Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 September, 2012 - 05:51
मला भावलेली ए.के.शेख यांची एक गझल.... त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.
घरट्यासाठी झिजतो,कुढतो,मरतो माझा बाप
फुले अम्हाला यावी म्हणुनी रुजतो माझा बाप
भावासंगे भाऊ होतो,ताई संगे ताई
बोल बोबडे त्यांच्याशी बडबडतो माझा बाप
अस्मानी सुलतानी संकट येवो अंगावरती
पाय रोवुनी मुकाबल्याला धजतो माझा बाप
धाय मोकलून रडला जेव्हा आजी सोडुन गेली
जीवनभरचे दु:ख मोकळे करतो माझा बाप
शाळेमध्ये पहिला नंबर येता माझा कधी
उचलुन घेतो, हसतो,गहिवरतो माझा बाप
तळहाताच्या फोडासम जपतो आम्हा सार्यांना
आम्ही असतो वाघ्,सोबती असतो माझा बाप
डोंगर्,झाडे,किरणे,निसर्ग अन गरुडाची शक्ती
सोबत घेउन परिस्थितीशी लढतो माझा बाप
आई म्हणजे आई असते सौख्याची सावली
झाड होऊनी उन्हात वाळत असतो माझा बाप
-- ए.के. शेख
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई म्हणजे आई असते सौख्याची
आई म्हणजे आई असते सौख्याची सावली
झाड होऊनी उन्हात वाळत असतो माझा बाप
अफलातून, हि गझल इथे पोष्ट
अफलातून,
हि गझल इथे पोष्ट केल्याबध्दल खुपच धन्यवाद डॉ. कैलासजी.
छान गझल. सत्य परिस्थितीचे
छान गझल. सत्य परिस्थितीचे वर्णन आहे.
अप्रतिम.......
अप्रतिम.......
ही गझल शेखसाहेबांच्या तोंडुन
ही गझल शेखसाहेबांच्या तोंडुन ऐकण्यात अजुनच मजा येते दादा
धन्यवाद !
मस्त
मस्त
धन्यवाद डॉ. साहेब
धन्यवाद डॉ. साहेब
मला ए.के शेख हे नाव अजून
मला ए.के शेख हे नाव अजून माहित नव्हते आता माहीत झाले
धन्यवाद त्यासाठीही
अप्रतिम.......
अप्रतिम.......