दृपालची आरती

Submitted by Kiran.. on 19 June, 2012 - 01:12

th.jpg

सुखहर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची
सेव्हण्या पुर्वी लेख कृपा जयाची

लाथाळी थांबे क्षणाक्षणाची
पाच पाच मिनिटास येई आठवण धाग्यांची

जयदेव जयदेव जय दृपाल देवा
चाहूल मात्रे भरते धडकी मनाला... जयदेव जयदेव

उणीदुणी इथे नित्यप्रहरा
बाफाबाफावर लत्ताप्रहारा
नीलवर्णि तू शोभतो बरा
अंगाई गातसे दमल्या सर्वरा

जयदेव...........
शिवशिवती बोटे शत्रूदमना
कंपू करती फोन एकामेकांना
सरळ झोडावे कि उफराटा बाणा
बाफ कामाचा पेटताहे सरणा
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सर्वर वंदांना
जयदेव..................

- Kiran..

उणीदुणी इथे नित्यप्रहरा
बाफाबाफावर लत्ताप्रहारा
नीलवर्णि तू शोभतो बरा
अंगाई गातसे दमल्या सर्वरा Rofl

कठीण आहेस किरण तू - हसून हसून पुरेवाट झाली - जमलीये आरती अगदी...
अशीच तुझ्यावर (का सर्वांवर) दृपालची कृपा (?) राहो........

Wink

(जय देव जय देव जय मंगलमूर्ती च्या चालीत म्हणावे/वाचावे)

जय देव जय देव द्रुपाल देवा
राहू दे कृपा, करु तुझी नित्य सेवा

लिखाण अमुचे नष्ट न होवो
प्रतिसादही शाबूत राहोत
तु रुष्ट होता एरर येतो
दृपाल-महिमा दृगोच्चर होतो

एकदा झाले, पुन्हा न होवो
ही मनोकामना पूर्णत्वा जावो
माबो आमुची बंद ना होवो
माबो व्यसनाचा सुकाळ राहो

टण्ण्ण्ण! (घंटा वाजवलीये!) Wink

किरण्या, सोवळं नेसून उघडबंब्या उभा दिसलास मला.....:डोमा:

आणि "नवरा माझा नवसाचा" सारखं सचिनच्या आवाजात म्हण आता.....

"देवा तुझा नवस तूच फेडून घेतलास.... तुझी लीला अगाध आहे" Proud

टण्ण....... टण्ण......... Proud

ओम जय जय दृपाला
मेल्या जय जय दृपाला
का तु छळसि आम्हासिं
का तु छळसि आम्हासिं
तोंड काळं कर मेल्या
ओम जय जय दृपाला

धम्माल आहे! फक्कड जमलीये. Proud

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सर्वर वंदांना >>> ही ओळ सगळ्यात महान आहे. Happy

पाच पाच मिनिटास येई आठवण धाग्यांची >>> अगदी अगदी. काल फारच विरह सहन करावा लागला.

किरण्या... कहर आहेस Rofl Rofl
तू खरच द्रुपल ची आरती करत असावास वाटलास.. करशीलही तू!! नेम नाही तुझा..
निंबे, तुझी आरती पण झक्कास!!!

तू खरच द्रुपल ची आरती करत असावास वाटलास.. करशीलही तू!! नेम नाही तुझा..

>>>>> Biggrin वर्षुताई, कसला कॉन्फिडन्स आहे तुला केकेबद्दल! Biggrin

कविता [ व्यन्गारती] आवडली . प......ण ज्याची आरती केली आहे तो देव कोणचा हेच कळले नाही . संगणक अज्ञानी जीव आहे मी . कृपया सांगाल का?
दृपाल कशालां म्हणतात ?

Pages