गाथाचित्रशती विषय क्र. १ मला भावलेला शिवाजी वागळे (नाना पाटेकर)

Submitted by स्मितू on 24 August, 2012 - 07:07

मराठी, हिंदी सिनेमे आम्ही चिक्कार बघितले. मला विशेष असे काही क़ळायचे नाही. पण टुकार सिनेमे पाहाण्याची सुद्धा एक वेगळी मजा असते त्या वयात..
मला सिनेमा खुप उशिरा कळायला लागला... पहिले तर आम्ही १ रु टिकिटाने सिनेमे बघितले मला आणि माझ्या बहिणीला सिनेमे बघण्याचे प्रचंड वेड्... मग काय आठवड्यातनं दोन तरी सिनेमे आम्ही मैत्रीणींना सोबत घेऊन बघायचोच. सिनेमांच्या नावांची बरिच मोठी लिस्ट आहे... किती तरी आठवत सुद्धा नाही ..लहानपणी माझ्या आवडत्या नायकांमध्ये मला धर्मेंद्र, अमिताभ्,राजेश खन्ना ह्यांचे सिनेमे फार आवडाय्चे ..नंतर कॉलेज मध्ये गेल्यापासनं अमिर, सलमान खान, शाहरुख आणि सैफ अली खान ह्यांचे सिनेमे बघायची... शाहरुख चे तर आम्ही सगळ्या भावंडानी एका रात्रीत ३ सिनेमे बघितले बघितले... तेही व्हिडिओ घरी आणुन... Happy पण जसा जसा काळ पुढे चालला तसे तसे माझे नायकां बद्दल चे मतपरिवर्तन होत होते, अर्थात धर्मेंद्र, अमिताभ्,राजेश खन्ना ह्यांचे सिनेमे मी आजही बघते. पण माझ्या ह्या आवडत्या नायकांमध्ये एक नांव आवर्जुन सामिल झाले ते म्हणजे विश्वनाथ दिनकर पाटेकर उर्फ नाना पाटेकर नानाचा, तिरंगा मधला शिवाजी वागळे ,किंवा मग यशवंत मधला यशवंत असो... आजही कितीहीवेळा हे सिनेमे टिव्हीवर आले तरी मी बघतेच... क्रांतीवीर, तिरंगा, यशवंत या चित्रपटातील भुमिका फारच दमदार होत्या...
नानाचे ते रक्त गरम करणारे संवाद... वा!! वा!!krantiveer.jpegनाना पाटेकर मराठी रंगभुमी हिंदी/ मराठी चित्रपट सृष्टीतील एक आगळे वेगळे असणारे व्यक्तीमत्व असणारे अभिनेते. तिरंगा मधील त्याच्या त्या एंट्री सोबत ते बॅकग्राऊंड म्युसिक ढ्याssss उं ढ्याssss उं ढ्याssss उं आणि नानच्या चेहर्‍यावरचे ते हावभाव सगळे कसे... जिवंत वाटते... तिरंगा मध्ये त्यांनी एका सच्चा पोलिस इन्सपेक्टर भुमिका साकारली आहे.. tiraga 1.jpeg
जशीजशी मोठे होत होते तसे मग मला कुठला सिनेमा बघावा, कुठला नाही हे कळायला लागले...
माझ्या जीवनातला सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला तो नानाने दिग्दर्शित केलेला प्रहार... प्रहारचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात नायिकेला म्हणजे (माधुरी) काहीही मेकअप न करता सादर केले आहे. आणि थोडासा रुमानी हो जाए... ह्यातिल तो डायलॉग म्हणा की कविता .... फार म्हणजे फारच मनाला भावले

thodasa rumani jaye.jpeg
हां मेरे दोस्त
वही बारिश
वही बारिश जो आसमान से आती है
बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है
कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है
गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है
फिर आगे निकलती है
वही बारिश

ये बारिश अक्सर गीली होती है
इसे पानी भी कहते हैं
उर्दू में आप
मराठी में पानी
तमिळ में तन्नी
कन्नड़ में नीर
बंगला में… जोल केह्ते हैं
संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं
ग्रीक में इसे aqua pura
अंग्रेजी में इसे water
फ्रेंच में औ’
और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है
लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है
हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
इसलिए जब रूह की नदी सूखी हो
और मन का हिरण प्यासा हो
दीमाग में लगी हो आग
और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश.
आणि मग मला नानाचे सिनेमे बघायचे वेडच लागले...
sakhshidar.jpg
नाना पाटेकरांचा माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्याच्या अभिनयामुळे इतका गाजला की त्याची हिंदी आवृती 'फांसी का फंदा ही सुद्धा खुप गाजली. खलनायक कसा मोहरे (१९८७ ) आणि सलाम बॉम्बे (१९८८) ह्या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना हिंदी फिल्म इंड्स्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळाले. १९८९ साली 'परिंदा'

मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.तसेच १९९२ साली 'अंगार' ह्या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. १९९४ साली 'क्रांतिवीर चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा फिल्म्फेअर पुरस्कार मिळाला.

मराठी नायकाने अभिनयाच्या जोरावर हिंन्दी चित्रपट सृष्टीत स्वतःचे असे पक्के स्थान निर्माण केले ह्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले 'नाना पाटेकर ; होय.
नानांना अभिनया व्यतिरिक्त सामाजिक कार्यात सुद्धा रस आहे ,ते बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' आश्रमात जाऊन डॉ. प्रकाश आमटे ह्यांची मदत करतात.
मराठीतले पक पक पकाक,सध्याचा देऊळ किती तरी नावे आहेत ते सगळे सिनेमे काही टॉकिज वर ,तर काही घरी सिडी आणुन बघितले आहे. Happy पक पक पकाक मधील 'भुत्या' च्या व्यक्तीरेखेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे...
नानाचे गाजलेले चित्रपट
प्रहार(दिग्दर्शन) १९९१
गमन १९७८
आज की आवज १९८४
अंकुश १९८६
लॉर्ड माऊंट बॅटन १९८६
माफीचा साक्षीदार १९८६
सुत्रधार १९८७
अंध युद्ध १९८७

साधारण रंग रुप असुनही.. आजच्य सुपरस्टार च्या समवेत नानांचे नांव आदराने घेतले जाते.
नानां नी केवळ एकांगी भुमिका नाही केल्यात .वेलकम आणि ब्लफमास्टर सारख्या सिनेमात त्यांनी विनोदी भुमिका पण चांगल्या रितिने साकारल्या आहे. १९९५ च्या 'राजु बन गया जंटलमॅन मध्ये छोट्याश्या भुमीकेत नाना भाव खाऊन गेले. welcome.jpeg

एक साधसुधं व्यक्तीमत्व... प्रत्यक्षात सुद्धा तसाच जगणारा नाना images_0.jpeg नाना आता शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार आहे असे एकण्यात आले आहे ..त्यांच्या पुढिल कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा Happy
images  nana.jpeg

नानांनी हिंदी चित्रपट सृष्टीला दिलेले गाजलेले सिनेमे.
1978- गमन- वासु

1984- गिद्ध- वीरूपक्षी

1984- आज की आवाज- जगमोहनदास

1986- शीला- डॉक्टर राम-

1986- अंकुश- रवि

1987- सूत्रधार- कुमार

1987- मोहरे- अबुल

1976- अंधा युद्ध-

1987- प्रतिघात- करनवीर

1988- सागर संगम- रामनाथ

1988- सलाम बांबे- बाबा गुलाब

1989- परिंदा- अन्ना

1990- थोड़ा सा रूमानी हो जाए- नटवरलाल

1992- राजू बन गया जेंटलमैन- जय

1992- अंगार- मजिद खान

1994- क्रांतिवीर- प्रताप नारायण

1995- हम दोनों- विशाल

1996- अग्निसाक्षी- विश्वनाथ

1996- खामोशी- जोसेफ

1997- यशवंत- यशवंत

1988- युगपुरूष- अनिरूद्ध

1988- वजूद- मल्हार

1999- हु तू तू- भाऊ

1999- कोहराम- मेजर अजीत आर्या

2000- गैंग- अबुल

2000- तरकीब- जसराज पटेल

2002- वध- डॉक्टर अर्जुन सिंह

2002- शक्ति- नरसिम्हा

2003- भूत- लियाकत कुरैशी

2003-डरना मना है- जॉन

2003- आंच- महादेव ठाकुर

2004- अब तक छप्पन- साधु अगाशे

2005- अपहरण- तबरेज आलम

2005- ब्लफमास्टर- चंद्रू पारिख

2006- टैक्सी नंबर नौ दो ग्यारह- राघव

2006- यात्रा- दशरथ

2007- हैट्रिक- डॉक्टर सत्यजीत

2007- दस कहानियां-

2007- वेलकम- उदय शेट्टी

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
आभार आर्या आणि मंदार जोशी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख स्मितू !
पण ’नाना’बद्दल बोलताना ’पुरुष’चा उल्लेख कसा काय विसरलीस?
जसं डॉ. लागु म्हटलं की नटसम्राट, किरवंत आठवतात, बच्चन म्हटलं शोले आठवतो, गुलजार म्हटलं की इजाजत आणि रेखाचं नाव आलं की 'उमराव जान'ची आठवण होते.
तसं 'नाना'चं नाव आलं की "पुरुष" आठवलंच पाहीजे. त्यामुळेच तर नानाकडे बॉलीवुडचे लक्ष वेधले गेले.
नानाच्या व्यावसायिक रंगभुमीवरील कारकिर्दीबद्दल (इन मिन तीन नाटकं) नानाच्याच शब्दात

विकु...हो अगदी बरोबर आहे... जे विसरले ते सांगायला तुम्ही लोक आहेच... Happy प्रतिसादांवरुन नानां बददल अजुन माहीती मिळेल धन्यवाद Happy

नानाची वेगळी भुमिका थोडासा रुमानी हो जाये मधे पण आहे.

बाकी नानाचे खरे नाव आजच समजले. Thanks स्मितू.

नाना म्हणजे All Time Favourate Happy

धन्यवाद, मयु, नताशा, स्वरुप ... अरे खुप घाईने लिहल्यामुळे बरेच सिनेमे सुटले असणार तरी वाचकांनी आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद... Happy अब तक छप्पन्न मी टिव्हीवर अर्धाच बघितला...

अरेच्च्या काय आहे
<<<<<<<<<<<एका रात्रीत ३ सिनेमे बघितले >>>>>>>>>>>> हे मी आजच्या एका दिवसात तीन वेळा वाचले तेही तीन वेगवेगळ्या लेखात

नाना माझाही आवडता. पण चित्रपटात नानाचा अभिनय स्टाइलिश होत गेला. त्यापुर्वी नाटकात तो भुमिका करत असे.

महासागर हे नाटत दळवींच्या अथांग कादंबरीवर आधारीत होते. त्यात नाना एका विमा एजंटची भुमिका करत असे.
सोबत विक्र्म गोखले, भारती आचरेकर आणि नीना कुलकर्णी असत. हमिदाबाईची कोठी मधे, तो सत्तार ची भुमिका
करत असे. सोबत. विजया मेहता, भारती आचरेकर आणि नीना कुळकर्णी असत. या दोन्ही भुमिका खास होत्या.

पुरुषमधल्या गुलाबरावाने त्याला ओळख मिळवून दिली. पण या नाटकाचे प्रयोग त्याने स्वतःच थांबवले. प्रेक्षाकांनी चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद द्यावा, हे त्याला रुचले नाही.

स्मितू

धन्यवाद या माणसाबद्दल लिहील्याबद्दल. आणि मस्त लिहीलंस.

नानाच्या अभिनयाचा मी पंखाच आहे. आता आहे जरा डोक्याने तिरसट, पण खपवून घेतो ते त्यासाठीच. नाना म्हटलं कि प्रहारचं शेवटचं दृश्य हटकून आठवतं Proud

पुण्यात फर्ग्युसनला असताना इन्सिंकला नाना पाटेकर प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. संध्याकाळी फर्ग्युसनच्या अँफी थिएटरमधे पाहिलेला नाना.. लाईट यलो शर्ट, ब्लू जीन्स... आणि अनुभवलेलं नानाचं भाषण आणि 'थोडासा रुमानी हो जाये' मधले हे संवाद !
घरी आल्यावर अर्थात 'अशक्य जबरी वगैरे वगैरे' भारावलेल्या स्वरात, विचारात कार्यक्रमाचा रिपोर्ट आई-बाबा, बहिणीला देऊन खोलीत झोपायला निघालेली मी... आणि रात्री ११.३० च्या सुमारास घराच्या दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण बरं आलं असेल असं म्हणतच मी दार उघडलं .. आणि दारात खुद्द नाना पाटेकर.. काही तासांपूर्वी अ‍ॅंफी थिएटरच्या व्यासपीठावरून बोलणारा... तोच लाईट यलो शर्ट, ब्लू जीन्स. ....मी अक्षरशः अवाक !!!
पुढे तासभर चहा झाला, गप्पा झाल्या.. मी तिथेच होते.. पण 'संध्याकाळचं भाषण जबरी झालं' यापलीकडे एक शब्दही माझ्या तोंडातून बाहेर पडला नाही, इतकी मी थक्क झाले होते.. आणि स्वप्न तर नाही ना ह्या धक्यात होते.
'थोडासा रुमानी' चा विषय निघाला, त्याबद्दल वाचलं की मला त्या रात्रीचा माझ्या घराच्या दाराच्या लाकडी चौकटीवर, दोन्ही हात ठेवून उभा असलेला आणि 'आहेत का सर?' विचारणारा तो नानाच आठवतो !

rar

जबरी. नानाबरोबर एक तास!!!! पण खरच काय बोलावे सुचणार नाही त्याला समोर पाहिल्यावर Happy

छान लिहलय नाना पाटेकरांबद्दल.

त्यांचा प्रहार आणि अंकुश हे दोन्ही चित्रपट फार आवडतात, वेलकम ह्या सिनेमातील त्यांची 'शेट्टी'ची भुमिका तर जबरदस्त. एक सच्चा अभिनेता.

स्पर्धेसाठी शुभेच्छा..!

<<आणि दारात खुद्द नाना पाटेकर.. काही तासांपूर्वी अ‍ॅंफी थिएटरच्या व्यासपीठावरून बोलणारा...<< शप्पथ्...! काय भारी ना! नाना असा अकस्मात पुढे येउन उभा राहिल्यावर काही सुचणारच नाही.

मस्त लिहिलय स्मितु...! नानाची मी पण चाहती.
गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खुनावर आधारीत 'माफीचा साक्षीदार' मधील नानाने रंगवलेला थंड डोक्याचा 'जक्कल' , अगदी काटा आणतो.

तो सर्वात आवडला तो "खामोशी- द म्युजिकल' मधला मुकबधिर अगतिक बापाच्या भुमिकेत.
अग्निसाक्षीमधला क्रुर नवरा, परिंदामधला आगीला घाबरणारा व्हिलन, अंकुशमधला गुंड या सगळ्या अंगावर येण्यार्‍या भुमिका.
प्रतिघात या चित्रपटाची आवर्जुन आठवण होते. त्यातला वेडा झालेला कॉन्स्टेबल नानाने रंगवला होता. अक्षरशः काही ठिकाणी क्रोधमिश्रीत अगतिकतेने डोळ्यातुन पाणी,तोंडातुन लाळही गळतांना दाखवली होती.

दिनेश दा.. पुरुष बद्दल लिहायचे होते... पण खुप अशी महिती नाही मिळाली ..:स्मित:

किरण.... मी पण पंखा आहे म्हणुनच लिहले..... ह्या स्पर्धेच्या निमीत्ताने... Happy

मी- कोल्हापुरकर तेव्हा सिनेमाची झिंग चढलेली होती Happy (आता कंटाळा येतो). Happy

रार... बाप्रे नाना सोबत १ तास... मला केव्हा येईल असा चान्स Happy

सगळ्यांना धन्यवाद Happy

विजयजी, आर्या धन्यवाद Happy

खुप सिनेमे लेखात नाहीए ... अजुन एक सिनेमाचे नांव मला आठवत नाहीए... ज्यात करिश्मा कपुर , संजिव कपुर सोबत नाना होता... .जबरदस्त काम केले होते त्या सिनेमात त्याने Happy

माझा मुलगाही (वय ८ वर्षे) नानाचा फॅन आहे. पण सुरुवात झाली "वेलकम" पासून Sad त्यातले ते स्पेशल डायलॉग्स....."आलू लेलो", "भगवान दिया सबकुछ है...."वगैरे...मुलाला तो कॉमेडी म्हणुनच माहित झाला.
नंतर मग त्याला तिरंगा , अब तक छ्प्पन वगैरे आवर्जून दाखविले.

>>खुप सिनेमे लेखात नाहीए ... अजुन एक सिनेमाचे नांव मला आठवत नाहीए... ज्यात करिश्मा कपुर , संजिव >>कपुर सोबत नाना होता... .जबरदस्त काम केले होते त्या सिनेमात त्याने.

स्मितू, तो सिनेमा होता "Shakti: The Power" यात सारुक खान पण होता माकडचाळे करायला.

ज्यात करिश्मा कपुर , संजिव कपुर सोबत नाना होता... .जबरदस्त काम केले होते त्या सिनेमात त्याने..
>>>>>>>>>>
जर हा सिनेमा शक्ती असेल तर आपल्याशी असहमत... जाम भडक चित्रपट होता तो.. सर्वांना उगाच ओवरअ‍ॅक्टींग करायला लावली होती.. शाहरुखचा शेवटी त्यात छोटासा रोल होता त्यात म्हणून मी नाईलाजाने पुर्ण बघितला होता तो.

असो,
नाना एका जमान्यात, म्हणजे वाढत्या वयात आम्हा सार्‍या ग्रूपचा जाम म्हणजे जाम फेवरेट.. थँक्स टू प्रहार.. आणि त्यानंतरचे क्रांतीवीर आणि तिरंगा.. नाना बोलले की पहिला हेच तीन चित्रपट मला आठवतात.. आणि चौथा "अंकुश" .. अंकुश जेव्हा मी पाहिला तेव्हा खूप लहान होतो तरीही मला असला चित्रपट कसा आवडला हे एक कोडे आहे.. ज्याचे उत्तर कदाचित नाना पाटेकर असावे..

अरे हो, परींदा राहिलाच.. जाऊ दे आता आठवत नाही जास्त अन्यथा लिस्ट वाढतच जायची..

बाकी कोणीही नुसते नाना बोलले की मला पाटेकर हाच पुढचा शब्द आठवतो.. आज तुमच्यामुळे पहिल्यांदा त्याचे खरे नाव समजले.. तरी मी विचार करायचोच की आईबापाने असे "नाना" नाव कसे ठेवले.

असो, लेख छान झालाय पण लय भारी व्यक्तीमत्व आहे हो, जमल्यास, वेळ मिळाला तर अजून इस्कटवून लिहा ना.. Happy

आभिषेक मला फक्त शक्ती मध्ये नानाचा रोल आवडला म्हटले मी... बाकी सिनेमा मी बघितलाच नाही... Happy
आणि लिहण्याची खुप इच्छा आहे पण वेळेअभावी इस्क्टुन लिहणे नाही जमत. Happy

नानाचा थोडासा रुमानी हो जाये - बेस्टच आहे. वेगळाच नाना आही त्यात!
मी पण नानाची पंखी आहे!

लेखबद्दल धन्यवाद!

Pages