देवुनी सूर्यास खांदा दिवस दृष्टीआड झाला!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 August, 2012 - 05:36

गझल
देवुनी सूर्यास खांदा दिवस दृष्टीआड झाला!
अन् धरेच्या सांत्वनाला चंद्रमा गगनात आला!!

रोज क्षितिजांच्या स्मशानी प्रेत सूर्याचे धुमसते;
रोज तिन्हिसांजेस येतो लालिमा सा-या नभाला!

दाटती डोळे नभाचे तारकांच्या आसवांनी;
ढाळलेल्या आसवांचे रूप येते चांदण्याला!

रात्र झाली की, स्मशानी शांतता देते पहारा;
कोण जाणे खिन्न वारा शोधतो आहे कुणाला?

मीच जागा राहिलो अन् लोचने पुसली नभाची!
आसवे माझी पुसाया सूर्यही धावून आला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानदेवाला नक्की काय लिहावे हे न कळाल्याने ...............
( हे तुम्हाला सांगण्यापुरते कारण झाले बरका शेळीताई.......... बाकी आमच्या म्हणण्याचा मतितार्थ ओळखायला 'ते' समर्थ आहेत ही खात्री निदान आम्हीतरी बाळगतो !!)

असो

यावरून नेहमीप्रमाणे माझाच एक शेर आठवला ...............

एकदाही पत्र ना लिहिलेस तू
की तुला सुचलाच नाही मायना
Lol

वैवकु

<<मीच जागा राहिलो अन् लोचने पुसली नभाची!>>
फारच छान!! सूर्यास्ताला फार वेगळ्या तर्‍हेने मांड्ले आहे.

रोज क्षितिजांच्या स्मशानी प्रेत सूर्याचे धुमसते;
रोज तिन्हिसांजेस येतो लालिमा सा-या नभाला!

हा भन्नाट झालाय मला खूप आवडला

'चान्दणे' अन् 'वारा'ही छान आहेत

मीच जागा राहिलो अन् लोचने पुसली नभाची!
आसवे माझी पुसाया सूर्यही धावून आला!! >>>>>>>> वाचा बसली माझी, मती गुंग झाली.