देवकण - गॉड्स पार्टिकल

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 00:33

माणसाच्या दैनंदिन जीवनात तात्काळ फरक पडणार नसला तरी शास्त्रज्ञांच्या जगात उंच उंच उड्या माराव्याश्या वाटतील असे संशोधन पार पाडण्यात मानवाला यश मिळाले.

आज आपल्या शरीरात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम , लोह व सर्वच्या सर्व घटक हे सूर्यापासून आलेले असून सूर्य हा केवळेक दुय्यम (उद्यानदीप - सेकंडरी - इतर तार्‍यांपासून झालेला) तारा आहे. सूर्यात हे घटक त्याच्या मूळ राक्षसी तार्‍यामधून आलेले आहेत. त्या तार्‍यात ते विश्वाच्या महास्फोटापासून. हा इतिहास चौदा ते वीस अब्ज वर्षे मागे मागे जात राहतो.

प्रश्न असा येतो की उर्जा (एनर्जी) असताना वस्तूमान (मॅटर ) कसे आले? या प्रशाचे तर्कशास्त्रीय दृष्ट्या योग्य उत्तर देण्याचे अनेक प्रयत झाले त्यातील हिग्ज यांची थिअरी सर्वमान्य होण्यात अडचणी आल्या नाहीत.

अनेक दशकांनी ही थिअरी प्रत्यक्षात कशी कार्यरत होईल याचे डेमो जीनिव्हात झाले आणि जल्लोष झाला.

यातून देवकणाचे अस्तित्व मान्य होईल इतपत पुरावे मिळाले.

निसर्गानेच मानवाला दिलेल्या बुद्धीतून मानवाने पार केलेले हे अफाट बौद्धिक विकासाचे टप्पे पाहून स्तिमित व्हायला होते.

उर्जा व वस्तूमान यांच्या अस्तित्वामागच्या अनेक जादूमय बाबी हळूहळू समजू लागतील. दृष्टिकोन पालटू लागतील. अधिक 'वेल इन्फॉर्म्ड' मानवजात यातून निर्माण होईल.

आम्हा सर्वसामान्यांना हे आधुनिक व अद्भुत जग प्रदान करणार्‍या शास्त्रज्ञांना नमन!

==========================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांच्यामुळे वस्तूमान मिळाले हे महत्वाचे आहे असे त्यातून मी समजून घेतले>>>>>>> बेफी यावर इथले मान्यवर अधिक प्रकाश टाकु शकतील..........माझ्या अत्यल्प माहीती प्रमाणे वस्तुमान मिळाले हे महत्वाचे नसुन कण स्वत: निर्मित होतात..हे महत्वाचे आहे........

स्वतः निर्मीत होतात हे विधान 'आकळत' नाही. काहीही निर्मीत होते तेव्हा निर्मीतीसाठी लागणारे घटक आवश्यक असतात. म्हणजे देवकणांसाठी काहीतरी आधीच अस्तित्वात असणार किंवा स्फोटाच्या प्रक्रियेने ते आधी निर्माण झाले असणार. तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे विश्वातील उर्जा कशी निर्माण झाली ते समजत होते पण वस्तूमानाचे समजत नव्हते ते आता समजले असे समजून घेतले Happy

मंदार तु आता गाडी विकुन टाक................. सायकल घे................ व्यायाम सुध्दा होईल ....पेट्रोल चे टेंशन येणार नाही तुला.....:)

मंदार-जोशी | 5 July, 2012 - 06:41
पेट्रोलचे दर कमी होतील का याने?>>>>2014 ला पेट्रोल फुकट मिळणार आहे म्हैतै का तुम्हाला .... Proud

कण स्वत: निर्मित होतात >> याचाच अर्थ मी अविभाज्य आहेत असा घेतला. ते दुसर्‍या उपकणांपासून बनत असतील तर त्यांना स्वनिर्मित कसे म्हणता येइल?

काहीही निर्मीत होते तेव्हा निर्मीतीसाठी लागणारे घटक आवश्यक असतात. म्हणजे देवकणांसाठी काहीतरी आधीच अस्तित्वात असणार किंवा स्फोटाच्या प्रक्रियेने ते आधी निर्माण झाले असणार.>>>>>> हो बेफी..... या कणांचे अस्तित्वच आज लागले....त्यामुळे यांना विघटन करण्यसाठी अजुन २०-३० वर्षे जातील....
.
.----------------------------------------------------------------------------------------
डॉ. बाळ फोंडके

आपले विश्व कसे निर्माण झाले याचे गूढ सामान्य माणसापासून ते वैज्ञानिकांपर्यंत सगळ्यांमध्येच आहे. यासाठी गेली अनेक वर्षे विविध स्तरांवर संशोधन सुरू आहे. या संशोधनाची खरी मुहूर्तमेढ २०१० मध्ये रोवली गेली ती देवकणांच्या चाहुलीमुळे. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर वैज्ञानिक विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपले आहेत , असे म्हणता येईल. हा टप्पाही पार होईल. अशी आशा वाटू लागली आहे.

कोणतेही संशोधन झाले की , त्याचा फायदा काय ? असा प्रश्न विचारण्यात येतो. मात्र सर्वात प्रथम आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे संशोधन हे नेहमी दोन प्रकारचे असते. एक मूलभूत संशोधन जे आपल्या ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी मदत करत असते. संशोधनाचा दुसरा प्रकार म्हणजे उपयोजित , ज्यामध्य संशोधनापासून तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर दैनंदिन जीवनात करण्यात येतो. लार्ज हॅड्रन कोलायडरच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी केलेले संशोधन हे मूलभूत संशोधन असल्याने याच्या फायद्यातोट्याचा विचार करणे चुकीचे ठरेल. हे ज्ञानवर्धित म्हणजेच , ज्ञान वाढविणारे संशोधन आहे.

विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्याची शेवटची पायरी चढल्यासारखे हे संशोधन आहे. विश्वाची निर्मिती ऊर्जेपासून झाली असे म्हटले जाते. मात्र ऊर्जेला आकारमान किंवा वस्तुमान नसते. मग विश्वातील प्रत्येक गोष्टीला आकारमान कसे आले , हा प्रश्न निर्माण झाला. १९६४ मध्ये ब्रिटीश शास्त्रज्ञ पिटर हिग्ज यांनी असा दावा केला की , विश्वाच्या निर्मितीत ऊर्जेबरोबरच आणखी एका कणाची महत्त्वाची भूमिका आहे. याला वैज्ञानिक भाषेत हिग्ज बोसन असे म्हटले जाते , यालाच सामान्य परिभाषेत ' देव कण ' अर्थात ' गॉड पार्टीकल ' असे म्हटले जाते. हिग्ज यांच्या म्हणण्यानुसार तिथे एक असा कण असावा , ज्यामुळे विश्वाला वस्तुमान आणि आकारमान मिळाले. हे शोधण्याचा ध्यास घेऊन बिग बँगचा प्रयोग हाती घेतला गेला.
महाराष्ट्रटाईम्स मधुन--------------

हिग्ज बोसॉन असे मूळ नाव असणारे हे कण 'गॉड पार्टिकल' म्हणून प्रसिद्ध आहेत. हिग्ज कणांमध्ये स्वनिर्मितीचीच क्षमता असते, त्यामुळेच त्यांना 'गॉड पार्टिकल्स' असे नाव मिळाले आहे. या कणांची निर्मितीची प्रक्रिया स्वयंस्फूर्तपणे सुरू असते, असे अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

हिग्ज बोसॉन हे मूलकणांच्या बोसॉन गटांमध्ये मोडतात. या कणांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर, क्वार्क आणि इलेक्ट्रॉन यांनाही वस्तुमान असते, हे सिद्ध होईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. 'गॉड पार्टिकल्स'चा शोध लागल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला होता, त्यावर फर्मी लॅबकडून हा खुलासा करण्यात आला आहे.
.........................................................................................................

मला समजलंय ते असे....

बिग बँग नंतर अनेक कण निर्माण झाले, त्यातले काही मॅटरचे होते तर काही अँटीमॅटरचे. प्रश्न असा होता की या सगळ्या कणांना वस्तुमान कसे मिळाले. त्यासाठी हिग्ज या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असा प्रस्ताव मांडला की बिग बँग नंतर एक ऊर्जा क्षेत्र पण निर्माण झालं जे फार थोडा वेळ टिकलं. इतर कण या क्षेत्राच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना वस्तुमान प्राप्त झाले. कण जितके जास्त वेळा संपर्कात आले तितके जास्त वस्तुमान त्यांना मिळाले.

एखादे ऊर्जा क्षेत्र कशाच्याही संपर्कात आलं तर क्वांटम सिद्धांतानुसार ऊर्जेच्या एका विशिष्ट हिश्याची (किंवा त्या हिश्याच्या काही पटीत असलेल्या ऊर्जेची) देवाण घेवाण होते. जर देवाण घेवाण झाली तर इंटरॅक्शन झाली नाही तर नाही. ऊर्जेच्या विशिष्ट हिश्याला त्या क्षेत्राचा कण म्हंटले जाते. उदा.. विद्युतचुंबकीय क्षेत्राचा फोटॉन हा आहे.

वरील क्षेत्राच्या कणाला हिग्ज कण असे नाव दिले गेले. हा कण आईन्स्टाईन आणि बोस यांच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे वागत असल्यामुळे त्याला हिग्ज बोझॉन म्हंटले गेले.

चिमण, धन्यवाद Happy

या कणांची निर्मितीची प्रक्रिया स्वयंस्फूर्तपणे सुरू असते>>> उदयन, यासाठी तुम्हालाही धन्यवाद

याचाच अर्थ मी अविभाज्य आहेत असा घेतला.>>>>>>> माधव जी....... अविभाज्य म्हणजे ज्याचे तुकडे विभाजन करु शकत नाही.....आणि स्वनिर्मित म्हणजे जे कण स्वतःहुन उर्जा वापरुन आपल्यासारखे कणांची निर्मिती करतात..
अणु अविभाज्य असला तरी तो स्वनिर्मित आहे हे कुणीही मान्य केलेले नव्हते....आणि ज्यावेळी त्याचे विभाजण केले गेले त्यातुन उर्जाच बाहेर आली मग प्रश्न हा उपस्थित झाला....की अणुला वस्तुमान कशामुळे मिळाले.. मग त्यामागे लागल्याने आपल्याला प्रॉटॉन आणि इलेक्ट्रोन हे मुलतत्वे मिळाली आता हे देवकण जे मिळाले आहेत त्यात संशोधनाने असे लक्षात आले की हे कण स्वत:ची निर्मिती उर्जावापरुन स्वतःच करत आहेत.....

हे माझ्या चिमुकल्या डोक्यात मावणार ज्ञान नाहिये त्यामुळे मी जास्त डिटेल नाही कळाल तरी शास्त्रज्ञाना कस्ला तरी त्याना हवा असलेला शोध लागला ह्याचाच आनंद मानतोय, Happy

सगळ्याची अवस्था त्या गोष्टीतल्या आंधळ्यांसारखी झालीये. हत्ती पूर्णपणे कोणालाच आकळलेला नाही. Happy

चिमण, म्हणजे ते क्षेत्र थोड्याच वेळात नाहीसे झाले. मग त्याच्याशी होणारी इंटरॅक्शन (वस्तुमान) आजही कशी दिसते? म्हणजे आज जर ते क्षेत्रच अस्तित्वात नाहीये मग वस्तुमान तरी का आहे?

चिमण, म्हणजे ते क्षेत्र थोड्याच वेळात नाहीसे झाले. मग त्याच्याशी होणारी इंटरॅक्शन (वस्तुमान) आजही कशी दिसते? म्हणजे आज जर ते क्षेत्रच अस्तित्वात नाहीये मग वस्तुमान तरी का आहे?>>>>

अशो तसे नाही Happy

ते दिसते की नाही , असते की नाही हे तपासायलाच तो प्रयोग केला

(म्हणजे हिग्ज यांनी जे म्हणणे मांडले व जे सिद्ध झालेले नसतानाही इतर शास्त्रज्ञांना 'तूर्त पटणेबल' वाटले ते या महान प्रयोगामुळे सिद्ध झाले) Happy

ग्रेटथिंकर | 5 July, 2012 - 16:32 नवीन
कुठे गेले कणाहीन अध्यात्मवादी ?पोपटपंची करायला जमते ,ईथे प्रतिवाद करायला फिरकणार देखील नाहीत.<<

ग्रेटथिंकर भावा, कशाला मध्ये मध्ये भुंकतोयस. चर्चा चांगली चालू असलेली, वाईट दिसतेय का तुला? कशाला उगा अध्यात्मवाद वैगरेची पोपटपंची चालवलेयस.

माधव..............................तुम्ही जन्मातः आंधळ्या माणसाला विचारालात की लाल रंग कसा असतो.. हिरवा रंग कसा असतो.........तर तो तुम्हाला काय उत्तर देणार...........???????????????????
.
.
त्यामुळे सगळेच विश्वाची निर्मिती कशी झाली यावर आपापले तर्क लावुन ते सिध्द करण्याचा प्रयत्न करणारच.......
कोणीच विश्वनिर्मिती कशी झाली आहे ते पाहिले नाही.. Wink

आधीच सांगतो....ह्यात माझा काहीच हात नाही. Wink
अध्यात्मिक लोक आणि हे शास्त्रज्ञ दोघही जे काही बोलतात ते माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला कळण्यापलीकडले आहे...त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा अथवा नाही हे ज्याचे त्यानेच ठरवावे...इतकंच मी म्हणेन.

>> हत्ती पूर्णपणे कोणालाच आकळलेला नाही
तो हत्ती नीट कळायला पार्टिकल फिजिक्स नीट समजलं पाहीजे. ते मला अजिबातच येत नाही. शिवाय सर्व मूलभूत संशोधन हत्ती आणि अनेक आंधळे अशाच प्रकारात मोडतं. प्रत्येक आंधळा आपल्याला काय वाटतं ते मांडतो. मग काही प्रयोग करून त्यातल्या काही आंधळ्यांचं म्हणणं बरोबर येतं व काहींचं चुकतं किंवा थोडं बरोबर येतं.. यातून नवीन हत्ती आणि नवीन आंधळे निर्माण होतात.

>> मग त्याच्याशी होणारी इंटरॅक्शन (वस्तुमान) आजही कशी दिसते?
ते वस्तुमान इतर मूलभूत कणांना मिळाले, ते कण अस्तित्वात आहेत. वस्तुमान हा त्या क्षेत्राचा कायम स्वरूपी परिणाम आहे.

तो हत्ती नीट कळायला पार्टिकल फिजिक्स नीट समजलं पाहीजे. ते मला अजिबातच येत नाही. >> मी आंधळे हा शब्द शास्त्रज्ञांना अथवा कोणत्याही माबोकराला उद्देशून नव्हता वापरला लोकहो. Happy आज जे लेख वाचले त्यात प्रत्येक लेखकाने वेगवेगळी माहीती दिली आहे म्हणून त्यांना उद्देशून लिहिले होते ते. खूप मारा झालाय माहितीचा आज Happy

वस्तुमान हा त्या क्षेत्राचा कायम स्वरूपी परिणाम आहे. >> ओके. स्पष्ट आणि सरळ विधान Happy कळले!

वृत्तपत्रीय बातम्यांमधून जे काही समजलं त्यानुसार..

कण वगैरे स्वतः तयार होतात हे गृहीतक झालं. असं काहीही सिद्ध झालेलं नाही. सत्येंद्रनाथ बोस यांचे संशोधन आईनस्टाईनने एका नियतकालिकात छापून आणले म्हणून तो सिद्धांत बोस आईनस्टाईन सिद्धांत म्हणून ओळखला गेला. या प्रकारच्या कणांना या दोन नावांचं लघुरुप म्हणजे बोसॉन असं म्हटलं गेलंय. मूळ कण बारा वर्गवारीमधे मोडतात. बोसॉन आणि फर्मिटॉन व्यतिरिक्त इतरही वर्गीकरणे आहेत.

या बोसॉन सिद्धांताप्रमाणे वागणारे मूळ कण असावेत असं हिग्ज यांनी म्हटलं. या कणांना हिग्ज बोसॉन नाव दिलं गेलं.

विश्वाच्या निर्मितीदरम्यान मॅटर (द्रव्याचा ) वापर झाला. त्यावेळी असलेलं उणे हजारो अंश सेल्सिअस या तापमानाला महास्फोट झाला असं बिग बँग थिअरी मानते. त्या वेळी निर्माण झालेल्या अतिप्रचंड उर्जेतून आजचं विश्व बनलं आणि त्या वेळी मिळालेल्या गतीने ते आजही विस्तारत आहे. त्या वेळी जे द्रव्य अवकाशात फेकलं गेलं त्याला वस्तुमान देणारे जे मूळकण आहेत त्यांना हिग्ज बोसॉन म्हणायचं.

प्रयोगाचे फाईंडिंग येऊद्यात. गृहीतकं काय होत्या, सिद्धता काय झाल्या, मेथड काय होती, हिग्ज बोसॉनचं अस्तित्व कसं कळालं, उपकरणं काय वापरली हे समजूद्यात.

बिग बँग या सिद्धांताला उभा छेद देणारे काही घटक आहेत त्यावरही प्रकाश पडावा ही माफक अपेक्षा आहे. ...

<बिग बँग या सिद्धांताला उभा छेद देणारे काही घटक आहेत त्यावरही प्रकाश पडावा ही माफक अपेक्षा आहे>
जयंत नारळीकरांची मुलाखत :
http://www.indianexpress.com/news/big-bang-theory-says-the-universe-came...

प्रयोगाचे फाईंडिंग येऊद्यात. गृहीतकं काय होत्या, सिद्धता काय झाल्या, मेथड काय होती, हिग्ज बोसॉनचं अस्तित्व कसं कळालं, उपकरणं काय वापरली हे समजूद्यात.
>>>

ते हजारो संशोधक यडे आणि तुम्ही महान, बास? Proud

चला, असे धागे अप्रकाशित करता येत नसल्यामुळे येथून मी निघतो Lol

Pages