Submitted by नितीनचंद्र on 8 June, 2011 - 06:15
नाद घुमु दे
तडतम तडतम नाद घुमु दे
उच्च रवाने जल बरसु दे
गंध मातीचा त्यात मिसळुदे
मातीला पाण्यात घुसळुदे
तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे
केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे
भिजल्या धारा घोंगत वारा
नवप्रणया नवज्वार चढुदे
आठव सखये ते दिस रुपेरी
नवथर लज्जा तव गाली दिसुदे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आठव सखये ते दिस रुपेरी नवथर
आठव सखये ते दिस रुपेरी
नवथर लज्जा तव गाली दिसुदे
नितीनजी,
कविता आवडली.
कवितेत जोश खुप आहे.
आठव सखये ते दिस रुपेरी नवथर
आठव सखये ते दिस रुपेरी
नवथर लज्जा तव गाली दिसुदे>>>>>>>>>>>>>> वा... सहीच.... मस्त जमलीय कविता
केसात तिच्या मोती
केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे
भिजल्या धारा घोंगत वारा
नवप्रणया नवज्वार चढुदे
>>व्वा..वाह
अल्लड... सुरमय कविता..
मस्त वाटली फ्क्त तरुणाईला जोश
मस्त वाटली
फ्क्त
तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे
जोश मिळुदे एवजी
जोश चढुदे असे बरोबर वाटेल
अरे वा! पावसाच्या टप टप
अरे वा! पावसाच्या टप टप कोसळणार्या सरींची लय आहे या कवितेला. आवडली.
झकास्स्स्स्स्स्स्स
झकास्स्स्स्स्स्स्स
तरुणाईला जोश मिळुदे प्रेमाचे
तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे
केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे
नि३ जी काय काय व्यक्त करायचंय ते किती मोजक्या शब्दात सांगितलंय तुम्ही.
मुख्य म्हणजे पाउस्,हळवा आणि निखळ प्रणय आणि तरुणाईचा जोश सगळं कसं पावसासारखंच जमून आलंय.
खरा खुरा प्रेमिकच हे लिहू शकतो खरंय ना?
पावसाच्या टप टप कोसळणार्या
पावसाच्या टप टप कोसळणार्या सरींची लय आहे या कवितेला. आवडली.>>>>>
सानीच्या या मताशी सहमत.
सर्वांचेच आभार,
सर्वांचेच आभार,
यंदा पावसाने उशीर
यंदा पावसाने उशीर केलाय.
कवितेच्या मंचावर सुध्दा कवितांचा दुष्काळ पडलाय.
कवितेच राहुदे पण पावसा तेव्हड प्यायला पाणी मिळुदे.
चला, यावर्षी पण आला एकदाचा.
चला, यावर्षी पण आला एकदाचा.
आला , या वर्षी आला एकदाचा.
आला , या वर्षी आला एकदाचा.