हे प्रकाशचित्र बनावट आहे का?

Submitted by मास्तुरे on 17 June, 2012 - 05:44

जगातील सर्वात मोठा धबधबा . . . नायगारा . . . तो एका दोरखंडावर ओलांडून जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रणच. मात्र, हे आव्हान पेललं निक वॉलेंडा या अमेरिकन तरुणाने. धबधब्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाकडे असे १८०० फुटांचे अंतर या पठ्ठय़ाने एका दोरखंडावर चालत अवघ्या अर्ध्या तासात पार केले. तोल सांभाळण्यासाठी हातात होती फक्त एक काठी आणि अंगी होता प्रचंड आत्मविश्वास. खाली खोल धबधबा, सोसाटय़ाचे वारे आणि प्रचंड धुकं अशा प्रतिकूल परिस्थितीतही निकने न ‘डगमग’ता हे अंतर पार करत विश्वविक्रम नोंदवला. त्याचा हा विश्वविक्रम ‘याचि देहा याचि डोळा’ पाहण्यासाठी धबधब्याच्या दोन्ही बाजूंना हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

http://epaper.esakal.com/Sakal/17Jun2012/Normal/PuneCity/index.htm

त्याच्या विक्रमाचे हे प्रकाशचित्र. पण हे प्रकाशचित्र बनावट वाटते. धबधब्याच्या पार्श्वभूमीवर हातात काठी घेऊन दोरखंडावर चालत असलेले प्रकाशचित्र अस्सल वाटत नाही. दोन वेगवेगळी प्रकाशचित्रे एकमेकांवर इम्पोझ करून हे प्रचि तयार केले असावे. ही व्यक्ती दोरखंडावर उभी असेल तर त्याच्या वजनाने पायाखालची दोरी वाकलेली दिसली पाहिजे. पण या प्रचिमध्ये त्याच्या पायाखालील दोरखंड एखाद्या लोखंडी बारप्रमाणे ताठ आहे. तसेच त्याचे पाय दोरखंडावर तोल सांभाळताना काहीसे वाकलेले असले पाहिजेत. या प्रचिमध्ये तो दोरखंडावर ताठ उभा राहिलेला दिसतो. या प्रचितल्या व्यक्तीचे उभे असलेले चित्र मूळ चित्रावर नंतर चिकटवले असावे असे वाटते.

n3.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रम जर खरोखर झालेला असेल तर खोटे चित्र कशाला तयार करतील? खरा फोटोच मिळेल तोच वापरतील ना.

धडधडीत सत्यालाही खोटं म्हणायचं..! काय हे मास्तुरे, स्वभाव बदला आता !!! Proud

फोटो बनावट वाटतो, हे खरे. पण

फोटो बनावट वाटतो, हे खरे. पण विक्रम खरा असेल (आहे असे दिसते) तर खोटा फोटो देण्याचे प्रयोजन उरत नाही.

सदर दोरखंड १८०० फूट लांब, दोन इंच रुंद आहे. त्याचे वजन ७ टन इतके आहे. त्यामुळे माणसाच्या वजनाने तो फारसा खाली जात नसावा. सदर फोटो बराच लांबून घेतलेला, आणि फारशी क्वालिटी नसलेला असा दिसतो आहे. त्यात दोराच्या वक्रतेचा हा सूक्ष्म बदल टिपला न जाणे शक्य आहे.

पाय सरळ- चालता चालता निक क्षणभर थांबला असेल, असे समजूया. Wink

.

सकाळ........हा काँग्रेसी पेपर असल्याने........... मास्तुरेंचा विश्वास बसत नाही वाटते............सामना अथवा द हिंदु पेपरात असता तर लगेच विश्वास आला असता... Lol

माझा मित्र आनंद नावडिकर तेथे स्वतः उपस्थित होता. व त्याने हा विक्रम याची डोळी याची देहा पाहिलेला आहे. पाहिजे तर त्याची मेल पुरावा म्हणून देतो.

त्याचा तेथून आलेला ट्वीट
>>Luck to be a witness of this one of its kind event at Niagara Falls ... Nik Wallenda ... What a level of courage, patience !! ... Lots to learn from this guy ...

प्रकाशचित्राच तर माहीत नाही, पण मास्तुरेंच्या ह्या धाग्याच्या निमित्ताने अनेक "बनावट" आयडी इथे दाखल झालेत.

>>> प्रकाशचित्राच तर माहीत नाही, पण मास्तुरेंच्या ह्या धाग्याच्या निमित्ताने अनेक "बनावट" आयडी इथे दाखल झालेत.

Biggrin Lol Rofl

हे मला माहित होतं. मुद्दामच हा धागा काढला. माझं नाव पाहिल्यापाहिल्या इथल्या गांधीवादी डूआयड्यांना जबरदस्त सुरसुरी येणार आणि या प्रचिच्या खर्‍याखोटेपणाची चर्चा करण्याऐवजी ते सर्वजण माझ्या नावाने बोटे मोडण्यातच धन्यता मानणार याची मला खात्री होतीच. असतो एकेकाचा स्वभाव आणि स्वभावाला औषध नाही. स्वतःला डॉक्टर समजणार्‍या इथल्या डूआयड्यांना सुद्धा अशा स्वभावावर औषध सापडणार नाही.

या प्रचिच्या खर्‍याखोटेपणाची चर्चा करण्याऐवजी ते सर्वजण माझ्या नावाने बोटे मोडण्यातच धन्यता मानणार याची मला खात्री होतीच.

धडधडीत सत्यालाही खोटं म्हणायचं..!

धडधडीत सत्य या दोनच शब्दात प्रचिच्या खरे खोटेपणाची शहानिशा संपलि. अजुन काय चर्चा करायचि?

मास्तुरे,
मायबोली परत आल्याच्या खुशित तुम्हाला अनुमोदन देऊन टाकतो!
नक्कीच बनावट आहे ते प्रचि.
खुश रहा!!

हे मला माहित होतं. मुद्दामच हा धागा काढला. >>>>>>>>>>>सणसणीत चपराक लावली लोकांनी तुम्हाला...
"गिरे तो भी टांग उपर" हीच भाजपवाल्यांची अक्कल........ Lol
.
तुमच्या पेक्षा अडवाणी परवडले....किमान पराभव, चुकी मान्य तरी करतात...:खोखो:

मास्तुरेंनी शंका मांडली, काहींनी हे प्रचि खरे असल्याचा निर्वाळा दिला. विषयच संपला.
मग हे वैयत्तिक हल्ले कशाला?

मास्तुरेंनी शंका मांडली, काहींनी हे प्रचि खरे असल्याचा निर्वाळा दिला. विषयच संपला. >>>> मंदार
.
हे मला माहित होतं. मुद्दामच हा धागा काढला. माझं नाव पाहिल्यापाहिल्या इथल्या गांधीवादी डूआयड्यांना जबरदस्त सुरसुरी येणार आणि या प्रचिच्या खर्‍याखोटेपणाची चर्चा करण्याऐवजी ते सर्वजण माझ्या नावाने बोटे मोडण्यातच धन्यता मानणार याची मला खात्री होतीच.>>>> हे असले लिहिल्यावर तुम्ही काय केले असते...
हे वैयक्तिक गेलेले चालते.......... ?? Uhoh

उदयन, कशाला यांना उत्तर देतोयस ,परवा एडमीनसमोर उघडे पाडले होते ईब्लिसने तेव्हा पळुन गेले होते टिकलीसम्राट.

उदय, एक लक्षात घे, तो प्रतिसाद त्यांनी इतर वैयत्तिक प्रतिसाद आल्यावर टाकला आहे. वरचे प्रतिसाद वाच Happy

मीआण्णाहजारे | 17 June, 2012 - 15:52
कार्यक्रम जर खरोखर झालेला असेल तर खोटे चित्र कशाला तयार करतील? खरा फोटोच मिळेल तोच वापरतील ना.
धडधडीत सत्यालाही खोटं म्हणायचं..! काय हे मास्तुरे, स्वभाव बदला आता !!!

उदयन. | 17 June, 2012 - 16:02
सकाळ........हा काँग्रेसी पेपर असल्याने........... मास्तुरेंचा विश्वास बसत नाही वाटते............सामना अथवा द हिंदु पेपरात असता तर लगेच विश्वास आला असता... हाहा

वॉरन बफे | 17 June, 2012 - 16:05
धडधडीत सत्यालाही खोटं म्हणायचं..! काय हे मास्तुरे, स्वभाव बदला आता !!!

खो खो

हसून हसून गडबडा लोळण

सकाळ........हा काँग्रेसी पेपर असल्याने........... मास्तुरेंचा विश्वास बसत नाही वाटते............सामना अथवा द हिंदु पेपरात असता तर लगेच विश्वास आला असता..>>>>>>> हे बरोबरच होते......कारण सामना आणि हिंदु दोन्ही पेपरात उल्लेख नव्हताच..........आणि मास्तुरे कित्येक वेळा "सकाळ" पेपर ला राष्ट्रवादी , काँग्रेसवादी म्हणाले आहेत.. यात कुठे त्यांना वैयक्तिक अपशब्द वापरले ? :अओ:.. Biggrin

अरे उदय, ते कित्येक वेळा काहीही म्हणालेले असूदेत, ह्या धाग्याचा काय विषय आहे? हे प्रचि खरे की खोटे? असा -- मग ते खरे आहे असे सिद्ध झाले. विषय संपला. बाकी इतर बोलायची काय गरज? मला खात्री आहे तू समजून घेशील. इतरांकडून अपेक्षा नाही.

मी पहिल प्रतिसाद विनोदाच्याच दृष्टीकोनाने टाकलेला.....नंतर त्यांचा विषयानुरुप चित्रे शोधुन इथे टाकले.....
नंतर त्यांचा असा प्रतिसाद पाहुन "मुद्दामुन केले वगैरे" त्यानंतरच खालील वाक्य लिहिले...

रच्याक , काल कुठल्यातरी चॅनेलवर या घटनेची माहिती देताना चॅनेलचा निवेदक वारंवार 'नायगारा' चा उल्लेख 'नियाग्रा - नियाग्रा' असा करत होता. त्यामुळे ती बातमी पाहण्यापेक्षा हसण्यातच बराचसा वेळ गेला माझा Wink

सर्वांना धन्यवाद! फक्त ज्ञानेश आणि रेव्यु यांनीच विषयाला धरून प्रतिसाद दिले. पण गांधीवाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच गरळ ओकली. विषय कोणताही असला तरी इथल्या गांधीवाद्यांनी आपल्या उच्च नैतिक गांधीवादी परंपरेनुसारच भाजप, काँग्रेस, अडवाणी, वैयक्तिक निंदा इ. आपल्या प्रतिसादात आणले आहे. त्यामुळे माझी अपेक्षापूर्ती झाली. ते विषयाला धरून बोलले असते तर माझा जबरदस्त अपेक्षाभंग झाला असता. अपेक्षेनुसारच प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा गांधीवाद्यांना विशेष धन्यवाद!

Biggrin

तो फोटो बनावट आहे का ही प्रामाणिक शंका मास्तुरेंनी बोलून दाखवली. इतर काही लोकांनी ते खरे असल्याचा निर्वाळा दिला. मग आता ही बाचाबाची कशाला?

११ सप्तेंबर च्या घटने नंतर सकाळ मध्ये एक फोतो प्रसिध्द झाला होता. एक पर्यटक WTC च्या गच्चीवर उभा आहे आणी मागून विमान येत आहे असे त्यात होते. WTC च्या भग्न अवशेषात एक कॅमेरा सापडला आणी त्यात रोल डेवेलप केल्यावर हा फोटो आला असे त्यात होते. तो बनावट होता हे नंतर कळाले.