मायबोली - बुजकूज

Submitted by बेफ़िकीर on 25 July, 2012 - 09:31

रसिक धागाभरकटकरांनो, तज्ञ निष्क्रीयखिल्लीकरांनो, ओलावलेल्या वविबहिष्कारकरांनो व समस्त बॅन आय डी यांना हवाहवाई उर्फ हह या स्वतःच्या स्वयंघोषित मैत्रिणीच्या वतीने (संबंधितांनी 'रॉयल स्पिरिट' दाखवून माफ करावे) या क्रमशः अडगळव्यापकराचा सस्नेह नमस्कार!

प्रथम सर्वांनी दिवे घ्या व या धाग्याकडे क्षमाशील मनाने पाहा.

हहंची कुजबूज अनेक महिन्यांत न झाल्याने व्यथित झालेल्या माझ्या मनाने त्यांची अजिबात परवानगी न मागता ते सदर पुढे ढकलण्याचा एक प्रयास करण्याचे ठरवले. मात्र प्रताधिकाराचा प्रश्न भेडसावू नये म्हणून कुजबूज ऐवजी बुजकूज असे शीर्षक घेण्यात आले आहे. शीर्षक उलटे झाल्यामुळे 'सुलट्या शीर्षकाच्या धाग्याने येणारे हसूही' उलटे होऊन हा धागा वाचल्यानंतर हासणारे गंभीर होतील याबाबत खात्री आहे.

या बुजकूजचा शुभारंभ नेहमीप्रमाणे आरतीने होत आहे.

==========

!! श्री !!

(जयदेव जयदेव, जय श्री गुरूदत्ता या चालीवर ही आरती आहे).

जय जय श्री अ‍ॅडमीना
जप सार्‍या आयडींना
जय जय श्री अ‍ॅडमीना - !!ध्रू!!

काढे धागा धार्मीकं
मग उरके अन्हिकं
घेई शिव्यांचे पीक
मूळ नांव होई लीकं
पासवर्ड अठवीना
कर बॅन आयडीना !! १ !!

दिवसा जे गाजतात
त्यांचे रातला चालेना
हासतात रात्री त्यांना
काही दिवसा कळेना
दोन काढ मायबोली
फक्त सोडून रीयांना !! २ !!

डॉक्टरांचा धागा आता
प्रोफेसर चालवती
कादंबर्‍या भल्यामोठ्या
इंजिनीयर पाडती
व्यवसाय काय माझा
काही कोणाला कळीना !! ३ !!

युक्ती सुचवा वाचण्याची
युक्ती सुचवा हा धागा
ए ल दु ओ अडवते
सर्व्हरची सर्व जागा
कोण काय बोले त्याचा
नाही पीछा नाही आगा
आणि त्यात मधेमधे
गाल गाल गाल गागा
फक्त सोडुनी कवींना
जप सार्‍या आयडींना !! ४ !!

जय जय श्री अ‍ॅडमीना
जप सार्‍या आय डीं ना

================================

काही ठळक बातम्या:

१. गेल्या तब्बल ७२ तासांत सावरकरांवर एकही धागा निघाला नाही.

२. यामुळे काही ड्यु आय डींनी चिंता व्यक्त केलेली असून हे असेच चालू राहिले तर आम्ही मूळ आयडीनेच का वावरू नये असा जळजळीत सवाल त्यांनी केल्याचे समजते.

३. काही नव्या आय डींसाठी पार्ले व पेडगाव येथील भरभक्कम प्रवेशद्वारे उघडून खंदकावर पूल टाकून त्यांना हाताला धरून आत घेण्यात आले. ही अपवादात्मक परिस्थिती का निर्माण झाली असावी यावर विचारवंतांची बैठक आज सायंकाळी कॉफी हाऊसवर होणार आहे. (श्रोत्यांना प्रवेश मोफत).

४. गप्पागोष्टीवर हाहाकार! झालेल्या दंगलीचे लोण अ‍ॅडमीनच्या विपूपर्यंत पोचून अ‍ॅडमीन यांना स्वतःचाच 'आपली मायबोली' हा धागा बंद करण्याचा निर्णय घ्यावासा वाटला.

५. काकाक म्हणून कविता टाकून लाडीक आग्रहास्तव ती कविता या सदरात हालवण्याचे प्रमाणे २६ टक्क्यांनी वाढले.

६. दोन चुलत बहिणींचा येथे नव्यानेच प्रवेश झाला. त्यांचे हार्दिक स्वागत. कुमारी कमला सोनटक्के व कुमारी नर्मदा बारटक्के!

७. 'माझ्या कादंबर्‍या गलिच्छ आहेत हे झक्कींनी का सांगावे' असा धागा काढण्याचा बेफिकीर यांचा विचार पक्का!

८. फक्त वविला न गेलेल्यांनीच वविचे वृत्तांत का टाकले या विषयावरून एकच दंगल माजली.

९. सत्यमेव जयते या धाग्यांवर विषयाला धरून चर्चा झाल्याने सर्वत्र चुकल्याचुकल्यासारखे वाटल्याची अनेकांची कबूली.

१०. दु:खद घटना या धाग्यावर 'गेलेल्यांनाच श्रद्धांजली वाहावी' अशी समज मदतसमीतीकडून देण्यात आली.

११. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए. वे. ए. ठी. बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन शासनाचा आरोप!

१२. पुढील ववि यू के रिसॉर्ट नावाच्या नवीन ठिकाणी होणार आहे.

===========================

सदस्यांचे काही प्रस्ताव विचाराधीन आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे:

१. धागा भरकटवू शकणार्‍यांना अनुदान मिळावे.

२. सहा महिन्यात काहीही न केलेल्या सदस्यांना धागा काढण्याची सक्ती करण्यात यावी.

३. मुलाखतींखाली प्रतिसादांची सोय नसावी.

४. गझलांसाठी स्वतंत्र पान उघडून तेथे गझलकारांसकट कोणालाही प्रवेश मिळू नये.

५. मल्टीस्पाईस, वाडेश्वर व गंधर्व येथील मालकांचे गटग आयोजकांशी काही वैयक्तीक संबंध तर नाहीत ना हे तपासले जावे.

६. रिक्षा फिरवण्यास वर्षभराचेच लायसेन्स मिळावे. नंतर स्वतःच्या पायावर (किंवा धाग्यावर) उभे राहून प्रतिसाद मिळवावेत.

७. रोज काही ना काही लिहिणार्‍या आय डीं कडून छोट्या जाहिराती घेतल्या जाव्यात.

८. धरून धोपटणे, कंपूस जमवून पळवून लावणे, चिमटा काढून पळणे, स्फोट घडवणे यासाठी स्मायली असाव्यात.

९. एका तारखेला जास्तीत जास्त चोवीसच तास मायबोलीवर राहता येईल असा नियम असावा.

१०. पडीक असणार्‍या सदस्यांच्या कुटुंबामधील असंतोष घटवण्यासाठी नॉन मायबोलीकरांचे एक वार्षिक गटग ठेवले जावे.

११. गुलमोहरात प्रकाशचित्रांचे विडंबन व मागोव्याचा पुढोवा अशी दोन सदरे अ‍ॅड करण्यात यावीत.

==================================

काही जाणकारांची काही बर्निंग इश्यूजबाबतची चिंतनीय मते:

१. वेड लागलेले लोक आपले हात, पाय आणि डोके भिंतीवर आपटतात. त्यांना जखमा होऊ नयेत म्हणून रबरी भिंती असलेल्या खोलीत ठेवले जाते. अ‍ॅडमीनची विपू ही अशीच एक रबरी भिंत आहे.

२. कावळ्याचा फोटो काढून पेंटमध्ये त्याला हिरवा रंग देऊन जर पोपट म्हणून प्रकाशित करता येत असेल तर ड्यु आय डींना का काढले?

३. मूळ गझलच नसताना पर्यायी गझल येत आहे. हे धोकादायक आहे. मूळ गझल कुठे आहे याचा तपास लावायलाच हवा आहे. यासाठी आम्ही आंदोलन करू.

४. संथ चालती या मालिका हा धागा वेगात सरकतो. यावरून निष्क्रीयपणे दूरवाणीसंच पाहणार्‍यांची संख्या चिंताजनकरीत्या वाढल्याचे सिद्ध होत आहे.

५. झक्की हल्ली कमी लिहितात.

६. श्रावण आला म्हणजे आता भाद्रपद येणार आणि गणेशोत्सव होणार. त्याच्या जाहिरातीच्या निमित्ताने काही निद्रिस्तावस्थेतील जुनी वाहती पाने वर येतील. तेवढेच 'नवीन लेखनाच्या' पहिल्या पानावर काही वेगळे दिसेल.

७. नवीन लेखनात गेल्या केवळ अर्ध्या तासातील लेखन दिसावे. सध्या ७२ तासातील दिसते.

८. सदस्यत्वाला १४ वर्षे ४६ आठवडे झाल्याशिवाय प्रतिसाद देण्याची सोय मिळू नये. (त्यानंतर ती इच्छा उरलेलीही नसते).

९. आजवर मायबोलीवर नाती जोडणे हा प्रकार झालेला नाही. आता सगळेच 'दादा' ठरल्यामुळे जी एक भयाण सात्विकता व्यापून उरलेली आहे ती पाहून डोळ्यात पाणी येते.
========================================

सांस्कृतीक उपक्रमाच्या अंतर्गत खालील उप-उपक्रम आहेतः

========================================

कोडी सोडवा:

खालील प्रतिसादांवरून सदस्य ओळखा:

१. Proud

२. मी येऊ का?

३. विजयजी आले नाहीत का आज?

४. या खालच्या धाग्यावर अश्लाघ्य टीका चाललेली आहे. कृपया उडवाल का? तुमच्या विपूची अवस्था पाहून येणार नव्हते, पण राहवले नाही म्हणून लिहिले.

५. धन्यवाद.... सर

६. हे बघा... ह्यांचे आणखीन दोन ड्यु आय

=====================

प्रवासवर्णने लिहा:

१. बायकोची कटकट ते माबो लॉगीन

२. सहा तास पाच मिनिटे ते पाच वर्षे सहा महिने

३. नम्र सदस्य ते दिग्विजयी सदस्य

४. अधिकृत ते बॅन्ड आय डी

५. कवी ते प्रतिसादक

६. ड्यु आय डी ते मूळ आय डी

=========================

खालील विषयांवर गाणी रचा:

द्रुपाल

'हे पान दिसत नाही'

==========================

यावेळच्या तरही गझलची ओळ

शेवटी देशात आले वेबमास्तर आपले

रदीफ - आपले

काफिया - वेबमास्तर, खार्घर, जुन्नर, उत्तर इत्यादी

वृत्त - बंधनकारक नाही

=========================

समीती निर्माण समीती तर्फे यंदा खालील समित्या निर्माण केल्या गेलेल्या आहेतः

१. धुडगूस समीती - ही त्रिसदस्यीय समीती असून प्रसाद गोडबोले हे अध्यक्ष आहेत. बेफिकीर व भुंगा हे त्यांच्यासमवेत काम करतील.

२. मधाळ प्रतिसाद समीती - चाणक्य, नारदमुनी, चांगभलं

३. मुक्तछंदावरील प्रतिसाद समीती - उल्हास भिडे, उकाका व उल्हास

४. रोमातल्यांसाठी समीती - डॉक्टर, सानी व मिल्या

५. पार्ले प्रवेश समीती - बाई, रीया यांची उपस्थिती व इतरांची अनुपस्थिती

६. पुपु प्रवेश समीती - ही समीती निर्माण होऊ शकली नाही.

७. उच्छाद समीती - नावनोंदणी चालू आहे

८. थैमान समीती - उरलेले सर्व सभासद यात मोडतात असे एका ज्येष्ठांनी सांगितले. पण आमचा विश्वास बसला नाही. इच्छुकांनी दहा दहा भयाण प्रतिसादांचे स्क्रीन शॉट्स दाखवून प्रवेश मिळवावा.

=====================================

शेवटी, ही 'बुजकूज' काही हहंच्या 'कुजबूजच्या' पासंगालाही पुरत नाही, तेव्हा आपल्या सहकार्याने ही वाढवत राहावीत अशी विनंती

=========================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Lol (गंभीर स्मायली अजून उपलब्ध नसल्याने सद्ध्या हीच चालवून घ्या. :P)

>>> आजवर मायबोलीवर नाती जोडणे हा प्रकार झालेला नाही. आता सगळेच 'दादा' ठरल्यामुळे
ट्च ट्च ट्च! अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. Proud

६. दोन चुलत बहिणींचा येथे नव्यानेच प्रवेश झाला. त्यांचे हार्दिक स्वागत. कुमारी कमला सोनटक्के व कुमारी नर्मदा बारटक्के!

दोघी कधीच मेल्या. जोशी बुवांच्या मेलेल्या आत्म्याने सूड उगवला.

Sad

काकाक म्हणून कविता टाकून लाडीक आग्रहास्तव ती कविता या सदरात हालवण्याचे प्रमाणे २६ टक्क्यांनी वाढले. >> Lol

>>मूळ गझलच नसताना पर्यायी गझल येत आहे
>>काफिया - वेबमास्तर, खार्घर, जुन्नर, उत्तर इत्यादी
Lol

हह, आऊटसोर्स करुन टाक. Proud

_/\_

अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. <<< Happy

दोघी कधीच मेल्या. जोशी बुवांच्या मेलेल्या आत्म्याने सूड उगवला<<< माहीत नव्हते. दु:खद घटनामध्ये दिलेत का?

उंदरांची झुंड म्हणते हेच मांजर आपले
<<< Proud

बुजकूज' या नवीन सदराचा 'पायलट' एपिसोड आहे <<< Rofl

मला प्रतिसाद कसे द्यायचे माहीत नाही. हा आयडी मी तिस-यांदा हॅक केला आहे. विशेष म्हणजे आणखी दोन आयडी याच पासवर्डने उघडले. मग इमेल पण हॅक केला. तिथं पण हाच पासवर्ड दिला होता. मेल्स वाचून खूप दया आली. लिहीणं बंद करा म्हणून धमक्या आणि शिवीगाळ याशिवाय इनबॉक्स मधे काहीच नव्हतं. इतक्या धमक्या येऊनही कविता कसा काय लिहू शकतो कुणी ?
(वेबमास्तर हा आयडी पण याच पासवर्डने उघडेल का ? )

बेफिकीरजी माफ करा. ही पोस्ट कुठं टाकावी हा विचार चालला होता तितक्यात तुमचा धागा दिसला.

दोघी कधीच मेल्या. जोशी बुवांच्या मेलेल्या आत्म्याने सूड उगवला<<< माहीत नव्हते. दु:खद घटनामध्ये दिलेत का?

अ‍ॅडमिनचा विपु बघा. कळेल

Happy

मजेदार लिहिलंय बेफिकीरजी.
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
’यावेळच्या तरही गझलची ओळ’ या सदरातील “वृत्त - बंधनकारक नाही” हे फार आवडलं.
चला, म्हणजे आता मुक्तछंदात गझल लिहायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण करता येईल..... Wink Proud
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
मुक्तछंदावरील प्रतिसाद समीती - उल्हास भिडे, उकाका व उल्हास
या समितीतील ’उल्हास भिडे’ व्यतिरिक्त उरलेल्या दोघांना
’शोध’द्वारे शोधायचा प्रयत्न केला..... सापडले नाहीत...
काही वाहत्या पानांचे धागे विशिष्ट लोकांनाच दिसतात तशातला प्रकार आहे की काय ?? Uhoh
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
भा.प्र.
’पुपु’ हा ’पुन: पुन्हा’ चा शॉर्टफॉर्म आहे का ?
अ‍ॅडमिननी माबोतून काढून टाकल्यावर
’पुपु प्रवेश समिती’द्वारे पुन: पुन्हा प्रवेश मिळण्याची सोय असल्यास
ही समिती लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी ही विनंती.

Kiran.. हा आयडी मी हॅक केलाच आहे. आता बेफिकीर हा आयडी ब्लॉक झाल्यास मायबोलीस जुने वैभवाचे दिवस पुन्हा प्राप्त होतील. Biggrin

मित्रांनो
या धाग्यावरची ही माझी पहिलीच पोस्ट आहे. बेफिकीर यांचा मी निस्सीम भक्त असल्याने त्यांचा आयडी ब्लॉक व्हावा असं मला कधीही वाटणार नाही. (माबोकरांचे भोग आहेत ते त्यांनी भोगायलाच हवेत).

लेख अतिशय सुंदर आणि काळजाचा ठाव घेणारा झालेला आहे. भावनातिरेकाने पुढे काही लिहीण्यास मज शब्दच सुचत नाहीयेत.

( आधीच्या पोष्टी उच्छाद समितीतल्या कुणीतरी लिहीलेल्या असाव्यात. गै न. )

शेवटी देशात आले वेबमास्तर आपले
अन पहा गंधर्वातले सगळे वडे खपले...

बेफी उत्तम धागा. मी तुम्हाला झब्बू म्हणून 'मायबोली- एक बुजबुज' असा धागा काढू इच्छितो . एनी ऑब्जेक्शन? (असले तरी गेले उडत :फिदी:)

भारी आहे.
कु. बारट़क्के आणि कु. सोनटक्के या चुलतबहिणी कशा असतील?
Happy

पायलट एपिसोड- यात हसण्यासारखे काय आहे?

Pages