शिवथरघळ - विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे

Submitted by sunil patkar on 25 July, 2012 - 09:02

हिरव्या डोंगरावर पांघरलेलीपांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचासहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा आध्यात्माचा स्पर्श....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचेवर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुतीयेथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचितया ठिकाणाला नाव आहे.
घळीकडे घेऊन जाणारा प्रवासहीअत्यंत सुखकर.हिरवीगार फुललेली शेती , हिरवेगार डोंगर ,त्यातून कोसळणारे गिरीचे मस्तकीगंगा हे वर्णन सार्थ व्हावे असे असंख्य धबधबे..आपले स्वागत करण्यासाठी तयार असतात.पाऊसपाडून गेलेले ढग अगदी खालपर्यंत आलेले दिसतात.नदीच्या पाण्याचा तो आवाज अंगावर रोमांचउभे करतो.नागमोडी वळणांनी आपण घळीच्या पायथ्याशी येतो आणि दुरुनच दाट हिरवाईत दडलेलामोठा धबधबा आपल्या दृष्टिस पडतो..धबाबा तोय आदळे असे समर्थ याचे वर्णन करतात.घळीत जातांनायाचे थंडगार तुषार अंगावर झेलण्याचा मोह आवरता येत नाही.
डोंगराच्या कपारीत १००-१५०माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.याच ठिकाणी दासबोधा सारख्या महान ग्रंथाची निर्मितीझाली.घळीत मारुतीची मूर्ती आहे.रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याणस्वामी त्यालिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती घळीत आहेत.याशिवाय या परिसरात भोजन मंडप ,सभागृह .गणेशमंदिर ,भक्तनिवास , ग्रंथसंपदा आहे.याठिकाणी धार्मिक विधी सतत सुरु असतात .खिचडीच्याप्रसादाची सोय असते .याशिवाय पावसाचा आनंद घेऊन आल्यावर येथील लहान हाँटेलमध्ये गरमागरमपिठलं-भाकरी ,कांदा-लोणचे पोटपूजेसाठी तयार असतात. शिवथरघळ हे धार्मिक स्थळ आहे पर्यटनस्थळनाही याचे भान मात्र ठेवावे लागते .येथे राहण्यासाठी भक्तनिवास व सरकारी विश्रामगृहआहे. महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पूणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथूनघळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकणरेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.
शिवथरघळ येथील दूरध्वनी क्र. ९२२५७८४१२७
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातूनबाहेर पडून शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच.
..........................................

SHIVATHARGHAL -2.jpgSHIVATHARGHAL -7.jpgSHIVATHARGHAL -4.jpgSHIVATHARGHAL -5.jpgSHIVATHARGHAL -7.jpg

गुलमोहर: 

आवडले Happy

व्वा....! मस्त वाटलं! खुप मनापासुन इच्छा आहे शिवथरघळ बघायची. Happy
समर्थांच्या मनात असेल तर लवकरच पुर्ण व्हावी.