अस्तित्व

Submitted by भुंगा on 21 June, 2012 - 00:43

एका क्षणात सारे पाश तोडून... सारं काही मागे सोडून,
तू निघून गेलीस.
जराही मागे वळून न पाहता......... निग्रहाने!

माझ्या अस्तित्वाचे विखुरलेले तुकडे आवरत.... स्वतःला सावरत,
दिवसेनदिवस तू गेलेल्या वाटेकडे डोळे लावून बसलोय...
पण,
तू अजून आलेली नाहीस.....!

जगण्याची आस खरंतर आता उरलीये कुठे......
तरीही तग धरून नेटाने माझं अस्तित्व जिवंत ठेवतोय..... प्रत्येक श्वासागणिक.

कारण,
तुझं उसनं आणलेलं अवसान गळून पडल्यावर
खळकन विखरून पडणार आहे तुझंही अस्तित्व इतस्ततः .

त्या तुझ्या अस्तित्वाचा एक एक कण...... तुझ्या-माझ्यातला एक एक क्षण
पुन्हा गोळा करायला, पुन्हा त्याला आकार द्यायला,
पुन्हा तुला तुझं अस्तित्व मिळवून द्यायला......
मला माझं अस्तित्व टिकवायलाच हवं...!

सारं भान एकवटून..... वाट पाहतोय तुझं उसनं अवसान गळून पडण्याची.......
तुझ्या पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची.

आपल्या अस्तित्वरेषा समांतर नाहीत हेच खरं...!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कारण,
तुझं उसनं आणलेलं अवसान गळून पडल्यावर
खळकन विखरून पडणार आहे तुझंही अस्तित्व इतस्ततः .
>>>
आहाहा! पुन्हा पुन्हा वाचलं हे कडवं!

पुन्हा तुला तुझं अस्तित्व मिळवून द्यायला......
मला माझं अस्तित्व टिकवायलाच हवं...!
>>>
__/\__
मस्त!

आपल्या अस्तित्वरेषा समांतर नाहीत हेच खरं...!!!!
>>>
वाह!

अप्रतिम.... खुप दिवस वाट पाहिल्याचं सार्थक झालं.. जियो!
समथिंग अनुभवलेलं...!
वाह!

एका क्षणात सारे पाश तोडून... सारं काही मागे सोडून,
तू निघून गेलीस.
जराही मागे वळून न पाहता......... निग्रहाने!

माझ्या अस्तित्वाचे विखुरलेले तुकडे आवरत.... स्वतःला सावरत,
दिवसेनदिवस तू गेलेल्या वाटेकडे डोळे लावून बसलोय...
पण,
तू अजून आलेली नाहीस.....!

जगण्याची आस खरंतर आता उरलीये कुठे......
तरीही तग धरून नेटाने माझं अस्तित्व जिवंत ठेवतोय..... प्रत्येक श्वासागणिक.

कारण,
तुझं उसनं आणलेलं अवसान गळून पडल्यावर
खळकन विखरून पडणार आहे तुझंही अस्तित्व इतस्ततः .

त्या तुझ्या अस्तित्वाचा एक एक कण...... तुझ्या-माझ्यातला एक एक क्षण
पुन्हा गोळा करायला, पुन्हा त्याला आकार द्यायला,
पुन्हा तुला तुझं अस्तित्व मिळवून द्यायला......
मला माझं अस्तित्व टिकवायलाच हवं...!

सारं भान एकवटून..... वाट पाहतोय तुझं उसनं अवसान गळून पडण्याची.......
तुझ्या पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची.

आपल्या अस्तित्वरेषा समांतर नाहीत हेच खरं...!!!!<<<

अशा ध्वनीसाधर्म्ययुक्त शब्दांनी मुक्तछंद नटतो व सादर करताना एक विशिष्ट लय ऐकत असल्यासारखे वाटते.

भुंगा - आशय छान आहे. 'सारं भान एकवटून' या शब्दांपासून पुढचे सर्व अधिक छान आहे.

शेवटच्या ओळीत 'आधीच्या आशावादाशी विसंगत' विचार आल्यासारखे मला वाटले.

पण एकंदर भावना वजनदार वाटल्या Happy

धन्यवाद

अशा ध्वनीसाधर्म्ययुक्त शब्दांनी मुक्तछंद नटतो व सादर करताना एक विशिष्ट लय ऐकत असल्यासारखे वाटते.
>>>>>>>>>>>>

धन्स बेफी. ही कविता काव्यवाचनातच जास्त छान वाटेल, वाचण्यापेक्षा याची जाणीव आहे.

शेवटच्या ओळीत 'आधीच्या आशावादाशी विसंगत' विचार आल्यासारखे मला वाटले.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आपलं अस्तित्व समांतर नाही यात आशावादच आहे (मी पाहिलेला) पुन्हा नव्याने एकत्र येण्याचा Happy

बर्‍याच दिवसांनी लिहिल्याने नवखेपणा जाणवत होताच लिहिताना, बेफी.

मस्तच रे! पोचली अगदी खोलवर.....ते आर्त वाट पाहणं कुठेतरी अनुभवल्यासारखं वाटलं, उसनं अवसान वगैरे ग्रेटच! टाळ्या! Happy

सारं भान एकवटून..... वाट पाहतोय तुझं उसनं अवसान गळून पडण्याची.......
तुझ्या पुन्हा एकदा मागे वळून पाहण्याची.

आपल्या अस्तित्वरेषा समांतर नाहीत हेच खरं...!!!!>>>>>>> हे विशेष आवडलं...
माझ्यासारख्या अनेकांना अशा आशावादी आशयाच्या कवितेतून मिळणार्‍या प्रेरणेची गरज आहे.......तेव्हा असाच लिहित रहा! शुभेछा!

मिलिंद ही कविता अशीच वाचली असती तर नीट समजली नसती. (नेहमीप्रमाणे असं काहीजण म्हणतीलच :फिदी:)
पण तुझ्याकडून प्रत्यक्ष अर्थ कळल्यामुळे खूप भावली. मस्तच लिहिली आहेस एकदम. खूप आवडली. Happy

सुंदर आहे..... पण,
मीही पूर्वी अशा कविता लिहायचो. पण ते काही खरे नाही.
मुक्तछंद हासुद्धा एक छंदच आहे असे मला वाटते. फक्त त्याला गण किंवा अक्षरांचे बंधन नाही.
वरील कविता ही मुक्तछंद म्हटली जाऊ शकते. मात्र ती एका वाक्यरचनेसारखी वाटत असल्याने, पूर्वी नाटकांमध्ये जशी स्वगते व्हायची तशी वाटत आहे.
यात काव्य आहे हे नक्की. पण ते गद्यकाव्य वाटते.
मला असे वाटते की, कविता हे पद्यकाव्य असावे.

असो. जे लिहिले आहे ते सुंदरच आहे याबद्दल शंका नाही.

अ.अ., बर्‍याच दिवसांनी दिसलात. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रद्युम्नसंतू, मनापासून आभार.

भुंग्या,
वेलकम बॅक! Happy

आशय आवडला! बेफींचा प्रतिसादही आवडला. पण त्यांनी म्हटलंय तसं मला शेवटची ओळ विसंगत नव्हे तर एकंदर आशयाशी सुसंगत वाटली.

कवितेचा आशय छान आहे.
"ही कविता काव्यवाचनातच जास्त छान वाटेल, वाचण्यापेक्षा याची जाणीव आहे." >>>
मिलिंद, माझंही जवळपास हेच मत आहे.

आशय छानच ...
ओळींच्या लांबीमुळे गद्याकडे झुकते...
पण काय फरक पडतो..... या पेक्षा महान मुक्तछंद वाचलेत इथे

पु.ले.शु

चारोळी काय, गझल काय, मुक्तछंद काय किंवा त्रिवेणी (का तत्सम काही प्रकार आहे तो) काय, कि फर्क पेंदा? Happy सामान्यांपर्यंत आशय पोचला कि झालं. इथे तर आशय आणि भाव दोन्ही आहे. प्रचंड आवडली मला.

आपलं अस्तित्व समांतर नाही यात आशावादच आहे >>> भुंग्या, हे वाचुन तर जबरीच आवडली. मस्त रे !