पुरंदरची पुर्नभेट

Submitted by आशुचँप on 1 August, 2012 - 12:23

गेल्या आठवड्यात जिप्सीचा फोन आला पुरंदरला कसे जायचे विचारायला. तेव्हा माझा वेगळाच प्लॅन ठरत होता. पण ऐन वेळी बरेच बदल झाले आणि सरते शेवटी पुरंदरला जाण्याचा योग आला. वाटेत एकेठिकाणी मस्त चमचमीत मिसळ चापली आणि धुंद पावसाळी वातावरणात थेट गडावर गाड्या दामटल्या.
जिप्सीबरोबर जाण्याचा माझा हेतू होता त्याच्याकडून काही फोटोग्राफी टिप्स घेणे...पण का कोण झाले मी त्याची फोटोग्राफीची तंद्री मोडूच शकलो नाही. आख्ख्या ट्रेकमध्ये मी त्याला विचारलेला एकमेव प्रश्न म्हणजे...व्हाईट बॅलेन्स कुठला ठेवला आहेस रे एवढाच होता....:)
त्यात अजून गंमत म्हणजे गडावर फिरताना दिपक सांगत होता अरे मी इथला जो फोटो पाहिला ना तो असा खालून घेतला होता आणि त्यात समोर वज्रगड दिसत होता. त्यानंतर अजूनही दोन तीन फोटोंचे वर्णन केले. हे सगळे ऐकताना असे वाटत होते हे फोटो आपणपण कुठेतरी पाहिलेत. Happy नंतर अधिक विचार केला असता लक्षात आले की हे आपणच काढलेत Happy
दिपकला म्हणलो अरे तु हे पावसाळ्यातला पुरंदरबद्दल बोलतोयस का...तर म्हणे हो...च्यामारी Happy
http://www.maayboli.com/node/18684
हीच ती लिंक

माझी लाडकी
प्रचि १

प्रचि २

तीन शिलेदार
प्रचि ३

प्रचि ४

या काकू त्यांचे फोटो काढताना जाम अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे आणखी काही अँगल घेता आला नाही.
प्रचि ५

प्रचि ६

आपला उडीबाबा ट्रेकला आला असता तर मस्तच झाले असते. पण त्याच्याच तालमीत तयार झालेला मायबोलीकर दिपकने त्याची उणीव भासू दिली नाही.
प्रचि ७

प्रचि ८

आधुनिक गनीमाचा लढवय्या मुरारबाजींना वेढा
प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

पत्थर के सनम Happy
प्रचि १६

थोडा फोटोग्राफीचा प्रयत्न
प्रचि १७

जिप्स्याला सांभाळून नेताना गणेश आणि दिपक. या गणेशचे मला फार कौतुक वाटले. बहाद्दराचा पहिलाच ट्रेक होता आणि तो चप्पल घालून आला होता. ज्या निसरड्या वाटेवरून आम्ही एक्शन ट्रेकींगचे शूज घालून सांभाळून चालत होतो तिकडेदेखील हा बिनधास्त वावरत होता. कुठे दमला नाही की थकला नाही. निर्विवादपणे भटक्याची सारी लक्षणे त्यात आहेत.
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

धुंद कुंद वातावरण
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु, मस्त रे फोटो आणि वर्णन Happy
पुन्हा सगळ आठवलं. Happy
त्या चिखलाच्या वाटेवर खरंच जाम घसरायला होत होते ना Wink

कान धरा गुरुजी>>>>अरे कान कशाला धरायचे. उलट तुमचा अमुल्य वेळ आम्हास दिल्याबद्दल धन्यवादच. Happy

मस्त आहेत रे फोटु. Happy

चिखलातुन चालताना जिप्स्याच पोश्चर माझ्यासारखच दिसतय. मी तर खाली बसुन दोघानी मला ओढा म्हणुन ल्हाणपणीचा खेळ खेळला असता. Wink
तुम्हाला ते गाव दिसल नाही का रे खालच ज्यात एक मोठा देवळाचा कळस आहे?
बहुतेक धुक्याने दिसल नसेल..

चिखलातुन चालताना जिप्स्याच पोश्चर माझ्यासारखच दिसतय.>>>>झक्या, वार्‍यामुळे माझा विंडशीटर फुगलाय रे...:फिदी: Happy

मस्त फोटो Happy

( अवांतर :गडावरील भूभू ला बघून उगाचच ' वाघ्याची ' आठवण आली )

झक्या, वार्‍यामुळे माझा विंडशीटर फुगलाय रे>> Proud
मला जाडी नाही तुझी उडालेली घाबरगुंडी म्हणायचच रे. Wink
मलाही असच कोणी ना कोणी संभाळुन नेत, आणत म्हणुन मी जातो ट्रेकला. Proud

पुरंदर म्हटला की त्याचे फोटो कितीही वेळा तेवढ्याच ओढीने आवडीने पाहू शकतो.....
लहानपणी किती वेळा गडावर गेलोय त्याची मोजदादच नाही - सध्या मात्र अशा फोटोंवरच तहान भागवावी लागतेय.....
सर्व प्र चि अप्रतिमच रे.....
सर्व ऋतूत वेगवेगळ्या सौंदर्याने नटलेला दिसतो हा - आणि ते बघताना भान हरपून जाते......

प्रचि एक्क नंबर!
बर्‍याच दिवसांनी आशुचँप भटकंती वर्णन घेऊन अवतरले आहेत.. त्यामुळे आमच्यासाठी आशुचँपची पुनर्भेट!

धन्यवाद सर्वांना Happy
तुम्हाला ते गाव दिसल नाही का रे खालच ज्यात एक मोठा देवळाचा कळस आहे?
बहुतेक धुक्याने दिसल नसेल..

हो बहुदा

झक्या, वार्‍यामुळे माझा विंडशीटर फुगलाय रे Happy Happy Happy

सर्व ऋतूत वेगवेगळ्या सौंदर्याने नटलेला दिसतो हा - आणि ते बघताना भान हरपून जाते......

अगदी अगदी

बर्‍याच दिवसांनी आशुचँप भटकंती वर्णन घेऊन अवतरले आहेत.. त्यामुळे आमच्यासाठी आशुचँपची पुनर्भेट!

"प्रचंड लाजलेला बाहुला" Happy

मस्तच आहेत फोटो!

अवांतर : माझी एक मैत्रीण अलिकडेच श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे सोबत बरेच किल्ले बघुन आली. बाबासाहेब स्वतः सगळी माहिती सांगतात त्या त्या ठिकाणची! बाबासाहेबांचे वय पहाता हा उपक्रम फारच कौतुकास्पद वाटतो! माबोकरांपैकी कुणी गेले आहे का त्यांच्याबरोबर? दिवाळीत अजुन एक अशी भ्रमंती आहे! ही पर्वणी चुकवू नका! पुण्यातली संस्था ही दुर्गभ्रमंती आयोजित करते.

तुम्हाला ते गाव दिसल नाही का रे खालच ज्यात एक मोठा देवळाचा कळस आहे?
बहुतेक धुक्याने दिसल नसेल..........नाही दिसले..

बाकी वर्णन आणि फोटो मस्त Happy

आशू, तूझा मसाई मारा ला जायला प्लान होता ना ?

नाय वो...माझा तेवढा बजेटच नाही....तुम्ही परत कधी गेलात तर मग मला बोलवा...मी येईन... Happy

धन्यवाद दिपक, वत्सला, ईनमीन तीन आणि स्मितू Happy