शाळा

Submitted by Saee_Sathe on 16 June, 2012 - 06:44

शाळेत जायला कंटाळा येतो
शाळा देते त्रास
पण मात्र शाळेत असतात
आपले काही क्षण खुप खास

शाळेचा आज पहिला दिवस
खुप काही आहे मनात
उठले मी सकाळी तेव्हा
फुलपाखरू पुटपुटले कानात

उठ लवकर माझ्यासारखे
बघ बघू माझी शाळा
बिनभिंतींची आहे आणि
नाही खडू, नाही फळा

होतो मी एक अळी
जेव्हा जायला लागलो शाळेत
आता फुलपाखरू बनुन फिरतो
मी त्या सुंदर बागेत

मग कावळेदादा मला
दाखवू लागले काही
मी पण होतो लहान तेव्हा
कधीच रडायचो नाही

भित्रट, घाबरट म्हणायचे सगळे
चिडवायचे ते मला
पण आता हुशार झालो मी
कारण शिकलो मी शाळा

मग भेटला सुर्यमामा
चालला होता शाळेत
म्हणे उशीर झाला मला
घेतील का आता शाळेत

आगीचा मी गोळा होतो
शाळेत जायचोच नाही
पण शाळेत जायला लागल्यापासून
सुर्य झालो मी ही

ओळख माझी मिळाली मला
शाळेत गेल्यामुळे
सगळ्यांचाच मी लाडका झालो
हेच मला कळे

गेली नाहीस शाळेत तु जर
ओळखशील कशी स्वतःला
बोलायलाही विसरून जाशील
सांगशील काय कोणाला ?

हे सगळे ऐकून मात्र
डोळे माझे उघडले
शाळा आवडत नव्हती पण
तिचे प्रेम वाटू लागले

- मृण्मयी शैलेंद्र

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुप छान,
आगीचा मी गोळा होतो
शाळेत जायचोच नाही
पण शाळेत जायला लागल्यापासून
सुर्य झालो मी ही>>>छान कल्पना.

ओळख माझी मिळाली मला
शाळेत गेल्यामुळे
सगळ्यांचाच मी लाडका झालो
हेच मला कळे>>
<<<<मायबोलीच्या बागेमध्ये
...........आपण खुप हुंदडावे
..........काव्यरुपी फुलांवरती
...........सुगंध शिंपडावे>>>>>>

धन्यवाद विभाग्रजजी ! Happy
माझ्या प्रत्येक कवितेवर तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया देता त्यामुळे मलाही नविन कविता सुचण्यासाठी उत्साह मिळतो.
- सई

माझ्या प्रत्येक कवितेवर तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया देता त्यामुळे मलाही नविन कविता सुचण्यासाठी उत्साह मिळतो.>>>>
सई तुझ्या कवितांसोबत बालपनात जाता येते.तू खुप खुप लिहित जा.