आई

Submitted by सुधाकर.. on 3 August, 2012 - 11:18

जसं तू शिकवलंस, तसं आई जग नाही.
तुझ्यातल्या कष्टाची कुणातही धग नाही.

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

कोसळले जर अभाळ, सहज पेलण्यासाठी
तुझ्या इतके माझे मन अजून सजग नाही.

अवती भोवती फ़िरतात, दिलाश्याची भुते
पण तुझ्या जागी इथे कुणाचाच तग नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

छान आहे......

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

मस्त शेर
वा वा

ओलांडल्या किती जरी, अवकाश्याच्या सिमा
तुझ्यासमान कुठेच अम्रुताचा ढग नाही

मस्त शेर
वा वा

_________________________

ओलांडल्या किती तरी, आकाशाच्या सीमा आई .
तुझ्यासमान कुठेच.......... अम्रुताचा ढग नाही
>>>>>>>>.........असे केले तर ही द्विपदी एक उत्तम अष्टाक्षरी द्विपदी होईल

वैयक्तिक मत !!!!