मायबोलीवरील विचेस्/विझार्ड्स : हॅरी पॉटर .pottermore.com

Submitted by केदार जाधव on 18 July, 2012 - 06:06

हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .

http://www.pottermore.com
या साईट बद्दल .

जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक Happy
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल Happy

आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला Happy

ग्रिफिंडॉर :

Gryffindor.jpg

१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415

हफलपफ :

Hufflepuff.jpg

१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :

Ravenclaw.jpg

१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723

स्लिदरिन :

Slytherin.jpg

१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, युनोहू कडून हाब्लप्रि चा झिंदाबाद नारा !
कष्टाचं सार्थक झालं Proud
नंदिनी, ग्नोम्स फेकून झाले की नाही ? जाम कंटाळवाणं काम आहे ना.

हाय्..मी HollyWitch25704 आहे..मागच्या आठवड्यात तुमच्या सगळ्यांचं वाचून आधी अख्खा हॅपॉचा धागा वाचून काढला आणि मग पॉटरमोअर वर सभासद झाले काल..
माझी आत्ता कुठे सुरुवात झाली आहे..आता तुमच्या सल्ल्यांनी पुढचा मार्ग सोपा होईल, आय होप.. Happy

(पळीने...छडीने नव्हे. चिमुरीसाठी वि सू)>>>>>> Rofl

धन्यवाद रुणुझुणु Happy

मी अजुन पोशन्स बनवण्याच्या भानगडीत पडत नाहिये.. स्पेल्स चा सराव चाल्य आहे.. केदार ला एकदा का होइना हरवता आलं.. प्रसिक मात्र पक्का स्लिदरीयन आहे..त्याला अजुन एकदाही हरवायला जमलं नाहिये Happy

मागच्या आठवड्यात तुमच्या सगळ्यांचं वाचून आधी अख्खा हॅपॉचा धागा वाचून काढला आणि मग पॉटरमोअर वर सभासद झाले काल..>>>>>>> वेल डन मुग्धा... किती छान वाटलं हे वाचुन Happy

क्युअर फॉर बॉइल्स जमलं प्रॅक्टिस करताना...

आता हे फायनल बनवुन मार्क्स कसे मिळवायचे ते सांगा? कुठे जाउन हे पोशन बनवावं लागतं?

रुणुझुणु , हाब्लप्रिं मोड एकदम बेष्ट Happy
घरात कधी साधा चांगला चहा करायला जमला नाही मला आणि इथे पोशन्स करून पॉईंट मिळवतोय Happy

मागच्या आठवड्यात तुमच्या सगळ्यांचं वाचून आधी अख्खा हॅपॉचा धागा वाचून काढला आणि मग पॉटरमोअर वर सभासद झाले काल..>>>>>>> वेल डन मुग्धा... किती छान वाटलं हे वाचुन स्मित >> +१

आज पहिलं पुस्तक वाचून पूर्ण केलं. ट्रॅप डोअर उघडता आला. मी फारच मंद विद्यार्थी आहे. (म्हणजे माझ्यात नेव्हिल लाँगबॉटम असण्याच्या शक्यता असतील का?)

आता हे फायनल बनवुन मार्क्स कसे मिळवायचे ते सांगा? कुठे जाउन हे पोशन बनवावं लागतं? <<<
उजव्या बाजूला वर पोशनचं मडकं आहे त्यावर क्लिक करून पोशनच्या पोस्तकातून पोशन ठरवायचे. जिन्नस नसतील तर खरेदी करायचे. पुन्हा परत येऊन पोशन 'बनवा पर्याय' घेऊन पुढच्या पायरीत पोशन आणि मडकं निवडायचे. किती वेळ लागेल ते दिसेल. स्टार्ट!

त्यावर क्लिक करून पोशनच्या पोस्तकातून पोशन ठरवायचे. >>>>>> तिथे अजुनही प्रॅक्टिस असच दाखवत आहे... तिथुन केलं की फक्त प्रॅक्टिस होतेय.. पॉईंट्स मिळतच नाहियेत

जे पोशन बनवायचे आहे त्याचे इन्ग्रेडिएंटस तुमच्याजवळ असल्यावरच 'पोशन बनवा' हा पर्याय दिसेल.>>>>>>> ओक्के.. म्हणजे आधी सगळं विकत घ्यावं लागेल तर.. ह्म्म्म्म..

धन्यवाद भरत Happy

मुग्धा,
हॅपॉ/पॉमो फॅनक्लबमध्ये सुस्वागतम् !

मी प्रसिक आणि केदारच्या ड्युएलिंगची आव्हाने अजून स्वीकारलीच नाहीयेत. उगीच कशाला त्यांच्या घरांना पॉइंटस वाटत बसायचं ? Wink
सृजनला सुद्धा प्रसिकने ड्युएलिंगचे आव्हान दिले आहे. त्याला आउल आलेलं दिसलं की खुष होतो Lol
प्रसिकला निरोप आहे " उनसे कहना, आपकी चुनौती मैं बादमें स्वीकार करूंगा, अभी नहीं "

बस्के Proud
शैलजा, धमाल ना.

भरतजी, नेव्हिल पण शूरवीर होता की. शेवटी ग्रिफिंडॉरची तलवार त्यालाच मिळते ना.

केदार, धन्यवाद Happy

पोकृ करता करता पाकृ पण जमायला लागल्या तर.....आमचं धनी खुष होऊन जातीला बगा.
कालच एक केक बनवला. इथे फोटो टाकलाय.

चिमुरीला पोशन्स सापडले की नाहीत अजून ?

पोकृ करता करता पाकृ पण जमायला लागल्या तर.....आमचं धनी खुष होऊन जातीला बगा.>>>>>> हॅपॉ चा असाही परिणाम होणार असेल तर कदाचीत मगल च्म विझार्ड मधे रुपांतरही होइल Wink

चिमुरीला पोशन्स सापडले की नाहीत अजून ?>>>> नाही ना.. बाकीच्या पोशन्स च्या इथे इन्ग्रेडियेन्ट्सची लिस्ट दिसते.. त्यात काय आपल्याकडे आहे ते दिसतं अन काय विकत घ्यावं लागेल हेही दिसतं.. क्युअर फॉर बॉइल्स करता काहीच दिसत नाहिये तसं.. मग काय सगळंच खरेदी करु??

चिमुरी, वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये पोशन्स इन्ग्रेडियन्ट्स गोळा करायची होती. नसतील केली तर परत मागे जाऊन घे. मला काही पोशन्ससाठी एकच इन्ग्रेडियन्ट विकत घ्यावे लागेल असे दिसले. पण सध्या कुटत , उकळत, ढवळत बसायला वेळ नाही. काही काही पोशन्सना तीन तास लागतील म्हणे?. पॉलिज्युस पोशनला तर काही आठवडे लागतात ना? की एक पंधरवडा?

रुणु, एकदम धमाल! सद्ध्या ऑफिसमधून जमत नाहीये, नाहीतर मीही आले असते Happy
असंच वाचत राहते मात्र नियमित वेळ मिळेल तसं.
काल हॅपॉ चित्रपट लागला होता एका चॅनेलवर, मी आणि लेकीबाई बघत बसलो होतो मग. Happy

आज मी पहिल्यांदाच पीसीचे स्पीकर्स ऑन ठेवून पॉटर-मोअरवर गेलो. ट्रॅप डोअरमागच्या कुत्र्याचा आवाज खतरनाक आहे. शेवटचा चॅप्टर थोडक्यात गुंडाळलाय.

मला काही पोशन्ससाठी एकच इन्ग्रेडियन्ट विकत घ्यावे लागेल असे दिसले. >>>>> भरत मलाही असच दिसतय.. आणि सापडलं ते पोशन जे मला बनवायचं आहे ते.. बनवायला घेतलय.. आता ४५ मिनीटाने परत बघायचं आहे त्याच्याकडे.. छ्या ऑफिसमधे बसुन करायच्या गोष्टी नाहीत या Wink बघु काय होतय ते..

रच्याकने ड्युएल्स मधे मजा यायला लागली आहे.. Happy

चिमुरी,
साळिंदराचे काटे आणि सापाचे दात विकत घ्यावे लागतील.
हॉर्नड स्लग्ज (म्हणजे काय ?) माउंटन ट्रोलच्या भागात सापडतील.

भरतजी, पोशन उकळायला टाकलं की आपण तिथे थांबायची गरज नसते. अधनंमधनं बघायचं. १०० % पूर्ण झालं की पुढचा भाग आटपायचा.
पॉलीज्युस पोशन बनवणे, ट्रायविझार्ड स्पर्धा आणि आंधळ्या ड्रॅगनच्या भागांची आतुरतेने वाट बघतोय आम्ही. पण एकूणात हे प्रकरण बरीच वर्षे चालणार असं दिसतंय.

शैलजा, वेळ मिळेल तेव्हा नक्की या. मज्जा येते. मलाही दोन दिवस गडबडीत गेल्याने जमलं नाही. पण जेव्हा जमेल तेव्हा चक्कर टाकतेय.

हो हो, त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळताना सुद्धा दिसतं ना Lol

ड्युएलिंगसाठी मी पण उत्सुक आहे. बघू कधी जमतं ते.

पॉलीज्युस पोशन बनवणे, ट्रायविझार्ड स्पर्धा आणि आंधळ्या ड्रॅगनच्या भागांची आतुरतेने वाट बघतोय आम्ही. पण एकूणात हे प्रकरण बरीच वर्षे चालणार असं दिसतंय.>>>>> अगदी अगदी.. Happy

मी ती कुत्र्याची गळणारी लाळ कलेक्ट करायचा प्रयत्न केला होता>>>>>> Rofl भारीच..

हॅपॉ ची पुस्तकं संपली, मुव्हीज संपले तेव्हा वाटलं होतं की झालं एका वर्षात हॅपॉची क्रेझही संपेल.. दिवसेंदिवस नवीन काय काय येतय.. नुस्तं वेड लावलय हॅपॉ ने.. Happy आता पॉटरमोर पुरेल काही महिने किंवा वर्षभर तरी... Happy

भरत Rofl ___/\___

चिमुरी, वर्षभर कुठलं, सगळे भाग उघडायला मला वाटतं चांगली २-३ वर्ष लागतील.
तोपर्यंत फॅन्सचा येडबंबूपणा चालूच राहणार Lol

अधेमधे New from J K Rowling असे येत असते. (कलेक्ट करताना) ते वाचायला मजा येते.

Pages