मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by रूनी पॉटर on 30 July, 2012 - 21:55

मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
धन्यवाद.

यंदाचे संयोजक मंडळ खालील प्रमाणे निवडले आहे.
तोषवी, _मधुरा_, शुगोल, स्नेहश्री, युगंधर, चिन्मय_कामत, जाई.साहित्ययात्री
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर नवीनच आहे. पण इथली सगळी चर्चा वाचून स्वयंसेवक व्हायला नक्कीच आवडेल. गणपती मंडळात प्रत्यक्ष काम करण्याचा ३-४ वर्षांचा अनुभव तेवढा आहे. सध्या गृहिणी असले तरी शिक्षणाने आणि आत्तापर्यंत व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे त्यामुळे आर्टिसटिक सेन्स आहे. घरी नेटही आहे. सजावट आणि मुद्रीत्शोधानाचे काम करायला खूप आवडेल.
---इच्छेचा विचार करावा.

Pages