निराकार

Submitted by अज्ञात on 10 June, 2012 - 07:51

आलो वेस ओलांडून देह जन्म त्वा वाहून
आले गेले निरोपाचे रोप अंगणी लावून

करू पाहिला संसार ऐहिकाचा मुका मार
पळ पळालो बेजार नाही फिटला अंधार
रूप निरूप आकार विरूपाची सोंगे फार
जेहि देखणे पाहिले नाहि भेटला आधार

जळू गेली माया काया छेडली अंगी शततार
राहिल्या न पडदे भिंती दिसू लागले त्या पार
क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार
घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार

सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश
झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास
शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा
राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास

.........................अज्ञात

गुलमोहर: 

क्षणाची उसंत बेतली उलगडले घन संभार
घरटे उसवून उघडले उजेडास मिटले दार

सुटे मोकळे आकाश जीव आता,.. विना पाश
झिंग निराकार अशी ही नको पुन्हा उसने श्वास
शेवटास आरंभाची चिरंजीव वेडी आशा
राहुदेत ध्रुवापाशी अशी चंदनी आरास

नि:शब्द....

धृवापाशी चंदनी आरास म्हणजे काय असते? धावत सुटलेल्या नातवाला धरण्यासाठी मागून वयस्कर व लंगडे आजोबा एकेक पाऊल कसेबसे टाकत जात असतात तसे आम्ही या कवितेमागून चालत राहिलो. वाईट वाटले. नातू गेलाच पळून. इतर अनेक जण त्या नातवाला धरायला धावत होते त्यांनी ते धावणे छान असल्याचेही कबूल केले. त्यामुळे मंत्रायलाला आग लागावी तशी आमची मत्सरी वृत्ती जागृत झाली आहे.

कळावे

गंभीर समीक्षक