माझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..
तो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..
आधी नव्हता असे आई म्हणाली ..
तिला कळतं त्यातलं !! ती वाचते हात !
अन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली !!
तुझ्या ओठांवर ..त्या
खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..
जिथे तू दात चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..!!
पहिल्या भेटीत दिसला ही नव्हता ..
पण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..
तेव्हा अचानक उगवतो तो ..!
तुला आठवतं ?
आपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता
मी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता ?
इतका वेळ, कि निघताना
माझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली
तुझ्या गालावर !!
काल तुझा नवरा भेटला होता
अस्वस्थ ,सैर-भैर काही शोधत होता ..
कपाळावर आठी होती,
का कुणास ठाऊक ..
का कुणास ठाऊक?
मला ती आठी ओळखीची वाटली ..
खरं तर त्या आठी ने ओळख दिली त्याची ..
त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे !!
विनायक
त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे
त्याच्या नशीब रेषेवर डाग आहे म्हणे !!>>>
अरे!मग तुम्ही वाचलातकी,तो डाग नेमका तुमच्या आयुष्य रेषेवर आहे म्हणे!
आवडली.
ग्रेट ..... वेगळाच विषय.
ग्रेट ..... वेगळाच विषय. हाताळलाय देखील मस्त.
अरे वा!..आजच सकाळी मी पण
अरे वा!..आजच सकाळी मी पण असल्याच विषयावर याच शीर्षकाची कविता केलीय फेसबुकवर. छान.
कविता उत्तम आहे मात्र 'आठी'
कविता उत्तम आहे मात्र 'आठी' थोडी अवघड वाटली. आईच्या कपाळावरची आठी व प्रियेच्या पतीच्या कपाळावरची आठी यांची विनाकारण सरमिसळ होते.
उमेशजी: आपली कविता कशी शोधावी?
वाह!
वाह!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
विनायक, छान कविता.
विनायक,
छान कविता.
कविता खूप आवडली. वेगळ्या
कविता खूप आवडली.
वेगळ्या पद्धतीने दु:ख मांडलेय
सही कविता एकदम सही खूप छान
सही कविता एकदम सही खूप छान आहे
सुपर्ब.. !
सुपर्ब.. !