बयो,

Submitted by बयो on 12 August, 2012 - 04:09

तसं सर्वार्थानं आपलं असं
कुणीच नसतं ना बयो,
जे सोबत असतं आपल्या
काळीज उलताना, फुलताना...
आतड्यांमधून उठणाऱ्या
कल्लोळांना
स्वतःलाच बांध घालावा
लागतो बयो.
आतून उगवणाऱ्या
हिरव्या जखमांवरची
निळीशार फुंकर
आपली आपणच
व्हावं लागतं बयो,
स्वतःशीच लढताना.
शिकशील तूही हळूहळू.
पण तोपर्यंत नव्यानं
फुटशीलही.
सोपं नसतंच काही
पण तितकं अवघडही नसतं काही तसं,
ज्यासाठी करावा लागतो
प्राणांचा अट्टाहास असं...
निरगाठी उकलाव्यात तसं
आयुष्यही उलगडत जातं मग हळूहळू
समंजसपणाच्या तीरावर...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान. आवडली कविता.

फक्त टायपो संभाळा -- shift + R+ya = र्‍या

तसेच मी आपल्या विचारपुस मध्ये काही लिहीत आहे. कृपया पहावे.

सुस्वागतम बयो.. चळवळीचा मोठा वारसा तुझ्या मागे आहे याचं अजिबात ओझं न बाळगता कवितेत उतरली आहेस. शुभेच्छा.