माझं नाव जर दाद असतं

Submitted by Kiran.. on 14 August, 2012 - 11:36

ज्यांच्या शब्दांनी निर्भेळ आनंद दिलाय त्यापैकी काही प्रतिभावंतां प्रती थोडीशी कृतज्ञता :).

माझं नाव जर दाद असतं
हसले असते शब्द आणि
बनले असते ललित शुचिर्भूत होऊन
गाणं देही भिनलं असतं
गानभूलीत झुललं असतं

माझं नाव जर ट्युलिप असतं
अलवार शब्दांची मैफील माझ्या
झोपडीत भरली असती..
हळुवार ललित नि उत्कट कविता
रेगिस्तान मे बहार होती

जर मी असतो धुंद रवी
तरल असता किबोर्ड माझा
धुंद होतानाही आले असते डोळे भरून
आणि लगेच आसमंत
हसला असता पोट धरधरून

माझं नाव जर कौतुक असतं
अष्टपैलू ही ओळख असती
रहस्य हासू, विडंबनं, कविता
अवती भवती नांदत असते
पाय मात्र जमिनीवर घट्ट असते

माझं नाव जर क्रांती असतं
वीज अंगी खेळत असती
फेर लयीत धरला असता
शब्द उगवून आले असते
आणि गाणे झाले असते

माझं नाव जर मामी असतं..
चिमटे असे काढले असते
कि चिमटलेले ही म्हटले असते ..बहोत खूब, बहोत खूब
आणि म्हटले असते सारे
हजरजबाबी आहे ब्वॉ ! बीरबल हुबेहूब !!

- Kiran..

ही कविता असल्याने ज्यांची नावं देणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी देखील हीच भावना आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच :)) पण मामींची कुरापत काढायचं कारण काय?
हं ..आता कडवं पूर्ण केल्यावर कळलं कुरापत नाही,काँप्लिमेंटस .
राइटली डिझर्वड!!

माझा छोटासा झब्बू - Wink

जर माझं नाव किरण असतं
शब्दही अगावच बनले असते
कधी चिमटे कधी फटके
पुढच्याला मी छळले असते
जरा बदलता रुप शब्द ते
ललित म्हणुनी बहरले असते
लेखणीतुन उतरूनी ते
थेट मनाला भिडले असते

चुभुदेघे Happy

भुंग्ज
Rofl

रीया आता घेच

जर माझं नाव रीया असतं
गुरखे उपाशी मेले असते
तीन वाजता वाजली असती सेलची बेल
आणि ओरडलो असतो..
आल इज वेल.. आल इज वेल Happy

व्वा .. किरण, .... एक विडंबन म्हणुन किंव्हा एक छंद म्हणून जरी ही कविता तुम्ही केली असली तरी रचना फारच अफलातून अशी आहे. खुपच छान. महत्वाचं म्हणजे या रचनेवर खाली प्रतिसाद देता देता अनेक नवविडंबनकारांची एक पिढी आकार घेतेय हे काय थोडे आहे? म्हणुनच तुम्हास धन्यवाद. Happy

महत्वाचं म्हणजे या रचनेवर खाली प्रतिसाद देता देता अनेक नवविडंबनकारांची एक पिढी आकार घेतेय हे काय थोडे आहे? म्हणुनच तुम्हास धन्यवाद. स्मित
>>>
कोण ते?? मी आणि भुंगा का?

किरण, कवितेतल्या कल्पना आवडल्या.

पण ’किरण’ या नांवाभोवती वलय असताना
बाकी नांवं कशाला हवीत ???? Happy

कुरापत नाही हो. आणि काढली तरी चालण्यासारख्या मोजक्या आयडीमधे मामींचा समावेश होतो>>>

अगदी, अगदी Happy आवडली रे भाऊ कृतज्ञता Happy

Pages