मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इश्श ! इश्श ! इश्श ! इश्श !
हफलपफ का नाम रोशन हो गया>>>>>> रुणुझुणु तुझ्या या इश्श च्या स्मायल्या बघुन मला दुसर्‍या वर्षात हर्मायनी हॉस्पिटलमधे असताना तिला लॉकहार्ट ने गेट वेल सुन चं कार्ड पाठवलेलं असतात अन रॉन की हॅरी ने ते पाहिल्यावरचे तिच्या चेहर्‍यावरचे एक्प्रेशन्स आठवले Wink हे मुव्ही मधे कसं दाखवलं आहे ते आठवत नाहिये, पण माझ्या वाचतानाच्या डोळ्यासमोर उभ्या राहणार्‍या मुव्हीमधे तरी भारी दिसतं ते Wink

हफलपफ का नाम रोशन हो गया >>येस्स्स...खरंय.. Happy
हो..सप्टेंबर म्हटल्यावर मलाही एखाद्या पेपरची तारीख पोस्ट्पोन झाली जसा आनंद होतो तसा झाला.. Proud

हो, ३० से. संपल्यानंतर.
पोशनबुकातल्या कृतीत ज्या क्रमाने दिलं असेल त्याप्रमाणे..

इब्लिस,
ड्युएल्स खेळून, पोशन्स बनवून पॉइंटस मिळतात.
एकदा ड्युएल जिंकलं की पाच पॉइंटस. प्रत्येक पोशनला सुद्धा वेगवेगळे पॉइंटस ठरवून दिलेले आहेत.

अय्या दुसरं पान आहे!नो वंडर माझी रेसिपी एकदाही सक्सेसफुल झाली नाही. माझा सोटा मला एकदाही उचलता आला नाही!
(माझा रॉन झालाय बहुतेक.. नेविल नाही झाला म्हणजे मिळवलं! :P)

हे शाब्बास चिमुरी, मी सक्काळ सक्काळ केकच वाटायला आले होते. तू पहिला नंबर लावलास.
हॅपॉला, रोलिंगबाईंना वादिहाशु आणि सगळ्या हॅपॉ फॅन्सना पुढील येडबंबूपणासाठी शुभेच्छा Happy
केक हॅग्रिडने बनवला नाहीये ना ??? नाहीतर आधी दातांच्या डॉक्टरकडे नंबर लावून येते Wink

मी सक्काळ सक्काळ केकच वाटायला आले होते. तू पहिला नंबर लावलास.>>>>>> रात्रीच टाकणार होते पण मोबाईलवरुन फोटो टाकता येत नाहीत म्हणुन राहीलं Wink

पुढील येडबंबूपणासाठी शुभेच्छा>>> Lol

केक हॅग्रिडने बनवला नाहीये ना ???>>>>>>> नाही गं.. तो इतका टेम्प्टिंग वाटत नाही म्हणुन तो टाकला नाही.. आणि त्याच्या १७व्या वादि चा स्निच केक पण सापडला नाही..

मागचे ४-५ दिवस पॉमोकडे फिरकायला वेलच नाही मिळाला.
आज जाते आणि सगळ्या मित्रमंडळाला शुभेच्छा-भेटी पाठवते.

हॅपी बड्डे हॅरी!!!
रुणू माझी सगळी पोशन बनलीत. ते 'वाईड आय' सध्या सुरू आहे. थँक यू.... हाफ ब्लड प्रिंस मोड कामात आला.
ड्युएल मात्र अजून १२० च्या पुढे नाही.

झकासराव, मगल असून शुभेच्छा दिल्या म्हणून विशेष धन्यवाद Happy
रितेश,
सहीच ! माझं हर्बिसाइड करपलं. पीसी हँग झाल्याने छडी फिरवताच आली नाही.

आज. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. केली. पण पहिल्या पुस्तकातल्या पाचव्या धड्यात डायगॉन अ‍ॅली मध्ये अडकले आहे. पुढे कस जायच? Sad

हॅपॉ वाचायला सुरूवात केली आहे. आणि पॉटरमोर मधील गोष्टींशी लिंक होत आहे (इतरांचं उलटं झालं असणार)

माझंही सप्टेंबरची तारीख कळल्यापासून पॉमो वर जाणं जवळजवळ बंदच झालंय..आता परत सुरू करायला हवं म्हणजे सराव जाणार नाही.. Proud

स्वातंत्र्यदिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! Happy

डायगॉन अ‍ॅलीमध्ये पुस्तकांची लिस्ट सापडेल. ती घेवून मग ग्रिग्नॉट्समध्ये खातं उघडून सगळी शॉपिंग करायची.<<<<<कुठे असते ती लिस्ट? मला पुढ्च्या लेव्हल ला जायला कुलूप दिसतय.

कुठे? मला दिसत नाहेये. त्या चित्राच्या. खालच्या भागात काही दिसत नाहिये. तिथे असते का ती लिस्ट.? मी झूम. केल, क्लिक केल, पण होत नाहीये.

पण, माझ्याकडे दिसणार्या ह्या लेव्हल च्या चित्रात खूप लोक पण दिसताहेत. हे चित्र मला Harry goes shopping ह्या नावाखाल्री दिसतय.

धनश्री, ती लेवल मी पार केलेली असल्याने मला परत तश्शीच दिसत नाहिये बहुतेक. तिथेच जमीनीवर पडलेली वस्तू शोधा. सापडेल.

Pages