पेशावरी बैंगन

Submitted by लोला on 17 July, 2012 - 21:34
peshavari baingan
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

८-१० छोटी वांगी
२ वाट्या कांदा (किसून किंवा बारीक चिरुन)

२ छोटे चमचे तिखट
१ छोटा चमचा धणेपूड
दालचिनी, लवंग, वेलची यांची पूड प्रत्येकी अर्धा चमचा
४ छोटे चमचे खसखस- वाटून
१ छोटा चमचा हळद

१ छोटा चमचा वाटलेला लसूण
१ छोटा चमचा वाटलेले आले

१ वाटी दूध
अर्धी वाटी दही
अर्धी वाटी खवा (मावा पावडर चालेल)
पाव वाटी काजूचे तुकडे (ऐच्छिक)

२ छोटे चमचे साखर
मीठ

१ वाटी तेल
दीड वाटी पाणी

वरुन घालण्यास कोथिंबीर, पुदीना(ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

- एक मोठे भांडे, कढई वा पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे.
- वांगी धुवून, पुसून त्यांना + अशी चीर देऊन ती या तेलात थोडी परतून घ्यावी. बाहेर काढून ठेवावी.
- याच भांड्यात उरलेले तेल घालावे.
- गरम झाल्यावर त्यात २ वाट्या कांदा घालून चांगले परतावे, मग खवा (मावा पावडर) घालून परतावे. खाली लागू देऊ नये.
- यानंतर त्यात हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, साखर, लवंग-दालचिनी-वेलची पूड घालावी.
- वाटलेली खसखस व काजूचे तुकडे घालून परतावे.
- मग एक वाटी दूध आणि अर्धी वाटी दही(फेटून एकजीव केलेले) घालावे.
- १-२ मिनिटे परतावे.
- नंतर वांगी घालावीत आणि ४-५ मिनिटे परतावे.
- मग यात दीड वाटी गरम पाणी घालून झाकण देऊन वांगी शिजवावी.
- वरुन चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून वाढावे.
- चपाती, नान, बासमतीचा भात याबरोबर छान लागते. ग्रेव्ही दाटच असते.

pebe.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जण
अधिक टिपा: 

-लवंग-दालचिनी इ. मसाल्याचे जिन्नस आख्खे घेऊन खसखशीबरोबर थोड्या दुधात वाटून घेऊ शकता.
- वांग्याऐवजी बटाटा वापरुन पाहू शकता.

ही जरा "वेळखाऊ", "साग्रसंगीत", "कटकटीची" रेसिपी असली तरी "वेगळी" आणि "यम्मी" आहे.
पार्टीसाठी चांगली वाटते.

माहितीचा स्रोत: 
व्हई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा .. फोटो छान आहे ..

फामर्स मार्केटमध्ये चांगली (बिया कमी, गर जास्त) अशी वांगी मिळत आहेत .. करून बघेन .. Happy

वांगी आणि खवा, दूध, दही, मावा इ. कॉम्बिनेशन बघून टण्याच्या आईने दिलेली एक रेसिपी आठवली .. अजूनही हे काँबिनेशन ऑड वाटते ..

वेळ्खाऊ Proud वेका लोकांचं काम कठिण करून ठेवलंय जनू ...:)
मस्त यम्मी दिसतंय...
घरात वांगं आणलं कीच कटकट Wink पण बटाट्याला चानस द्यवा काय ?

मस्त आहे प्रकार, लालू.
वांग्याकरता खवा, काजू, खसखस वाचून गहिवरूनच आलं.

कातिल!
आत्ताच मसालेदार जेवण झालय तरी तोंपासु!

एकदा पाहुण्यांवर प्रयोग करणार!

अवांतर - माहितीचा स्त्रोत : व्हई. हे काय र्‍हायते?

व्हई मंजी पाककृतींच्या कात्रणांचा / उतरवून घेतलेला साठा. माझ्या आईकडे अशी वही आहे जी बायबल या नावानं प्रसिद्ध आहे.

अरे बापरे, वांग्याला इतके नटवायचे? नटमोगरा सारखे.

इकडच्या वांग्याना सजवले तरी चवीत मार खातात. वांग्याएवजी मटण घालून करणार. मग एक दोन जिन्नस इथे तिथे कमी ज्यास्त काढले की कमी कटकटीचे,सोप्पं शाही मटण असे म्हणता येइल. Wink

मस्त आहेत फोटो. मी आधी फोटो बघून मग रेसेपी वाचत असतो. चार चमचे खसखस घातली तर लोक पेंगणार नाहीत का लोला?

मस्त फोटो. मला अख्खी वांगी खायला जीवावर येतं तेव्हा कदाचित तुकडे करुन बघेन.
>>वांग्याकरता खवा, काजू, खसखस वाचून गहिवरूनच आलं.>> Lol खरंय.

( इथले मेजॉरिटी लोकं त्यात वांगं सोडून दुसरं काहीतरी घालायचा विचार करताहेत Proud )
मी वांगं घालूनच ही रेसिपी करेन हं लोला. फोटो सॉलिड टेंप्टिंग आहे Happy

धन्यवाद.

या ग्रेव्हीसोबत बटाटा, पनीर चालेल. दूध आणि मांसाहार म्हटलं की काही लोक "तौबा तौबा" करतात पण यात मटण-चिकन पळेलच. (तश्या रेसिपीज आहेत, हव्या तर देईन.)

मला तर 'वांगे' म्हटल्यावरच गहिवरुन येते. किती बहुगुणी! साधी हळद, मीठ-मिरचीची भाजी असो, भरीत असो, झणझणीत भरली असोत, काप असोत की अशी शाही डिश. सगळीकडे चवदार लागणार आणि शोभून दिसणार. भाकरीबरोबर साधा मेनूत असो वा पार्टी मेनू.

वांगे अमर रहे!

मस्त पाकृ आणि फोटो. करून बघणेत येईल.

साधारण अशाच शाही ग्रेवीतली वांगी खायला मिळाली होती. त्यातली वांगी वेगळी शॅलोफ्राय करून घातल्याचं कळलं. (नो वंडर अफाट चव होती.)

लोला, रेसिपी आणि फोटो भारी.. नेहमीप्रमाणेच Happy

साधी हळद, मीठ-मिरचीची भाजी असो, भरीत असो, झणझणीत भरली असोत, काप असोत की अशी शाही डिश >> वांगी आवडतातच त्यामुळे नक्की करणार

मान्य आहे पण एक पाककृती राहिली. कुठल्याही मातिच्या मडक्यात वांगी करुन बघा. सोबत लसणीच्या पाकळ्यात घाला. वांगी मातिच्या गाडग्यात जशी शिजतात तशी इतर कशातबीन नाई.

Pages