The Dark Knight Rises

Submitted by लोला on 21 July, 2012 - 10:56

ज्यांनी पाहिलेला नाही..
त्यांनी अवश्य पहा. IMAX मध्येच पहा. तिकिटे मिळत नसतील(इतके दिवस काय केले?) तर थोड्या दिवसांनी पहा. थांबवत नसेल तर साध्या पडद्यावर पहा मग नंतर पुन्हा IMAX पहा. IMAX मध्ये कितीही वेळा पाहू शकता. दृश्य अंगावर आले पाहिजे. खुर्ची हादरली पाहिजे. Go big or go home!

पुढचे वाचू नका.

---------

बॅटमॅन trilogy मधला हा शेवटचा सिनेमा. दुसर्‍या सिनेमाच्या शेवटी डेन्टला हीरो ठरवण्यासाठी आळ स्वतःवर घेऊन तो संन्यासात गेला आहे..

'बेन' नावाचा अतिरेकी लीडरने Gotham city ला वेठीला धरलेले आहे त्याचा बीमोड करण्यासाठी बॅटमॅन संन्यासातून बाहेर येतो. त्याच्या मदतीला आणि घोळ घालायला कॅट्वुमन ज्युवेल थीफ सेलीना (अ‍ॅन हॅथावे) आहे. चांगली आहे, बघवते. हिचे नाव ऐकून 'काय करते देव जाणे' असे वाटले होते, पण सुखद आश्चर्य. Marion Cotillard सुद्धा थोडक्यात पण ठीक आहे. दुसरी कोणीही चालली असती.

Joseph Gordon-Levitt चा पोलीस ऑफिसर "ब्लेक" मस्त! ख्रिश्चन बेल, मॉर्गन फ्रीमन, गॅरी ओल्ड्मन आणि मायकेल केन आपपल्या जागी चोख आहेत. व्हिलन 'बेन' (टॉम हार्डी) कडून थोडी निराशा झाली. त्याला घातलेल्या मास्कमुळे त्याचा पूर्ण चेहरा कधीच दिसत नाही आणि मास्कमधून येणारा आवाज रोबोसारखा वाटतो. फक्त बॉडी लॅन्ग्वेज आणि अ‍ॅक्शन सीन्स एवढंच मर्यादित राहिल्यामुळे आणि नकळत 'जोकर'शी तुलना झाल्यामुळे तो कमी पडला असं वाटलं. जोकरच बेस्ट होता.

२ तास ४५ मिनिटे लांबीचा असून कुठे कंटाळा येत नाही. cinematography, action scenes, sound इ. चा पूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर IMAX ला पर्याय नाही असे वाटले.

"बेस्ट पिक्चर" वगैरे माहीत नाही, पण निखळ मनोरंजनात चित्रपट कुठे कमी पडत नाही.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कशावर आहे चित्रपट ? स्पॉयलर वॉर्निंग टाकून काहीतरी सांगा की. कारण आम्हाला सध्या बघणे शक्य नाही.
पण नावावरून उत्सुकता वाटत आहे (The Dark Lord Rises शी संबंध असेल का :अओ:)

बॅटमॅनचा सिनेमा आहे ग रुणु. का कोण जाणे पण मला बॅटमॅन आवडत नाही. अजुन एकही त्याचा सिनेमा पाहिला नाहिये मी. Happy हा पहावा की काय?

Na baghtaach awadat naahi mhanta? Asa karu naka! Jaun baghun ya aadhi mag tharwa. Happy

सॉरी, लिहायला उशीर झाला. Happy आता लिहिले आहे.
अमृता, पहा गं. पहिले दोन पाहिले नसशील तरी चालेल. हा आधी पहा. पण नंतर पहिलेही पहा.

जुन्या बॅटमॅन सिनेमांच्या पापकर्मांची शिक्षा 'नोलान-बेलच्या' बॅटमॅनला देऊ नका..
पहिले दोन्ही आणि नवीन आलेला तिसरा सिनेमा अवश्य अवश्य बघाच. !!!

पण हे सिनेमे अ‍ॅवेंजर किंवा आयर्न-मॅनसारखे निव्वळ करमणूक नाहीत त्यामुळे लहान मुलांना दाखवावेत की नाही हे आधी स्वतः बघूनच ठरवा.

बेल, केन (प्रेस्टीज) मस्तच आहेत पण नोलान ने कोटिलार्डला (ईन्सेप्शन) का पकडून ठेवले आहे कळत नाही. बोअर आहे ती बाई.
हॅथवे मात्र ईंट्रेस्टिंग चॉईस आहे कॅटवुमनसाठी.

अर्ध्याच्या वर इन्सेप्शन चा क्रू आहे की. देखनेकू मंगता. cracked.com वर पण पहिल्या दोन व ही बघा असे आहे.
हीथ लेगर / लाजर/ लेजर चा जोकर अजून थरकाप उडिवतो. हॅथवे मला आवड्ते. प्रिसेस डायरीज डेविल वेअर्स प्राडा पासून. Once you see movies in imax, nothing else feels as good.

चमन, अ‍ॅनॅलिसीस लिही की >> Proud
आधी रिझल्ट मग अ‍ॅनालिसिस. रिझल्ट आपल्या बाजूने लागल्यावर अ‍ॅनालिसिस करायची गरज नसते.
फेडररने ऑलिंपिक गोल्ड मेडल जिंकले की सगळेच म्हणतील
'The Great Fedex! A True Champion'
'He truly deserves the no. 1 seed'
'He is the only master of the game with bunch of djokers and pushers around him' Proud

सगळेच म्हंटले बॅटमॅन लई भारी आहे मग कशाला अ‍ॅनालिसिस करायला लागतंय?
असामी तुला पण आवडला ना बॅटमॅन. Wink

पाहिला मी पण. निखळ मनोरंजनाबद्दल +१
मी आयमॅक्स मध्ये नाही बघितला म्हणून असेल पण पहिल्या दोन इतका ब्रूडिंग असा नाही वाटला. मला ही अ‍ॅन हॅथवे अपेक्षेपेक्षा जास्त आवडली. भरपूर तयारी केलेली दिसते. मनगटात नाही जोर अन उसन्या अवसानानी फटके मारतेय असं नाही वाटलं.
इतका खतरनाक वाटणारा बेन ज्यानी आधी इतका सॉलिड मारला बॅटमॅनला, त्याच बॅटमॅन कडून नंतर तोंडावर फटका बसून ते गॅसचे पाईप निघाल्यामुळे लगेच जेरीस येतो हे तितकंसं नॅचरल वाटलं नाही. हेल होल मध्ये जाताना एक तर बॅटमॅन आधीच खुपच टुटेला आणि येक मारेंगा तो बिखर जायेंगा अशा हालतीत दाखवलाय. तिथे त्याचे ट्रान्सफॉर्मेशन इतकं जबरी वाटत नाही आणि त्यामुळे नंतर येउन बलाढ्य बेन ला चांगलाच ठोकतो ते ही जरा अननॅचरल वाटते.
(मॅन ऑफ स्टिलचे ट्रेलर जबरी वाटले, एकदम वेगळा वाटतोय हा सुपरमॅन, पुढच्या समरची सोय झाली Happy )

म्हण्जे चमनची सगळी पोट्दुखी मळमळ खळखळ फेडरर जिंकत नव्हता म्हणून होती तर... !! बाकी अ‍ॅनालिलिसिस, खेळची स्टाइल, मनीबॉल वगैरे सगळं गेलं तेल लावत... Wink

>>गॅसचे पाईप निघाल्यामुळे लगेच जेरीस येतो हे तितकंसं नॅचरल वाटलं नाही
बुवा, उलट तोच एक उपाय असतो त्याला जेरीस आणायचा. तो काढला तर त्याला वेदना होत असतात. विहिरीतला म्हातारा माणून ते बॅटमॅनला सांगतो म्हणूनच तो मुद्दाम मास्कवर मारत असतो.

ते बरोबर आहे. मला फक्त त्या जेल मधल्या (लेम) ट्रेनिंग नंतर एकदम तो येतो आणि बेन ला तोंडावर फटके मारण्याइतका जबरी होतो ते पटत नाही. बेन टोटली इनडिस्ट्रक्टिबल वाटतो, तब्येती आणि आधी केलेल्या बॅटमॅनच्या बेसुमार धुलाईमुळे.

घरातल्या तमाम बच्चेकंपनीसोबत पाहीला. एकच पुतणी मोठी असल्याने तिने व्यवस्थित एंजॉय केला. माझी दोन्ही मुलं अगदीच लहान असल्याने इंटरव्हलपर्यंत त्यांना कथानक अत्यंत संथ वाटलं. आहेच. इंटर्व्हलच्या आधी बॅटमॅनची सुपरबाईक आणि गॅझेटसचं दर्शन होतं पण घडत काहीच नाही. बॅटमॅन मागच्या भागात मार खाऊन आलेला असल्याने त्याची हाडं जागच्या जागी नसतात इतकं कळतं. आता हा कसा साहसी दृश्य देणार असा विचार मनात येतो तोच गतकाळचा विनोदी अभिनेता असलेला आणि आता वृद्ध होऊन तिकडचा ए के हंगल (काका) असलेला अभिनेता त्याला हंगल स्टाईलने "मत जाओ बेटा, मारे जाओगे " अशा अर्थाचे संवाद ऐकवतो. हे ऐकूनच काळजाचा ठाब चुकला. आपला राऊडी पाठवावा का याच्या मदतीला असं अनेकदा वाटून गेलं. आधीचे बॅटमॅनचे सिनेमे मी पण पाहीलेले नाहीत त्यामुळे बच्चेकंपनींच्या शंकांना उत्तरं देता देता तोंडाला फेस आला. रॉबीन बद्दल माहिती होतं पण तो ही दिसला नाही सिनेमाभर. अर्थात ते एक रहस्य असल्यानं सांगत नाही. कॅटवूमन मात्र भन्नाट !

मात्र शेवटची चाळीस मिनिटे एक सेकंदही सिनेमा उसंत घेऊ देत नाही. काही काही दृश्य मात्र साऊथच्या सिनेमावरून घेतलेली असावीत. रजनीकांतच्या एका सिनेमात त्याला खांबाला बांधून लोखंडाने मारत असतात आणि तो हसत असतो त्या सीनची आठवण बॅटमॅन मार खात असतो तेव्हां झाली. याच्या दंडावर नक्कीच रजनीचा ताईत असला पाहीजे म्हणूनच सिनेमाच्या सुरूवातीला टांग तुटलेली असताना, मध्यंतरापर्यंत पाठीच्या कण्यातला एक मणका सरकलेला असताना आणि शेवटच्या रिळात आतड्यांमधे रामपुरी शिरलेला असतांनाही बॅटमॅन दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी अक्षरशः पाताळातून येतो,

पडद्यावर बॅटमॅन हा सुपरहिरोंमधे सर्वात जास्त लाईक केला गेला आहे याचं कारण म्हणजे त्याला कुठलीही सुपरपॉवर नाही हेच असेल. डी सी कॉमिक्सचे जवळपास सर्वच सुपरहिरो पडद्यावर आलेले आहेत. आता फक्त कॉमिक्सबुक मधे सर्वाधिक खपाचा फँटम यायचा राहीलाय... !

तो आला कि माझी ड्युटी सुरू Wink

हो, म्हणूनच विचारलं. Happy कधी केली असेल अंदाज आला नाही.

शो फुल असल्याने आयमॅक्समध्ये चांगली जागा मिळवायला आधी लवकर जाऊन रांगेत उभे रहायचे. मग आत सोडल्यावर पळत जागा पकडायची. मग जरा स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा सगळीकडे हालचाल. पॉपकॉर्न आणायला, ग्रूपमधले उशीरा आलेल्या लोकांना शोधून आणायला. जागेवरुनच हात हलवून 'इकडे या' इ. गोंधळ. मग बसल्यावर लक्षात येणार की सिनेमा मोठा असल्याने बाथरुमला जाऊन यावे, मग पुन्हा मधून बसलेल्या लोकांच्या पायांतून वाट काढत जाऊन यायचे.. इन्टर्वल नसली की असे होते. Happy

शो फुल असल्याने आयमॅक्समध्ये चांगली जागा मिळवायला आधी लवकर जाऊन रांगेत उभे रहायचे. मग आत सोडल्यावर पळत जागा पकडायची. मग जरा स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा सगळीकडे हालचाल. पॉपकॉर्न आणायला, ग्रूपमधले उशीरा आलेल्या लोकांना शोधून आणायला. जागेवरुनच हात हलवून 'इकडे या' इ. गोंधळ. मग बसल्यावर लक्षात येणार की सिनेमा मोठा असल्याने बाथरुमला जाऊन यावे, मग पुन्हा मधून बसलेल्या लोकांच्या पायांतून वाट काढत जाऊन यायचे.. इन्टर्वल नसली की असे होते.>> माझं असं एका हॅरीपॉटर सिनेमात झालेलं. आय मॅक्स मध्ये ती नागीण ( व्होल्डेमॉर्टची) फार मोठी आणि भीतिदायकही दिसते. होली बिग बॅट मूव्ही. Happy

Pages