आवलीला मानपत्र..!

Submitted by प्राजु on 27 April, 2009 - 14:26

तुकयाची आवली...
हे मानपत्र ..!!!
माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे.
लेखिकेचे अभिनंदन! आणि शुभेच्छा!!

गुलमोहर: 

सहीच.... अभिनंदन......
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

वरील मानपत्र वाचल्यापासून तसेच सदर कादंबरीचा वेगळा विषय कळल्यापासून आदरणीय लेखिका सौ.मंजुश्री गोखले यांच्याबद्दल आदर वृद्धिंगत झाला. आणि सिद्धहस्त कवयित्री तसेच लेखिका प्राजु या आदरणीय गोखले काकूंच्या कन्या आहेत हे त्यांनी कधीही जाणवू न दिल्यामुळे तर त्यांच्याबद्दलचा आदर शतपटीने वाढला.
मा बो वरील सर्व बंधुभगिनींतर्फे आदरणीय लेखिका सौ. मंजुश्री गोखले यांना मानाचा मुजरा!

क्या बात है! मस्तच!
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

अरे व्वा!! लेखीकेला अभीनंदन आणी प्राजूला ही hats off !!!
मला नेहमी वाटायचं आणी पुन्हा एकदा पटलं की मा. बो वर इतक्या मोठ्या (मनानेही) लोकांच्या लेखनात आपले लेखन वाचले जाते हे आपले भाग्यच!! खरंच प्राजू तुझ्या आईला माझ्याकडुन पर्सनली शतशः नमन!

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

तुझ्या आईचे अभिनंदन ग प्राजु!

----------------------
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे

प्राजु, अभिनंदन, तुझ्या आईचं. केवढं वेगळं व्यक्तिमत्व निवडलं आहे. वाचायला नक्कीच आवडेल ही कादंबरी.

अभिनंदन आणि माझ्याही खूप खूप शुभेच्छा लेखिकेला पूढच्या साहित्यिक प्रवासासाठी!

अभिनंदन.

ही कादंबरी वाचायला आवडेल. मुंबईमधे कुठे मिळेल?
--------------
नंदिनी
--------------

लेखिकेचे अभिनंदन! आणि शुभेच्छा!! <<<
एक गोष्ट कळली नाही. लेखिका का म्हणायचं ? तसं म्हणण्यापेक्षा अभिमानाने ही माझी आई आहे असं म्हटलं असतं तर जास्त छान वाटलं असतं.

प्राजू, आईचा एखादा फोटो इथे देता येईल का ? प्रत्यक्ष नाही भेटता आले तर इथे भेटून आशिर्वाद घेऊ.
भारतात आलो कि पुस्तक घेईनच.

सुमेधा ला अनुमोदन... प्राजु, तुझ्या आईचे शतश: अभिनंदन... आणि तुझे सुद्धा... Happy
मिलिन्दाचं सुद्धा पटलं, लेखिका म्हणण्यापेक्शा, माझी आई हे जास्त अभिमानाचे आहे...

त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टीकोनातून हा अभिनंदनपर धागा चालू केला.
आणि मुलगी आहे म्हणून आईचे कौतुक करणारचं.. अशा अर्थाचा हा धागा होऊ नये म्हणून केवळ.
माझ्या आईचा आभाळाइतका अभिमान आहे मला. ३ मे ला येते आहे माझ्याकडे आई.
प्राजु
http://praaju.blogspot.com/

अभिनन्दन,
माणिक वर्मा- राणी वर्मा ही जोडी आठवली.

प्राजू, मनापासून अभिनंदन, तुझ्या आईचं.

प्राजु, हार्दिक अभिनंदन!!! Happy

प्राजु, तुझ्या आईचे हार्दिक अभिनंदन Happy

प्राजु तुझ्या आईचे हार्दिक अभिनंदन.

खूप छान...प्राजू, मंजूश्रींना माझ्याकडून हार्दिक अभिनंदन सांग गं... माहीत नव्हतं गं हे पुस्तक, नक्की वाचेन आणि दोघींच्या विपू वर पोस्टेन अभिप्राय... अर्थात एवढा मोठ्ठा अबिप्राय मिळाल्यानंतर माझ्या अभिप्रायाची गरज नाहीये खरं तर... पण आवडल्याचं आवर्जून कळवेन... Happy
मंजू, तुमचे कार्य खूप स्तुत्य आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर अभिमानाने मूठभर मांस चढवणारे आहे. पुलेशु. असेच लिहीत राहा... आणि मराठी साहित्याच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवत राहा... Happy

प्राजू धन्यवाद, ही आनंदाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल!

मनापासून हार्दिक अभिनंदन! इतक्या श्रेष्ठ पातळीवरून नुसती दखलच घेतली गेलेली नाही तर स्तुतीपर पत्रही आले आहे. या पत्रामुळे आणखीन एक महत्वाची गोष्टही झाली. राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे पदांवरचे देशनेते हे नागरिकांपासून खूपच दूर असतात हा गैरसमज दूर झाला.

तुक्याची आवली - हा विषय निश्चितच अनोखा व कदाचित हाताळण्यास अत्यंत जिकीरीचा असावा कारण त्यासाठीचे साहित्य उपलब्ध असण्याची शक्यता कमीच! पण हा विषय नुसताच हाताळला नाही तर देशातील सर्वोच्च पातळीवरून त्याची दखल घेतली जाऊन त्याला स्तुतीपर पत्र आले आहे. अर्थातच, लेखन अत्यंत समर्थ असणार हे जाणवतेच आहे.

एक मनापासून अभिनंदन व्यक्त करणे यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही कारण या उपलब्धतेमुळे थक्क झाल्यासारखे झाले आहे.

-'बेफिकीर'!