माबो ज्युनिअर मास्टरशेफ- २- स्नो बॉल्स

Submitted by पूनम on 9 July, 2012 - 03:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

या लिंकमध्ये २ ह्या आकड्याखाली दिलेल्या चार्टनुसार 'कप'चे प्रमाण घेतले आहे. तो कप प्रमाण ठेवून-
पाऊण कप पीठीसाखर
पाव कप बटर/ तूप
दोन कप ओट्स
तीन टीस्पून कोको पावडर
एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

बच्चेकंपनीला करता येईल अशी अगदी सोपी पाककृती आहे ही. ह्यात 'नो बेकिंग, नो कुकिंग' असल्यामुळे अगदी सुरक्षित. शिवाय, 'ओट्स' वापरल्याने पौष्टिकही. माझ्या मुलाने ही संपूर्ण पाककृती एकट्याने केली. त्याला खूप काहीतरी 'अचिव्ह' केल्यासारखं वाटलं. त्याच्या मित्राला सहज दोन लाडू दिले, तर त्याने ते दोन्ही गट्टम करून टाकले Lol त्यामुळे तो एकदमच खुश झाला.

प्रथम पसरट भांड्यात बटर/तूप फेटून घ्या.
त्यात पीठीसाखर, इसेन्स, कोको पावडर घालून सर्व सारखे करून घ्या.
ह्या मिश्रणात ओट्स घालून सगळे एकजीव करून घ्या (बराच वेळ लागतो, हा एक प्लस पॉईंट!)
खूप घट्ट वाटले, तर दोन चमचे दूध घाला.
ह्या मिश्रणाचे लाडू वळा. (मुलाला ह्यात हात घालून लाडू करायचे म्हणजे आधी कसेतरीच झाले, मग मी करायला घेतले. माझे पाहून त्याने नंतर चार-पाच केले)
अजून दोन चमचे पीठीसाखर घ्या आणि हे लाडू त्यात घोळवून घ्या.

स्नो बॉल्स तयार!

snow balls.jpg

(काही पीठीसाखरेत घोळवले नाहीयेत, नुसतेच ठेवले आहेत, मोठ्यांसाठी)

वाढणी/प्रमाण: 
छोटे दहा ते बारा लाडू
अधिक टिपा: 

१) खरे तर हे ओट्सचे लाडूच आहेत, पण मुलांची पाककृती म्हणून काहीतरी फॅन्सी नाव!
२) सर्व घटक पदार्थ फक्त एकजीव करायचे आहेत, त्यामुळे खास ज्युनिअर मास्टरशेफ्जसाठीची पाककृती आहे.
३) कच्चे ओट्स वापरायचे आहेत, त्यामुळे लाडू छोटा बांधावा.
४) सर्व व्हेरिएशन्स वेलकम! Happy

तुमच्या मुलांना प्रायोगिक तत्त्वावर जरूर करून बघायला सांगा.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्रामध्ये आलेली पाककृती
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!.. हल्ली जुईला माशे मुळे काहितरी पाककृती करायची असतेच, तिला सांगते ही रेसिपी. Happy

आपली पोरं चांगली कुक होणार.. Happy

अर्रे सही!!

नचिकेत, मस्तच की! Happy शाब्बास!

आता नीरजेला फोटो दाखवते आणि माझ्यामागे भुणभुण लावून घेते Wink

अरे व्वा, छानच,
नक्की करून बघणार. हे लेकाच्या (आणि माझ्याही :डोमा:) आवाक्यातील आहे !
धन्यवाद पौर्णिमा आणि लेकाला शाब्बासकी Happy

मस्तच गं पौर्णिमा Happy

चला आता बाकीच्यांनी पण पटापट रेसिप्या टाका बरं Happy

या सगल्या रेसिप्यांचे धागे मी नंतर 'बच्चेकंपनींना करतायेण्याजोग्या पाककृती' धाग्यावर संकलित करते Happy

छान ग पौर्णिमा Happy

विचार करतेय, राधा(म्हटल्यावर मुक्ता आलीच मागेमागे) ला कामाला लावायला हरकत नाही, आणि आता ती तेव्हढी मोठी असल्यामुळे फार काही घोळ घालणार नाही असं वाटतंय Happy

धन्यवाद Happy
ह्यात ओट्स नको असतील तर मारी बिस्किटांचा चुरा किंवा ब्रेड क्रम्ब्जही घालता येतील असं वाटतंय. हे २ कपांपक्षा जास्त लागतील असा अंदाज आहे. कोणी केलंत तर लिहा. बहुदा आम्ही नेक्स्ट बॅचला ह्यातलं काहीतरी करू Happy

लाजो, धन्यवाद!

रेसिपी मस्तच आहे. Happy

>>> बराच वेळ लागतो, हा एक प्लस पॉईंट!
>>> खरे तर हे ओट्सचे लाडूच आहेत, पण मुलांची पाककृती म्हणून काहीतरी फॅन्सी नाव!
.... रेसिपीत वळणा-वळणार 'आई' डोकावतेय हां. Proud

मागे एका कुकीग शो मधे ओट्सचे असेच लाडू कॅरेमल बनवुन केलेले. पण ते चिकट कॅरेमल आमच्याकडे फारसं आवडलं नाही. त्यामुळे पुन्हा काही ते लाडू बनले नाहीत. Happy

मस्त केलेत की. Happy
नचिकेत शाब्बास.
तु केलेल्या लाडुंना आईने काय कॉम्प्लीमेन्ट दिली ते ही लिही. Happy

पोर्णिमा, टिफीनला द्यायला आणि आपल्यालाही मधल्या वेळेचे स्नॅक्स म्हणुन चांगले आहेत. पण कच्चे ओटस खातात हे मला माहितच नव्हतं. मी नेहमीच ओटसच्या रेसिपीज शोधत असते.

ग्रेट जॉब. नचिकेत , मस्त दिसत आहेत तु केलेले लाडु. नक्की करुन बघू आम्ही.

होलफुड मध्ये एनर्जी बॉल म्हणुन सिमिलर लाडु मिळतात. तसे लागत असावेत अस वाटल. त्यात जवसाची पावडर, कोकोनट फ्लेक्स, न्युटेला किंवा पीनट बटर ,खजुर वगैरे पण असते.

नचिकेत, स्नो बॉल्स मस्तच दिसताहेत. वेल डन. Happy
पौर्णिमा, रेसिपी सुद्धा सोपी दिसतेय. असेही २ आठवड्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताहेत, तेव्हा करायला काहीतरी हवेच आहे Happy

झकास पाककृती! मस्तच दिस्ताहेत लाडू!

>>>बराच वेळ लागतो, हा एक प्लस पॉईंट! Lol

(पुढल्या वेळी पाककृती पण त्याने सांगितल्याप्रमाणे लिही. Happy )

वा! मस्त दिसताहेत लाडू. गुड जॉब नचिकेत. माझ्या पण लेकाला कामाला लावते. Happy
खजूर घालण्याची आयडीया छाने सीमा. ड्रायफ्रूटस पण घालायला हरकत नाही.

मस्तच!!
सही वाटलं असेल नचिकेतला. हा सेन्स ऑफ अचिव्हमेंट लहान मुलांच्या तोंडवर खूप छान दिसून येतो :).

धन्यवाद Happy

होय सुयोग, शक्यता आहे. म्हणूनच-
१) लाडू छोटा करायचा आहे; अथवा
२) दुसरे काहीतरी व्हेरिएशन करू शकता.

आमच्याकडे सुदैवाने कोणाला त्रास झाला नाही.

मी हे लाडू आतापर्यंत तीन वेळा बनवलेत. ह्या सुरेख रेसिपीबद्द्ल धन्यवाद, पूनम. तिसर्‍या वेळी तीळ घालून व्हेरीएशन ट्राय केले. छान झालेत. यंदा संक्रांतीला दातफोड कडक तीळगुळ खाण्यापेक्षा आणि खिलवण्यापेक्षा ह्या रेसिपीने बनवलेले ओट्स + तीळाचे लाडू प्रेफर करेन म्हणतेय. Happy