मंत्रालय

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 12 July, 2012 - 15:13

सन १८२८ स्थळ "शनिवारवाडा"
शनिवारवाड्याचा ताबा घेतल्यावर काही काळ पुण्याचा कलेक्टर रॉबिन्सन वाड्यात राहत होता. पुढे इंग्रजांनी तळ मजल्यावर तुरुंग, पहिल्या मजल्यावर दवाखाना आणि वरील मजल्यावर वेड्यांचे इस्पितळ असा जागेचा उपयोग करण्यास सुरवात केली.
गुरुवार २१ फेब्रुवारी १८२८ रोजी मराठी साम्राज्याचा मानबिंदू असलेल्या जगप्रसिद्ध शनिवारवाड्याला आग लागली.
इंग्रजांच्या ताब्यात असल्याने वाड्याकडे दुर्लक्ष्य झाले होते. त्यामुळे आग लागल्याचे प्रथम समजलेच नाही. भणभणत्या आगीने रौद्र रूप धारण केल्यावर ती विझवण्याचे सर्व मार्ग खुंटले. तट बुरुज वगळता, आतील सर्व इमारती भस्मसात करून आगीचे तांडव शांत झाले.
अस्तंगत मराठी साम्राज्याचे पाईक उघड्या डोळ्यांनी, धुमसत्या काळजांनी आणि हरवलेल्या मानाने नियतीची हि विचित्र खेळी पाहत राहिले.

सन २०१२ स्थळ "मंत्रालय"
विलक्षण साम्य असलेली घटना यावेळी घडली. फक्त यावेळी वाडा इंग्रजांच्या ताब्यात नसून मराठी सरदारांच्या त्याब्यात होता.

असो कालाय तस्मे नमः !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पूर्वी गडावर गवताची गंजी पेटवून जाळ करत, म्हणजे महाराज गडावर सुखरूप पोचले. मग मावळे नि त्यांचे सरदार आनंदोत्सव करत.
आता मंत्रालय नि त्याबरोबर काही कागदपत्रे जळाली हे पाहून बर्‍याच मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला असे ऐकले.