भेळ(चाट)

Submitted by vedangandhaa on 14 August, 2012 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्यः
आर्धी वाटी- मक्याचे दाणे,शेंगादाणे,गाजर,दुधी,बीट,टोमाटो,
आर्धा चमचा -चट मसाला,लाल तिखट,मीठ
चिमुटभर -हिंग,साखर(चविनुसार)
क्रुती:
प्रथम गाजर,दुधी,बीट,टोमाटो,स्वछ धुवून,बारीक चीरून घ्यावे. सर्व साहेत्य (मक्याचे दाणे,शेंगादाणे,गाजर,दुधी)
चंगले वाफवुन घ्यावे ,बीट वेगळे वाफवुन (नाही वाफवले तरी चलतील)ते सर्व साहेत्य एकत्र करावे,त्यात चाट मसाला,लाल तिखट,मीठ,हिंग,साखर(चविनुसार)घालून चांगले मिसळून घावे ,वरून्,बारीक चिरलेला टोमाटो,कोथिंबीर घालावी.झकास नश्टा तयार्....चमचमीत आणि हेल्दी सुद्धा........
सौ.विनीता ल्.पाटील

क्रमवार पाककृती: 

कृती

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन जणांना पुरेल(तीन ते चार बाऊल होईल सर्व भेळ)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा बाफ आहारशास्त्र आणि पाककृती विभागात हलवण्याची विनंती योग्य ठिकाणी केलेली आहे.

- मदत समिती.

वेदा
लागणारे जिन्नस मध्ये फक्त साहित्य लिहा
क्रमवार पाककृती मधुन श्री गणेशा काढून तिथे कृती टाका

मस्त आहे रेसिपि

कांदा अन लिंबू हवेच होते असे वाटले

पण क्षमस्व ...... चुरमुर्‍याशिवाय भेळ ही संकल्पना मला तरी अजिबात मान्य नाही
फारफारतर मी या रेसिपीला "कोशिंबीर ( विथ चाट मसाला ) " असे नाव दिले असते

अजून एक : हे लेखन कविता या विभागातून लवकरात लवकर स्थलांतरीत करावे

-वैवकु

प्रथम्....आपणा सर्वास ही ईथे रेसीपी वाचन्याचा त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व्...........मला खरच जमत नाही पाककृतीत हालवायला.........आणि मला वाट्ल कि हे चाटपटीत आणि झटपट होणार आहे ...त्यात कांदा घाला,लिंबू पिळा हावं तर बारीक शेव घाला...जीभेचे चोचले पुरवाल तेवढे ठोडेच आहेत.... नही का?

पण हे ईथुन कस हलवायच ते मत्र नक्कि सांगा..............आभारी आहे.....