अप्रूप

Submitted by कौतुक शिरोडकर on 12 August, 2012 - 12:59

तस काहीच नाविन्य नाही
तुझ्या बरसण्यात..
सगळा नेहमीचा तोच तोचपणा.
नव्याने चार ओळी खरडाव्या असं अप्रूप ते काय ?
तुला न्याहाळताना
वहीतून कोर्‍या पानासारखा
फाडलेला कोरडा प्रश्न.
..
.
काल दोन सरी झेलल्या.
.
चिंब मनाची
मूळं ओलावली,
फांद्या शहारल्या,
आठवांची पालवी
पेरापेरात तरारली...
...
..
.
आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंब मनाची
मूळं ओलावली,....... येथे -------

कोरड्या मनाची मूळं
चिंब ओलावली, .................... असे हवे आहे Happy

कविता छान आहे.

आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली. Happy

मस्त रे !

खूप आवडली रे कौतुक!!
खासकरून ही कल्पना..
वहीतून कोर्‍या पानासारखा
फाडलेला कोरडा प्रश्न.
..
आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली.

चिंब मनाची
मूळं ओलावली,
फांद्या शहारल्या,
आठवांची पालवी
पेरापेरात तरारली...

वाह!!!

पाऊस फारच मुरला आहे Happy बाकीही पावसाच्या कविता सुंदर... शंका येते बाबा आम्हाला.. कोणत्या पावसात कौत्या वाहतो आहे?

काल दोन सरी झेलल्या.

>> इथुन खरी कविता सुरूझाली...

आठवांची पालवी

पेरापेरात तरारली... >> पर्मोच्च...

आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली. >> सांगता...