स्टेम सेल्स आणि कॉर्ड ब्लड बँकींग

Submitted by डॅफोडिल्स on 4 January, 2010 - 13:02

ह्या बिबी वर स्टेम सेल्स आणि कॉर्ड ब्लड बँकींग बद्दल चर्चा करूया.
किती खरे किती खोटे ? काय फायदे तोटे ? प्रिझर्व करावे की करू नये ?
भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्ड ब्लड बँक्स बद्दल माहीती आणि संशोधनाबद्दल चर्चा अपेक्षीत आहे. जाणकारांनी कृपया आपली मते मांडावीत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Benefits असतात असं ऐकून आहे. पण फार खर्चिक प्रकार वाटला. ज्यांच्या कुटूंबियांना cells store न करता लगेच वापरले जातील, त्यांना फायदेशीर असावे.

Stem cell therepy ने कुनाला kidney साथी फायदा झाला आहे का? कोनि हयावर जास्त माहिती सागु शकेल का?

भारतात रिलायन्स अन बायोकॉन यावर काम करतात.

युक्रेनमध्ये एका मराठी मित्राने स्टेम सेल थेरपी चा फायदा घेतला होता. त्यांच्या मुलीला पायांची हालचाल करायला अडचण होती. त्यांना थेरपीचा फायदा झाला होता. मी त्यांना विचारुन सांगतो.

Cancer Research मधे येण्यापूर्वी मी Stem Cell Research Area मधे काम करत होते. Liver आणि metabolizing enzymes हे माझ्या कामाचे क्षेत्र असल्याने Stem cells पासून functional adult liver तयार करणे हे आमचे लक्ष्य होते (अजूनही काम पूर्ण झालेले नाही.. !)
Abortion cases मधे उपलब्ध होणा-या Fetal liver cells पासून किवा delivery नंतर टाकून देण्यात येणा-या Amnion पासून Stem cells मिळवून, त्यातून adult liver तयार करणे हा आमचा research area होता.
अश्या तयार झालेल्या hepatocyte-like cells (hepatocytes म्हणजे liver cells) आमच्या एका पेशंटला therapy म्हणून वापरल्या गेल्या आहेत. He was a patient of Crigler-Najjar Syndrome. हा एक अतिशय दुर्मिळ असा genetic आजार असून यात रुग्णाच्या शरीरातली bilirubin ची पातळी खूप जास्त असते.
आम्ही तयार केलेल्या liver सारखं काम करणार-या cells मुळे ह्या रुग्णाच्या liver मधला bilirubin metabolism हा normal liver सारखा काम करायला लागल्याने त्याची bilirubin level नियंत्रणाखाली येण्यास मदत होत असे.
ह्या रुग्णाच्या शरीराने ह्या therapy ला चागला प्रतिसाद दिला. मागच्या वर्षीपर्यन्त तो जिवंत होता. सध्या माहित नाही.

एक संशोधक या नात्याने ही खूपच आशादायी गोष्ट असली (एकूणच research मधे success पेक्षा failure इतकं जास्त पाहायला आणि पचवायला लागत की हा आशेचा किरण खूप महत्त्वाचा ठरतो- हिम्मत न सोडता काम करत करण्यासाठी .. !)तरीही reliable therapy म्हणून वापरण्याच्या दृष्टीने ह्या क्षेत्रातला research अजून 'बाल्यावस्थेत' आहे. पण जगभरातले संशोधक प्रयत्न करत आहेत.
या पिढीला नाही तरी कदाचित पुढच्या पीढीला या संशोधनाचे फ़ायदे नक्की मिळतील अशी आशा आहे. Happy

या विषयावर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर मला मेल करा. मला शक्य आहे तितकी माहिती सांगायचा मी नक्की प्रयत्न करीन.

(Research करणं सोपं, पण मराठीत सांगणं अवघड.. अशी अवस्था झालीये माझी...त्यामुळे कृपया चु.भु.द्या.घ्या. ) Happy

champak, rar धन्यवाद लगेच रीप्लाय दिल्या बद्दल. पन stem cell therepy चा kidney साथि उपयोग होतो का? कुनाला काही माहित आहे का?

या पिढीला नाही तरी कदाचित पुढच्या पीढीला या संशोधनाचे फ़ायदे नक्की मिळतील अशी आशा आहे.
>>>> रार, रिसर्च इन ऑस्ट्रेलिया मासिकातील मार्च २०१० च्या इस्यु मध्ये 'पोस्ट डॉक डायरी' हे शेवटुन दुसरे पान वाच!
जमल्यास मी इथे स्कॅन करुन टाकेल!

युरोपात राहणार्‍या मराठी व्यक्तीबद्द्ल मी वर लिहिले होते. पण दुर्दैवाने अजुन त्यांचेशी संपर्क करु न शकल्याने अधिक माहिति देउ शकत नाही. क्षमस्व.

त्यांनी भारतात प्रयत्न केले पण तेंव्हा(२००४-५) भारतात हे काम खर्चिक अन लिगली अवघड होते. म्हणुन युक्रेन ला गेले होते. ५००० युरो खर्च आला होता असे सांगितले होते.

Stem cell therepy ने cerebral palsy वर काही positive effect होऊ शकतो का?
Stem cell therepy करणारे मुंबईतील हॉस्पीटल्स, स्पेशालिस्ट,संस्था बद्द्ल कोणी माहीती देऊ शकेल काय?

मध्यंतरी पक्षाघातासारख्या रोगात याचा फायदा होऊ शकतो असे दूरदर्शनवरच्या एका कार्यक्रमात बघितले. स्टेम सेल्स मज्जापेशी निर्माण करू शकतात आणि त्या मृत मज्जापेशींची जागा घेऊन मेंदूचे कार्य सुधारू शकते असे त्यांनी सांगितले. स्टेम सेल्सचे इच्छित जागी प्रत्यारोपण केले की त्या सेल्सना ठरावीक अवयव किंवा एखाद्या अवयवाचा ठराविक भाग बनवायची उद्दिपना कशी मिळते?

स्टेम सेल्स म्हणजे ज्या पेशीपासुन पुर्ण मनुष्य / प्राणी शरीर बनते त्या पेशी. तर त्या मुळे जसे शरीर बनते तसे त्यांना स्पेशली लॅब मधे डेव्हलप केल्यास त्यापासुन शरीराचे अवयव बनवता येतात. (हे विज्ञान किती पुढे गेलेय मला कल्पना नाही, जाणकार सांगतील.)

या सेल्स प्लॅसेन्टा मधे तसे स्त्रीयांच्या मासीक स्त्रावातही मिळतात. वर लिहीलेल्या लिसा रे वर दुसर्‍या सोर्स मधुन सेल्स मिळवुन उपचार केला गेला. पण सद्ध्या तरी हे खुपच खर्चीक काम आहे / असावे.

या पेशी ठरावीक टेम्परेचरला स्टोअर करतात. भारतात वर सांगीतल्याप्रमाणे २ कंपन्या यासाठी फेमस आहेत. डिलेव्हरीच्या वेळी आधी कल्पना दिली तर डॉ. कंपनीने दिलेल्या किट मधे प्लॅसेन्टा स्टोअर करतात. नंतर कंपनी ते बाळ २१ वर्षाचे होईपर्यंत ठेवते. त्यानंतर ठेवायचे का नाही हा निर्णय पुर्णपणे त्या बाळाचा (त्या वेळि २१ वर्षे वयाचा झाल्याने) असतो. आईवडील २१ वर्षासाठी एकदम वा टप्याटप्याने पैसे भरु शकतात. व ही सुविधा मिळवु शकतात. याने त्या बाळाला व जर शरीर साथ देत असेल तर घरातील वा जगातील कोणालाही मदत होऊ शकते.
(काही चुका असल्यास जाणकारांनी सांगावे)

स्टेम सेल्स वापरुन भारतात मधुमेह, केस वाढवणे या साठीही उपचार सुरु झालेत असे नुकतेच वाचले. त्याशिवाय कॅन्सर सारख्या रोगातही वापरता येऊ शकते ( पण अजुन तसे उपचार सुरु झाले नाहीत) असे वाचले आहे. इथे कोणाला माहीती असेल तर नक्की लिहा.

आईवडील २१ वर्षासाठी एकदम वा टप्याटप्याने पैसे भरु शकतात >> पण ज्या रोगंसाठी हे आहे, ते रोग बहुतेक करुन २१ वर्षाच्या आत होतच नाहित ना.

रार, या क्षेत्रातील संशोधने, यशस्वी केसेस / उपचार यांबद्दलच्या माहितीच्या लिंक्स, संस्थळे, कोठे - काय वाचावे याविषयी तुला माहिती देता येऊ शकेल काय?

ते रोग बहुतेक करुन २१ वर्षाच्या आत होतच नाहित ना.>>>> याचा उपयोग फक्त व फक्त त्या बाळालाच नाही तर घरातील कोणालाही होउ शकतो. पण त्या रोग असलेल्या व्यक्तीच्या शरीराने या नविन डेव्हलप केलेल्या अवयवाला / पेशींना साथ दिली पाहिजे.

सेलेब्स मधे रविना टंडनने ही स्टेम सेल्स स्टोअरेज करुन घेतल असे वाचले होते. (हे लिहायची काही गरज होती का इथे :अओ:)

अर्थात रेने केले तसे मासीक पाळीतुन पण स्टेम सेल्स मिळवुन उपचार करता आला तर स्टोअरेजची काय गरज?

(मला जी माहिती आहे ती सर्व वाचलेली आहे हे कृपया लक्षात घ्यावे)

अर्थात रेने केले तसे मासीक पाळीतुन पण स्टेम सेल्स मिळवुन उपचार करता आला तर स्टोअरेजची काय गरज?>> मला वाटते, मेनोपॉझ नंतर साठी.

मोनाली स्टोअरेजची खरच गरज नाही वाटत. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स असतातच. फक्त त्यातून त्या मिळवायची प्रोसीजर वेदनाकारक असते.

माधव, हो अगदी खरे (बोन मॅरो म्हटले की स्मिता पाटील आठवलीच पाहिजे ना Happy तीचा तो पिक्चर हम्म्म्म नाव आठवत नाहिए मला).

पण त्यात लागणारा कुठलाही अवयव / पेशी बनवायची क्षमता आहे का? (हे मीही शोधतेय.)

तिचा तो पिक्चर दर्द का रिश्ता का?
रारजी, उत्तम माहिती. 'बाल्यावस्था' = infancy म्हटलेत तर बाल्याच्या आधीची Wink अजूनी नवजात शिशू सारखी परिस्थीती आहे, अन नेहेमीप्रमाणे काहीतरी panacea आहे असे मेडियात येते.

स्टेमसेल ही जादू नाही. हे तंत्रज्ञान कामात यायला वेळ आहे अजून. आपल्या पिढीत तरी कठीण आहे... पुढच्या पिढ्यांनी मज्जा करावी ही शुभेच्छा.