अवचित

Submitted by अज्ञात on 14 August, 2012 - 11:26

झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या
एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा
ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या
अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा

रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके
वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा
पुंकरले बावरले आठवल्या निखार्‍यातल्या वेळा
पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा

..........................अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!

ह्या साठीतर मायबोलीवर यायच....
अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा

रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके

पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा...

प्रत्येक ओळीवर थांबाव, सौंदर्य अनुभवाव आणि शेवटच्या टप्प्याला पुर्णतेचा अनुभव... तुमची प्रत्येक कविता एक प्रवास आहे...