देत जा येऊन थोडी कल्पना !

Submitted by ज्ञानेश on 17 June, 2012 - 03:23

====================

रात्रभर फिरतोस कोठे सांग ना?
देत जा, येऊन थोडी कल्पना...

बोलला 'कैलास' हलवाई पुन्हा,
ओळ घे- तरही जिलेब्या पाड ना ! Wink

शब्द गाण्याचे विसरलो सर्व मी,
राहिली लक्षात पण नृत्यांगना !

गंध ऑफिसात हा कसला बरे?
कोण रात्री खाऊनी आले चना??

'मायबोली' च्या किती फर्माईशी
शेवटी वैतागले राधा-घना *

ही गझल अत्यंत आहे पांगळी
देवपुरकर सर, बदल सुचवाल ना? Happy

-ज्ञानेश.
=====================

(*संदर्भासाठी 'एलदुगो' चा धागा बघणे.)

Rofl

Biggrin Biggrin Biggrin

Proud Proud Proud

Uhoh ( ये कौन साला ऑफिस्मे रोजरोज फिरसे च़ना खा के आ जाता है????............ साला !!! )

Wink

Angry Light 1 Wink

अनुक्रमे प्रतेक शेरासाठी हास्यबाहुल्याचा एक प्रकार

मक्ता जास्त आवडला म्हणून ३-३ ........................

आणि हो तुम्हाला दंडवत (कोपरापासून)

___________/\_____________ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अशक्य आहात बुवा !!!!!!!!

एक विनन्ती :ही कैच्याकै नाही आहे ज्ञानेशजी.......... ही तर आदर्श 'तर' 'ह'-जल आहे !! ज्ञानेश जी ही मराठी गझल मधे हलवाल का ..प्लीज !

जबरदस्त!
हिका मंतात अस्ली गजल! मक्तो भारीच आसा!
तां तखल्लूस कां काय ता सरांचे नावान केलाव ता बरा केलाव. सगल्यांचे गझाली सर परत लिवत्तत तवा आताशीक सगळ्या मक्त्यात त्यांचोच तखल्लुस येवक होया.

डॉ. साहेब नुसती हझल नाही............... 'तर' 'ह'-जल आहे ही
तुम्ही दिलेल्या तरही ओळीचीही चान्गली "खबर" घेतली आहे तीत

छान..

Lol
<सगल्यांचे गझाली सर परत लिवत्तत तवा आताशीक सगळ्या मक्त्यात त्यांचोच तखल्लुस येवक होया> साती, सरांका मालवण्यांचो हिसको म्हाईत असलो तर ते 'गझाली' परत लिवच्या भानगडीत नाय पडूचे.

मुंबैकर मालवणी

Happy Happy Happy

ही गझल अत्यंत आहे पांगळी
देवपुरकर सर, बदल सुचवाल ना?

हे हे हे....

कैलासरावांना १००% अनुमोदन..

स्सॉल्लिडच.........

सातीला साडे.............शंभर टक्के अनुमोदन!!>>>> हा हा हा हा.... वैभव ____/\____

देत जा, येऊन थोडी कल्पना...>>>>>
हि कल्पना काय देउन जाते तुम्हाला???