण पत्रिका - रु.१०० ते ५००० प्रत्येकी??????? इमेल्स पाठवा इमेल्स. किंवा प्रत्यक्ष जाऊन अक्षत हातावर ठेवा... ते स्वस्त पडेल.

सोनं धरु नका रे यात. ते तुम्ही किती नवरा नवरीला घ्यात त्यावर आहे. तोळ्याचा भावच भयानक आहे. बाकी नुसता लग्न लावण्याचा खर्च पण अफाटच दिसतोय!

लग्नासारख्या पवित्र बंधनासाठी डिजे, आंतरराष्ट्रीय पद्धतीचे मेनू, बुफे मध्ये पाणीपुरी, दहीवडे सारखे पदार्थ हवेतच कशाला? मराठी असतील तर नेहेमीचे जेवण फार तर बरोबर आईस्क्रीम वगैरे ठीक. पण बुफे म्हंटले की अन्नाचा अक्षरशः खूप चुराडा करतात, वर झंपीने बरोबर लिहीलेय.

फुलांची सजावट ही थोडक्यात करता येते. पुण्यात आता ताटाचे दर १२० रु. च्या वर गेलेत. तरीही चौकशी कराच.

आता बंगलोर तर महानगर त्यामुळे रेट अव्वाच्या सव्वा असणारच. पण फुले, डिजे अशी उधळपट्टी टाळुन लग्न उत्तम करता येईल.

हे डीजेचे काय नवीन खुळ आहे? डीजेचे लग्नात काय काम.. काय करतो तो/ती? (का मलाच हल्लीचा नवीन ट्रेंड माहित नाही?)

धागा वाहता दिसतोय.
असा खर्च असतो यात नवल वाटण्याचे दिवस नाहीत. मध्यमवर्गीयत्वाच्या व्याख्या बदलल्यात. ७ आकडी वार्षिक पगार घेणारे वधूवर आणि त्यांचे मातापिता यांना हे खर्च परवडतात, त्यात काही वावगेही वाटत नाही.
धाग्यात उल्लेख केलेला लग्न-समारंभ तीन दिवसांचा होता, यातच काय ते आले.
जेवणाचे ताट? अशानं तुम्हाला मागासवर्गीय म्हणतील. जगाच्या पाठीवरील प्रत्येक खाद्यसंस्कृतीची नोंद व्हायलाच हवी.
ही आमंत्रणपत्रिकेची झलक : http://www.indianweddingcard.in/RP0734.html

हे सगळे मला फार रिलेटिव्ह वाटते. नक्की काय म्हणजे साधे आणि नक्की काय केले म्हणजे खूळ / आचरटपणा / अवाजवी बडेजाव हे आपण कसे ठरवणार ? एखद्याची असेल सहज तेवढी खर्च करण्याची कुवत, हौस तर त्यांना आपण लेबले का लावायची?
डीजे, संगीत पार्टी वगैरे मराठी लग्नात पूर्वी नव्हते हे खरे पण ते असले, तर काहींना ते चूक वाटेल, मला काही चूक वाटत नाही, साउंदडस लाइक फन , सो व्हाय नॉट Happy आमच्या आत्या, दोन चुलत सासूबाई इ. मंडळींना लग्नात ब्यूटी पार्लर, मेहेंदी हे पण "अतिच/ वायफळ" वाटले होते आणि मला ते लग्नातल्या मुंडावळ्या- हारांपेक्षाही जीवनावश्यक Wink ... थोडक्यात काय तर ज्याचा त्याचा ऐपत अन हौसेचा प्रश्न आहे.

मैत्रेयी +१
लग्न हा आयुष्यात "सहसा" एकदाच होणारा महत्वाचा इवेंट आहे. तो अविस्मरणीय असावा यासाठी सगळेच वेगवेगळ्या प्रकारे झटतात. प्रत्येकाची आर्थिक कुवत अन आवड वेगळी. शिवाय कशाप्रकारच्या लोकांत उठबस आहे तेही वेगळे. त्यामुळे कुणाला नावं ठेवण्यात पॉइंट नाही. कायदेशीर मार्गानी मिळवलेला पैसा कसा खर्च करावा, हे ठरवण्याचा प्रत्येकाला हक्क आहेच.
"आचरटपणा आहे" इतकं जजमेंटल व्हायची काय गरज? तुम्हाला नाही पटत, करु नका. अशा प्रकारची लग्न करणार्‍यांनी तुम्हाला इतकं फटकन जज केलं तर चालेल का?

हा धागा 'वाहता' करण्याचे प्रयोजन समजले नाही. कुटुंबपद्धती रितीरिवाज आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असलेला हा विषय असून त्यावरील मते तसेच माहीती नावीन्यपूर्ण तर आहेच शिवाय त्यामुळे एक दिशाही दिसते.

ज्याच्याकडे आहे त्याने पैसा खर्च नाही केला तर इकॉनोमी कशी चालणार तुमची? तो पैसा फुलवाल्या आणी केटरिन्ग धंदावाल्याकडे गेला, जाउदे ना.

मी स्वतः ही चुक केलीय आज मागे वळुन पाहिलं तर मला आज वाटतं की आपण किती मोठी चुक केलीय. त्यामुळे आज मला पटतयं की हा निव्वळ वेडेपणा आहे.

ह्म्न !

सेव्ह करा सेव्ह !

(अनाहुत सल्ल्याबद्दल क्षमस्व!)

पण तरीही एक प्रांजळ मत.

-सुप्रिया.

सेव्ह करा सेव्ह >>> सुप्रिया हे लग्नात खर्च करण्यासाठी सेव्ह करा म्हणताय की , लग्नात वायफळ खर्च न करता सेव्ह करा म्हणताय ?

लग्नात वायफळ खर्च न करता सेव्ह करा म्हणतेय.

स्वानुभवावरुन सांगतेय हे...

आयुष्यात प्रसंग सांगून येत नाहीत. नि अशा बिकट प्रसंगी पैशाच सोंग करता येत नाही Sad

पैसा नेहमी सन्मार्गी लागावा. Happy

-सुप्रिया.

टिपिकल व उत्तम महाराष्ट्रिय पॅकेज -पुण्यात हे असते खर्च साधारण रु २५००००

Packages:

Marriage package with any one hall
Marriage package with both hall

Each marriage package contains following arrangements
Permissible period of marriage ceremony:-At 8.p.m from previous day till 5.p.m on marriage day.

Simant pujan
Supper(Dinner) for 50 people. MENU: Dal, Rice, Ghee, Common salt, Lemon,chatni,Bundi rayta,One Vegitable, Kadhi or Aamti,Shira(Sweet),puri,Masala supari.
Sleeping arrangemenet with 20 beds.
Hot & cold water for bath for 50 people.
Breakfast for 100 people contains upama/pohe
Total 400 cups of tea or coffee from time to time.
Total 200 Pedhas and rose water, cent, Akshata.
15 coconuts for Grooms honour.
Silver dinner set for couple.
Live band and recorded shahanai for the marriage.
Lunch for 100 people following the marriage.
MENU: Dal, Rice, Masale Bhat, Ghee, Commonsalt, Lemon, chatni, salad, pakoda or bhaji, potato vegetables, mataki usal, liquid vegetable or soup, puri, jilebi, mattha, masala supari.

Existed rates for food will be charged.
Service tax 12.36% on hall rent and catering services.
No outside food will be allowed.
No consumption of alcohol and non-veg.in the premises of the karyalaya.
Firework is prohibited.
Rules,regulations,conditions of the marriage hall are binding to the booking party.

अरे आपण कुठल्या कुठे चाललोय...
डिजे: असावा की नसावा हा प्रश्न नाही. मुलगा उत्तरभारतीय आहे. त्यांच्यात नाचतात. म्हणून हवा. प्रश्न असा होता की, 'एक मनुष्य बाजारात असलेल्या म्युसिक Cd वापरून, सहा तास गाणी वाजवणार. (DJ लोक स्वतः Compose करत नाहीत, बिडी जलायले, पौआ चढाके अशी सर्वसामान्याना कळतील अशी गाणी वाजवतात). त्यासाठी तो ८ ते १० हजार डॉलर मागतोय.

पेट्रोल किती महाग आहे तेही मला माहीत आहे. मला २५० रुपयात कुणी DJ व्हावे असे वाटत नाही. पण दुसर्‍याची गाणी वाजवण्यासाठी सध्या लोक एवढे पैसे देतात की कसे , हा प्रश्न.

Video camera, Editing software, Laptop इत्यादी घेऊन कुणी Marriage DVD काढायला दिली तर त्यासाठी भारतात ७/८ हजार डॉलर सहज कमावता येतात, हे खरं आहे का? (मी पण धंदा तिकडेच काढेन म्हणतो Happy एवढे पैसे कमवायला महिनाभर काम करावे लागते बहुतेकांना. भारतात ६ तास recording आणि अजून ५/६ तास Editing ला छानच पैसे मिळतात असे मला वाटले, हे खरं असेल तर...

धागा वाहता का? चुकून.. मला माहित नाही म्हणून.. बघतो प्रयत्न करून.

परदेसाई
>>तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा.>>"
मी तुमच्या या प्र्श्नाचे उत्तर दिले आहे.

रेव्यू धन्यवाद..
पण तुम्ही देलेल्या पॅकेजमधे DJ, Video, Photo वगैरे दिसत नाही. एकंदरीत Package बघता हा खर्च अजून ४०/५० हजार होईल असं वाटतं...

तुम्ही आधी टाकली असेल माहिती तर ती वाहून गेली असावी. मला हा धागा न - वाहता कसा करावा हे कळत नाहीय. .. क्षमस्व...

विनय

दुसर्‍याने म्हटलेली गाणी वाजवून नाचायला ५० ००० कशाला ???? Proud स्वतःच नाचा.

स्वस्तात हवे असेल तर बँडवाले आणा .... दोन हजार जास्त दिलेत की घोडाही येईल ... अधिक माहितीसाठी लिंबु भाऊना विचारा .. ते लग्नात भटजीपेक्षा घोड्याला जास्त पैसे मिळतात, असे कुठल्या तरी धाग्यावर म्हणत होते...

इथे काही श्रीमंत लोकांच्या भावना दुखावलेल्या दिसत आहेत. मी मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या लग्नाच्या संदर्भात बोलत होतो. डीजे ठेवणे हा नवा आणि आवश्यक ट्रेंड दिसतोय. I am really out of touch! अर्थातच ज्यांच्याकडे भरपुर पैसा आहे त्यानी अवश्य हवा तसा आणि हवा तेवढा पैसा खर्च करावा. लोकांची पर्वा कशाला करायची?

असा मी असामीत जसा "कडक" या शब्दाचा अर्थ बदलत बदलत "नरम आणि चांगला" असा झाला आहे तसा "Extravagance" या शब्दाचा अर्थ बदलत बदलत "Necessity" झालाय याचा मला पत्ताच नव्हता. Happy

pardesai, to dj far jast expensive aahe. 10k pasun miltat. To kadachit kuni special asel ( jya arthi hyd hun bolavlay specially) .. Lagnachya album ani video la sadharan 50k pasun suruvat hote. He agadi recent numbers ahet.

pardesai, to dj far jast expensive aahe. 10k pasun miltat. To kadachit kuni special asel ( jya arthi hyd hun bolavlay specially) .. Lagnachya album ani video la sadharan 50k pasun suruvat hote. He agadi recent numbers ahet.

पण मी काय म्हणते दुसर्‍याची असो वा स्वतःची जोपर्यंत हवे तेव्हढे पैसे मिळत आहेत तोपर्यंत का नाही मिळवायचे त्यानींही पैसे .. धंदा आहे .. किती पैसे मागितले जातात आणि किती मागणी आहे ही तर मार्केट इकॉनॉमी च ना? Happy

सशल, हे मला उद्देशून आहे का? असेल तर आय अ‍ॅग्री. फक्त त्याहून कमीमध्ये मिळतात एवढंच सांगायचा प्रयत्न. आणि अर्थातच तो तेवढा चार्ज करतोय म्हणजे he must be worth it, who knows?

मनस्मी, ते श्रीमंत वगैरे मला उद्देशून आहे का? असेल तर: मी श्रीमंत अजून तरी नाही (श्रीमंत असण्यात काही चूक आहे, असं नाही वाटत मला), लॉजिकल मात्र आहे. Happy मिडलक्लास म्हणजे कोण? वार्षिक २लाख उत्पन्न असणारे का १० लाख असणारे का २० लाख असणारे?
तुमच्या नेसेसिटीज या इतरांसाठी extravagance असू शकतात. तुमच्या घरी काम करणार्‍या लोकांस, वॉचमन/ड्रायव्हर इ विचारुन बघा. नसेल तर भाजीवाले/दुधवाले यांना विचारा. ५ लाख एका लग्नावर खर्च करणं तुम्हाला लिमिटमध्ये वाटत असेल, त्यांना नाही वाटणार.
अगदी तस्सच तुम्हाला जो आचरट extravagance वाटतोय तो कुणासाठी आवश्यक असेल. बघा पटतंय का..

नताशा तुलाच असं नाही पण डीजे किती पैसे घेतात गाणी तीही दुसर्‍याची वाजवून त्यावर ..

हे सर्व आपण करायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न .. Happy

मला वाटतं की हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारला गेलाय. आर्थिक स्थितीनुसार कमी उत्पन्न गट, मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग आणि सधन असे ढोबळ गट पाडले तर प्रत्येक गटासाठी एक किमान आणि कमाल खर्चाचा अंदाज देता येऊ शकतो उदा. मध्यमवर्गात दोन लाख खर्च आवश्यकच असेल, पाच-सहा लाखाच्या पुढे गेला तर उधळपट्टी वाटायला लागेल. तोच श्रीमंतांसाठी दहा-बारा लाख आवश्यक असेल, पंचवीसच्या पुढे गेला तर उधळपट्टी वाटेल.
त्या त्या वर्गाच्या ऐपतीनुसार एकच सेवा अति तफावत असलेल्या दरांत मिळू शकते. उदा. फोटोंचे दहाहजारापासून ते पुढे कितीही हजार / लाख होऊ शकतात पण मग दहाहजारांत मिळणारे फोटो बेसिक असतील तर लाखात मिळणारे खूप स्पेशल इफेक्ट्स असलेले, महागडे अल्बम असलेले असतील.
वरच्या उदाहरणात दिलेले रेट्स बरोबर आहेत की चूक हे बघण्यापेक्षा जे रेट्स सांगितले आहेत त्याला साजेशी सेवा तुम्हाला त्या मोबदल्यात मिळणार आहे का त्याची खातरजमा मित्राने करायला हवी. फोटोग्राफर, व्हिडियो, डेकोरेशन करणारे, डिजे ह्या सर्वांचेच आधीचे काम तुम्हाला बघता येऊ शकते. केटरर सुद्धा त्यांच्या एखाद्या लग्नात नेऊन सगळी व्यवस्था कशी असते ते दाखवतात, पदार्थांची टेस्ट देतात. ते प्रत्यक्ष बघून, आधीच्या ग्राहकांशी बोलूनच अंदाज बांधता येऊ शकेल किंमत जस्टीफाईड आहे का त्याबद्दल. उदा. आमच्या नात्यात एकांनी मुलीचे लग्न फारच लॅव्हिश केले. रिसॉर्टवर सगळा समारंभ, मेहेंदी, डिजे, अत्युत्तम डेकोरेशन, अतिशय महागडा फोटोशूट काही म्हणून बाकी ठेवले नाही. त्यांची ऐपत होती, हौस होती. त्यांनी केला खर्च. मात्र त्या लग्नाचे फोटो इतके वेगळेच, सुरेख होते त्यावरुनच समजून येत होते की त्यांना पैशाचा मोबदला पुरेपूर मिळाला आहे Happy

ह्या धाग्यावर अमूक एक बजेट असेल तर तेवढ्या बजेटमध्ये जास्तीतजास्त चांगले कार्य कसे करता येईल त्याबद्दल उत्तम चर्चा होऊ शकेल. खूप जणांना उपयोग होईल अंदाज यायला Happy

सशल, सध्या नाहीये तशी साइट पण माझी बहीण विचारात आहे सुरु करायच्या. जेव्हा केव्हा ती साइट अप होईल, तेव्हा सांगीनच. Happy

उत्तर भारतीय लोकांमध्ये तसेही हे प्रकार महाराष्ट्रीय लोकांपेक्षा जास्त दिखाऊ असतात. त्याची लागण आजकाल आपल्याकडेही झाली आहे हे नाकारून चालणार नाही.
मी लग्न नाही पण मुलाची मुंज केली तेंव्हा भावगीतांचा कार्यक्रम (जावेनेच केला होता म्हणून तिने पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला.) आणि साधी मुंज, मेंदीवाली बांगड्यावाली बै. एकदा तयारीसाठी भारतवारी एकटीने तर नंतर साहजिकच तिघे. कपडे खूप वाईटही नाही आणि उगीच लाखो रुपयांचेही नाहीत. पत्रिका अगदी साधी नाही पण थोडे नक्षीकाम, चमक वगैरे. मुंजीची डिव्हिडी, साधा अल्बम. आधी, नंतर पूजा, स्वयंपाकाची बै आणि कार्याच्या अनुषंगाने येणारे ढीगभर प्रकार असतात त्याचे खर्च. यात खरेदीला तासन् तास गेल्यावर बाहेरची जेवणे धरली नाहियेत. Wink साधारण बारा लाख आला (यात विमानाची तिकिटे आली पण देवदयेने बरीच स्वस्तात मिळाली होती. सोने, चांदी खर्च यात धरलेला नाही, तसाही तो त्या त्यावेळेनुसार बदलतो. मुंजीच्यावेळी सोने २० हजार रु. तोळा होते. यानंतर असे जाणवले की मुंजीच्या दिवशी लोकांनी दागिने कमी घातले होते (जे आजकाल साहजिकच आहे.) पण कपडे आमचे सगळ्यात स्वस्त होते. मुंजीत नेहमीचे जेवण (जसे मुंजीत असते तसेच, पनीरची भाजी नाही. Wink ) असल्याने लोक फारसे खूष नव्हते व अमेरिकेतून आलात ते साधी मुंज करण्याकरताच का? असे जाणवून देण्याचा प्रयत्न होता. भावगीताचा कार्यक्रम असल्याने ( हिंदी फिल्मी गाणी नव्हती) बर्याच नातेवाईकांनी आदल्या दिवसाच्या कार्यक्रमास बुट्टी मारली व जे आले त्यांनी मागच्या खुर्च्या पडून गप्पा मारणे पसंत केले. दीड तास भावगीते ऐकण्याच्या मनस्थितीत नसावेत ते.(इथे डिजेचे महत्व लक्षात घ्या.) Wink संध्याकाळी सहाची वेळ, सहा महिने आधी फोनवरून आमंत्रणे, नंतर पत्रिका अधिक इमेल्स यापैकी कशाचेही कोणास काही वाटले नाही. (फक्त एका कुटुंबाने सांगितले की त्यांनी त्यांची ट्रीप दोन दिवसांनी पुढे ढकलली ते आधी आलेल्या आमंत्रणामुळेच.) लोक साडेआठ वाजेपर्यंत आले, जेवले व गेले. दुसर्‍या दिवशी मुंज झाली.
यात मुलीकडली बाजू नसल्याने तो खर्च धरलेला नाही. एकंदरीतच भारतात लग्न कार्यात 'घरचे' कार्य म्हणून जाणे असे आजकाल फारसे (शहरात) नसल्याने मदतीसाठी माणूस पैसे देऊन उभा करावा लागतो तरी सगळी कामे होतीलच असे नाही. आणखी एक म्हणजे एक कार अठवडाभर रेंट केली होती तिचे १००० रू. रोज.

<'एक मनुष्य बाजारात असलेल्या म्युसिक Cd वापरून, सहा तास गाणी वाजवणार. (DJ लोक स्वतः Compose करत नाहीत, बिडी जलायले, पौआ चढाके अशी सर्वसामान्याना कळतील अशी गाणी वाजवतात). त्यासाठी तो ८ ते १० हजार डॉलर मागतोय.>

DJना ही स्टार व्हॅल्यू असते. काही डीजेज् ची डिमांड असते. म्हणजे त्यांच्या कामाचे स्वरूप 'म्युझिक सिस्टम चालवता येणं' यापेक्षा थोडे वेगळे असावे.
ते वापरत असलेल्या म्युझिक सिस्टमची किंमत आणि वापरण्यासाठीचे भाडे यांचे आकडेही लक्षात घ्यायला हवेत.

Pages