चहा सुंदर !

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 August, 2012 - 11:29

चहा सुंदर पिवून
जिव्हा गेली लाचावून
झाले रसमय मन
जड़ समाधी लेवून

उष्ण चविष्ट घोट
हळू उतरे घश्यात
वाफ स्पर्शून ओठ
झाले गंधित प्राण

पाणी साखर चहा
यात मिसळता दुध

वर आले फेसाळून
पेय अमृत होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पाणी साखर चहा
>>यात मिसळता दुध

उपर्निदिष्ट मिश्रणास उकळेपर्यंत गरम करण्याचे राहून गेले आहे तसे न करताच 'वर आले फेसाळून' होणे हे मंगळवारीच विकांत येण्याएवढेच अशक्य आहे.

तेवढे सुधारून घेतल्यास हे एक युगप्रवर्तक काव्य ठरेल.

शिवाय दोन काव्यात एवढे अंतर पडणे योग्य नाही.
इथे दबदबा निर्माण करायचा असल्यास रोज चार ते पाच अशाच उत्तम कवितांचा मारा आवश्यक आहे.

लक्षात ठेवा

धबधब्याशिवाय दबदबा नाही.
- जंगलातील एक जुनी म्हण

अधिक प्रोत्साहनाकरता दैनिक तंटा वाचा
http://www.maayboli.com/node/36868

मोगॅम्बो तर खुश असतोच पण विक्रान्त सुद्धा खुश झाला.
जंगलातील एक जुनी म्हण जबरदस्त आहे.चिन्तन चालू आहे.पाणी साखर चहा
यात मिसळता दुध या ओळीनंतर थोडा gap झालाय तो उकळी मुळेच.

शेळी ताई,
ताकाचा विचार चालू आहे,तुम्हाला दुध दही ताक सुचने यात त्याचे सार्थक आहे.

आता ताकावर कविता लिहा.>>>>>>>>
ताक ज्या दह्यापासून तयार करायचे आहे ते दही शेळीच्या दुधापासून तयार केलेले असल्यास उत्तम !!कविता लवकर 'जमून ' जाईल यास्तव ....!(वैयक्तिक मत);)