मण्णी मण्णी, चिव् चिव् चिमणी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2012 - 11:35

मण्णी मण्णी
चिव् चिव् चिमणी

टपटप टिपते
तांदूळ मणी
थेंब थेंब पिते
वाकून पाणी

इकडे तिकडे
बघत म्हणते
आहे का कुणी
मी तर चिमणी

पायावर कशी
थुई थुई नाचते
नाचत म्हणते
चिव् चिव् चिमणी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..... माझ्या मुलाला गाणे ऐकत झोपायला आवडते.... मी नेहमी आपले "निंबोनीच्या झाडाखाली" "बडा नटखट है रे" अशी चित्रपटातील गाणी गाते..... पण तुमच्या बालकवीता छानच असतात..... आता तुमच्या कवितेंना चाल लाउन मुलाला ऐकवीन.... नक्की आवडेल त्याला ( नुसत्या झोपवण्यासाठी नाही , तर त्याला गाणी बोलायला लावायला देखील Happy )