ववि२०१२-वृत्तांत

Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48

मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.

विषय: 

वॉव.. मस्त वर्णन लिहिलंस रीया... मज्जा आली वाचताना...
' माझा आयडी सांगताच आखिल पुरुष मंडळाने स्वतःचे हात मागे बांधून टाकले त्यामुळे यावर्षीच्या सामुहिक रक्षाबंधनाचा कार्येक्रम होऊ शकला नाही.' Lol Lol
आता कशी नॉर्मल वाटतीयेस.. कुणालाही दादा,दीदी न म्हंता.. Wink
थांकु ववि !!!

रीया केवढं लिहिलंस एवढं जर बोलली असतीस तर... Lol

छान वृ Happy

बादवे, गाना गाने के लिये परमिशनकी नहीं युनिफॉर्म की जरूरत होती है Wink

क्या बात है रीया....... वृत्तांत कसा लिहावास हे इतर सभासदांना सांगितलेस... काहीच नाही सोडलेस... आता येतील धडाधड....

धम्माल केलेली दिसतेय सगळ्यांनी.

<<माझा आयडी सांगताच आखिल पुरुष मंडळाने स्वतःचे हात मागे बांधून टाकले त्यामुळे यावर्षीच्या सामुहिक रक्षाबंधनाचा कार्येक्रम होऊ शकला नाही.<<

हाहाहा..रिया! भारी लिव्हलय! Lol

फोटो टाका लवकर... frantic.gif

मस्त वृत्तांत रिया Happy
पुण्याच्या संयोजकांनी काय सादर केले नाही का?? मल्ल्या, हिम्या??

रिया, शाळा सहल... भारीच Happy

अभिषेक जरा बायकोला इच्चारुन ववि पोस्ट बरं Wink

बाकीच्यांचे वृ कुठे आहेत?

ओवी तुझा अनुल्लेख??
हिम्मत माझी Proud
एडिटलं बघ पुन्हा Happy
शुभातै पुण्यातल्या संयोजकांवर मला सांभाळायची कठिण जबाबदारी असल्याने ते बिचारे काहीच करू शकले नसावेत हा माझा अंदाज आहे Wink

माझा आयडी सांगताच आखिल पुरुष मंडळाने स्वतःचे हात मागे बांधून टाकले त्यामुळे यावर्षीच्या सामुहिक रक्षाबंधनाचा कार्येक्रम होऊ शकला नाही.>>>> हे बाकी सही रीया.

अजुन वृतांत येउ द्यात. मुंबईवाले किधर हय?

मायबोली ववि वर्ष दहावे ! या वर्षी पुन्हा एकदा यू, के'ज लाच शिवाय वाढीव फीग्रस्त ववि असला तरीही 'जायचेच' असे ठरवले होते. तरीही संयोजकांकडून 'बोलावणे आल्याशिवाय नाही!' असा बाणा ठेवून (भावी संयोजक, असेही नतद्रष्ट आयडी असतात!) यथावकाश नोंदणी, शुल्क जमा केले. काल कधी नव्हे ते मी बस सुटायच्या वेळेपलीकडे शेवटून दुसरी पोहोचले. ठेन्क्स टू हिम्या. बससमोर घर होते तरीही श्यामली साडे सहा पासून मुलांसकट बसपाशी का उभी राहिली होती कुणास ठाऊक! संयोजनत्व तिच्यात भिनले असावे किंवा कार्याध्यक्ष मयुरेशाचा धाक! (भा. सं. लक्षात ठेवा!) पण तरीही ती सांस्कृतिक समितीची संयोजक होती. वेळेआधी येणे हि आपली संस्कृती नाही. त्यामुळे तसाही तिने नियमभंग केला आहेच. असो. आमच्या मते बस करेक्ट वेळेवर निघाली आणि ‘किनाऱ्या’वर थडकली. तिथे काही सर्वज्ञ लोक आमची वाट पाहत होते. उदा. देवा आणि वेबमास्तर. मीनूपुत्र सिद्धार्थ आणि मीनूपती अतुल अत्यंत खुशीत होते कारण मीनू न आल्याने त्यांना मीनावर्क मधून सुट्टी मिळाली होती. या सगळ्यांचे स्वागत करण्यास धडाडीने पुढे होऊन उतरलेले कार्यकर्ते पुन्हा वर का येईनात म्हणून मी, रूमा व मंजिरीने डोकावताच आम्हाला ते बससमोर अर्धवर्तुळाकारात उभे दिसले. बस हीच एकमेव श्रोता समजून देत असलेल्या भाषणाची साशंकता येताच आम्ही दयाबुद्धीने खाली उतरलो तर काय! ते बसला बॅनर लावत होते. Proud तिथे वेबमास्तराना 'वविवर वावरावयाचे नियम' विषद केल्यावर त्यांनी आम्हास वेबमास्तर व एडमीन यातील फरक ओळखून दाखवला, वर वेबमास्तरांची कोणतीही वर्तणूक एडमीन यांना कळू न देण्याची विनंती वजा सूचना वजा आज्ञा वजा धमकी दिली. त्यामुळे एडमीनने इथून पुढचा वृत्तांत वाचू नये अशी त्यांना विनंती( वजा सूचना वजा आज्ञा वजा धमकी). एवढा वेळ इथेच गेल्यावर काय होणार ओळखा पाहू? अर्थातच मला भूक लागली आणि मीनूची उणीव भासली. मग देवा धावत न येता चालतच आला आणि आम्ही क्रीम रोल्स घेतले. ते पाहून अर्थातच सर्वाना भूक लागली. हिंजवडीला 'वविची बखरसत्ये' या भावी ग्रंथाचे रचनाकार केदार जोशी यांची एन्ट्री ठरली होती.कोरम फुल झाल्यावर वदनी कवळ घेता च्या चालीवर भेंड्या सुरु झाल्या. त्याची सुरुवात अर्थातच मायबोली गीताने झाली.( वर सांगूनही कर्तव्यदक्ष एडमीन वाचत आहेत हे माहित आहे म्हणून - एडमीन वाचू नका.) ते गीत किती जणांच्या मोबाईलवर होते, किती जणांना पाठ होते, त्याचा नोड क्रमांक किती जणांना ठाऊक होता, गीताचा रिंगटोन करून वविला मिस कोल द्यायचे ठरले असताना ही वेळ का यावी इ इ प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. (एडमीन वाचा.) दुसर्या टीमची गाणी नवनवोन्मेषशालीनी रियाच्या एकमुखाने गायली जात होती. त्यातच मधेच मयुरेश आणि मल्लिनाथ असे बलाढ्य नेते उभे असल्याने पलीकडे तिसरे जग आहे असा आम्हाला संशय येत होता. रियाला मधूनच गाणी आणि नॉर्मल बोलणे यांच्या आवाजाच्या पट्ट्या वेगळ्या असतात हे समजावून द्यावे लागत होते. बस मधली एकूण एक लहान मुले हा गोंधळ निर्विकार चेहऱ्याने निमूट बघत बसली होती. ते बहुतेक आम्हाला आदिवासी समजत होते. हल्लीच्या पिढीवर भाषण द्यायला एकही ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व बसमध्ये उभे नसावे याचे आम्हाला वाईट वाटले. आमीर खानला कळवायला हवे. (भा. सं. ल. ठे!) वाजत गाजत बस मुक्कामी पोहोचली. कुणीही सैरावैरा धावत न सुटता शांतपणे नेमून दिलेल्या खोलीत सामान ठेवायला गेले. मग तिथून नाश्ता. तिथे मात्र मायबोली गीत स्पीकर वर लावण्यात आले आणि क्षणभर सारेच भारावून गेले. तेव्हाच चहाच्या वेळी मायबोलीवरील चहा स्लेशमुक्त करून चहान्बाजांना क्लेशमुक्त करण्यात आले आहे हो.....SSSSS यंदा वविची दशकपूर्ती असल्याने बालगोपाळांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्या आधी वेबमास्तरांनी आमचे श्रेय आम्हाला आठवणीने देऊन टाकले.नंतर कोण सांभाळत बसेल? मग रीतीनुसार सगळी वर्हाड स्विमिंग पूल व रेनडान्सपाशी जमले. आर्किमिडीजच्या वाचल्या तत्वाला जागत प्रत्येकाने आपापल्या आकारमानानुसार पाणी बाजूला सारले. (http://www.newton.dep.anl.gov/askasci/phy99/phy99x34.htm) कुणी वरून उड्या मारून, नुसतेच पाय बुडवून काही नवीन शोध लावता येतो का असा चोरून प्रयत्न करत होते. मायबोलीवर ज्ञानेश्वर, तुकाराम, नेहरू, गांधी, शिवाजी, दादोजी कोंडदेव, सावरकर, नेताजी सर्वाना समान न्याय आहे त्यातून आर्किमिडीज कसा सुटेल? चिकार भिजून दमून झाल्यावर मानापानाची चिंता ना करता वधू पक्ष आणि वरपक्षाकडील लोकांनी भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला. मग सांस सरसावली. फराफरा शिट्ट्यांनी डोके उठवले. एकदाचे सगळे आपापल्या टीम मध्ये जाऊन बसले तेव्हा त्या शिट्ट्यांचे आत्मे थंड झाले. अतिशय कल्पक आणि गटबाजीला प्रोत्साहन देणारे सर्वसमावेशक खेळ खेळल्याबद्दल सांस चे कौतुक. (भा. सं. ल. ठे!) अर्थातच त्यात माझी टीम जिंकली. हरलेल्यांना पुन्हा एकदा ठेंगा. या खेळांबद्दल प्लीज कुणीतरी छान सविस्तर पोस्ट टाका. अशी विनंती( वजा सूचना वजा आज्ञा वजा धमकी). खेळ झाल्यावर एक सरप्राईझ आयटम होता पण त्यात कुणीच गर्ल नव्हती. सरप्राईज लिंगनिरपेक्ष नसल्याचे आम्हाला जाणवले. परंतु ज्या मोजक्या कलाकारांनी एक दिवसाच्या तयारीवर पूर्ण पंधरा मिनिटांचे 'संगीत वस्त्रहरण' सादर केले त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांस्कृतिक समितीने दिलेला सुखद सांस्कृतिक धक्का होता तो.त्या सर्वाची नावे कुणीतरी प्लीज लिहा.अशी विनंती( वजा सूचना वजा आज्ञा वजा धमकी). (भा. सं. ल. ठे!)मग सामूहिक फोटोचा कार्यक्रम झाला. त्यात ५-५ केमेरे समोर असल्याने एकूण एक चेहरे बावचळलेले आले असतील तो दोष केमेऱ्याच्या अल्याड पल्याडच्या जिवंत माणसांचा नसून परिस्थितीचा आहे हे कृपया ध्यानात घ्यावे.त्यानंतर चहापान आणि भजी खाऊन झाल्यावर आभार प्रदर्शनाचा सोहळा झाला. त्यात सांस कडून वेबमास्तराना समर्पक भेट देण्यात आली. पितळेचा सुरेख लामण दिवा! आधीच तो घेतल्याने नंतरच्या भाषणात कुणाची कितीही लांबण लागली तरी त्यांना काही बोलता आले नाही. (भा. सं. ल. ठे!) भाषणे संपत नाहीत तोच नेहमीच्या आरोळ्या ऐकू आल्या. 'अमुक रूम ची चावी कुणाकडे असेल तर ती ताबडतोब तमुक कडे द्या.' अर्थातच ववि यथासांग पार पडल्याची चिन्हे दिसली. बरं का मुलांनो,आमची अंत:करणे कापसाची नव्हती वविच्या आनंदात चिंब झाल्यावर परतताना जड व्हायला! किंवा ती मिठाचीही नव्हती तिथेच विरघळून जायला.आम्ही त्यात आठवणी गच्च कोंबून भरल्या आणि त्यांच्यासकट बसमध्ये शिरलो. येताना सराईत गायक श्यामली, देवा आणि साजिरा व अट्टल दंगेखोर (इतर सर्व) यांच्यात चकमक उडाली व काही अजरामर गाणी तसेच काही फुल्यामय गाणी त्यातून निसटली. अशा प्रकारे हा दशकपूर्ती वर्षाचा मायबोली वर्षाविहार २०१२ मोठ्या आनंदात, जल्लोषात पार पडला!

* ही नाव घेण्याची जागा नव्हे तेव्हा कुणी आपले नाव घेतले नाही म्हणून फुगून बसू नये.
* दिवे देण्यासारखे खरंतर काहीच नसते पण डोळ्यापुढे अंधारी आली असेल तर गैरसमजाची पट्टी बांधलेली गांधारी ना होता ट्यूब लावा.
(इथून पुढेच संपादित केले आहे पुन्हा आख्खी पोस्ट वाचू नका. अ‍ॅडमिन तुम्ही पण. )
ता.क. : पुढच्या वेळी मायबोली बॅनरला खालच्या बाजूने दोन मोठ्या गोल खिडक्या कराव्यात म्हणजे संध्याकाळी बस दिवे देत धावतानाही बॅनर झळकत राहील. (शेवटचे, भा.सं.ल. ठे!)

बाकीही रिया, ओवीचे वृत्तांत मस्त. रिया, लग्नाचा आणि वयाचा १८ नंतर काहीही संबंध नसतो. Proud

छान वाटतंय वृत्तांत वाचताना... कोणीतरी उपस्थितांची यादी आणि सां स समितीतल्यांची नावं द्या ना... सां स ने घेतलेल्या खेळांबद्दलही सविस्तर लिहा. Happy

बहुधा त्याने आय डी 'तुमचा' अभिषेक असा ठेवल्याने मिसेसला 'नाहीतरी हा याच सगळ्यांचा' आहे तर आपण एकट्या तरी एन्जॉय करू असे वाटले असावे.

प्रियांका, छान लिहिले आहेस. मस्त वाटले वाचून. यापुढे मायबोलीवर 'हात मागे करणार्‍याच्या घरी बहिणी नाहीत का' अशी म्हण रूढ होईल.

आशूडीचे लग्न झालेले आहे? मग त्यात विशेष काय? तुझेही होईल की? Proud

वविचा वृत्तांत (रीयाने आत्तापर्यंत लिहिला आहे, तो) वाचून फार मजा आली

छान वाटतंय वृत्तांत वाचताना... कोणीतरी उपस्थितांची यादी आणि सां स समितीतल्यांची नावं द्या ना... सां स घेतलेल्या खेळांबद्दलही सविस्तर लिहा>>> + फक्त एक बदल सांस्/संयोजक मधे माझं नाव टाकू नका प्लीज, ह्यावेळी मला फारसा वेळ देऊन सहभागी होता आलेलं नाही. न केलेल्या कामाचं श्रेय काय म्हणून घ्यायचं Happy

अरे व्वा!! आशूचा सविस्तर वृत्तांत आला... मस्तच आशू!
एवढ्या भल्या पहाटे क्रिम रोल कुठे मिळाले?

आशुडी... आली तुम्ही सर्वांनी केलेल्या धमालाची आयडिया..
''संगीत वस्त्रहरण''.. यू ट्यूब वर लिंक टाकेल का कोणी??? नाहीतर आम्हाला हा प्रचंड पॉप्युलर झालेला कार्यक्रम कसा पाहायला मिळेल.. Uhoh

कविता, या वेळी आपण केलेल्या जाहिरातींमध्ये तुझा खुप मोलाचा सहभाग होता, त्यामुळे तुझे नाव यायलाच हवे...

भारी वॄ आशू Happy पण पण <<<बससमोर घर होते तरीही श्यामली साडे सहा पासून मु>> बस समोर घर किती वेळ होते? Wink Proud

गेम्स पक्षपाती होते ! Wink

बेफी, Lol

Pages