उसासे

Submitted by राजीव मासरूळकर on 20 August, 2012 - 11:19

उसासे

मला काय झाले
उरी युद्ध चाले

उन्हाला खुणावी
तमाधीन प्याले

सुखाच्या दूकानी
दुखाचे मसाले

सले पावसाला
(ढगांचे उमाळे)

मतांच्या महाली
पडे रोज घाले

वसंतास सांगा
फुलोरे गळाले

हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?

हसू लागता मी
उसासे निघाले !

- राजीव मासरूळकर

मायबोलीवर प्रथमतःच लिहितो आहे . इथल्या वातावरणाचा सराव नाही . सर्वाँच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलाच प्रयत्न पण छान आहे. गझलेचा पुर्ण आभ्यास करा नक्की गझल लिहाल.

मला काय झाले
उरी युद्ध चाले >>>> व्वा

मतांच्या महाली
पडे रोज घाले

वसंतास सांगा
फुलोरे गळाले

हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?

हसू लागता मी
उसासे निघाले ! >>>>>>> हे नेमके आणि छान जमले आहे.

हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?..............आणि,

हसू लागता मी
उसासे निघाले !>>>>>>>>>>>मस्त शेर
मसाले, गळाले छानच .............

हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?..............आणि,

हसू लागता मी
उसासे निघाले !>>>>>>>>>>>मस्त शेर
मसाले, गळाले छानच .............