आत्मगंध !

Submitted by राजीव मासरूळकर on 2 September, 2012 - 07:01

आत्मगंध !

स्पर्शातूर स्तनोभार
अधरोदर चुंबकीय
भवाशयी नयन मधूर
वक्रोक्ती भ्रुकूटीय

अर्थवलयी खाणाखुणा
नादात्मी तुझी चाल
रशरशीत बांधा अन्
अमृतरसी तुझे गाल

सालंकृत देह तुझा
सुवर्णमयी जणु गेह
वरवरून शांत नितळ
गुढ गहिरा काळडोह

सोड आता खुळी लाज
हुंदळू दे रूपबंध
जाहलो तुझाच आज
दरवळू दे आत्मगंध !

- राजीव मासरूळकर
मु . पो . मासरूळ
ता . जि . बुलडाणा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानै!!!

कुणीच वाचत नाही >>> लोकं ज्ञानेश्वरीही वाचत नाहीत हल्ली..

आम्ही शब्दारंगी नाचू !>>> क्या ब्बात है... पण शब्दब्रम्हाला "शीला की जवानी" दाखवू नका म्हणजे झालं.