रोडगा

Submitted by deepac73 on 29 July, 2012 - 07:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ वाटी नाचणीचे पीठ (मी सत्व वापरले)
१ वाटी तांदूळाचे पीठ
२-३ चमचे गुळ बारीक चिरून
१ चमचा तेलाचे मोहन
२-३ चमचे तूप
चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: 

१. नाचणीचे पीठ, तांदूळाचे पीठ, गुळ आणि मीठ घालून भाकरी सारखे पीठ मळून घ्या.
२. तेलाचा हात लावून मळा आणि १५-२० मिनीटे झाकून ठेवा
३. तवा गरम करत ठेवा.
४. प्लॅस्टीक्च्या कागदावर रोडगे थापा (थालीपिठा एव्हढे / थोड्से मोठे)
५. तव्यावर टाकून एकाबाजूने शिजू द्या. उलटून तूप लावा आणि खरपूस भाजा.
खायला तयार
आमच्या घरी हे श्रावणी शनिवारी बिरड्या बरोबर खातात

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे
माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही तो रोडगा विदर्भातला. बी ला नाहीतर दिनेशजीना विचारा. जुन्या माबोवर रेसेपी आहे. आणी लोकसत्ताच्या चतुरंगमध्ये पण खाणे पिणे या सदरात रेसेपी आहे बहुतेक

>>>भवानीआई रोडगा वाढीन तुला.<<<

मलाही हेच वाटलेले.

>>मोहन म्हणजे>>

मीराचा मोहन...

हलके घ्या.

मोहन= तेल तापवून घेतले की त्याला मोहन म्हणतात. आता थंड असेल तर ... विचार पडलाच तर.. 'सोहन' म्हणतात.

हा पण एक वेगळा छान प्रकार आहे.
हो टुनटुन, चतुरंग पुरवणीत विदर्भातला रोडगा आहे तो वेगळा ( बी ने लिहिले होते इथे ) त्यात ओवा आणि मीठ घालतात. तसेच तो थरावर थर देऊन गोळ्यासारखा करतात आणि शेकोटीत भाजतात. सोवत वांग्याची भाजी आणि वरण असते.

ही खाली दिलेली लिंक बघा, त्यात उल्लेख आहे हा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228...

दीपाने अगदी छान सोपी कृती दिलीय, बिरड्याबरोबर म्हणजे कोकणातला रोड्गा आहे वाटतं.