नुकत्याच केलेल्या काश्मिर सहलीची प्रकाशचित्रे - भाग ३ - श्रीनगरच्या गळ्यातील हार - दाल सरोवर

Submitted by अतुलनीय on 13 June, 2012 - 02:38

आम्हाला काश्मिरबद्द्ल समजलेली हकीकत -

फार पूर्वी तेथे एक सरोवर होते. त्याचे नाव सतीसर (सती - पार्वती - हिमालयपूत्री - तीच्या नावाचे सरोवर). त्याने आजच्या अखंड काश्मिरचा प्रदेश व्यापला होता. चारही बाजुस पर्वत व मध्ये अथांग सतीसर. तेथेच कश्यप ऋषी त्याच्या २ पत्नींसमवेत राहात असत. पहीली दिती - जीची प्रजा ही दैत्य म्हणून ओळखले जात. दुसरी पत्नी आदिती - जिला काहीही मुले-बाळे नव्हती.

त्यामुळे कश्यप ऋषी सुर्याची कठोर तपःच्चर्या करतात. सुर्यदेव त्यांना प्रसन्न होऊन १३ अंडीरुपात बालके देतात. ती सर्व अंडी एका बंद खोलीमध्ये ठेवण्यास सांगतात व एक अट घालतात. दर महिन्याला एका अंड्यातून एक बालक जन्माला येईल पण संपूर्ण १३ महिने झाल्याशिवाय खोलीचे दार ऊघडून सर्व १३ बालकांचे दर्शन घ्यायचे. अधे-मधे खोली ऊघडायची नाही. पण १२ महिन्यांनंतर आदिती न राहवून दार ऊघडते, तो काय सुर्यासारखी तेजस्वी अशी १२ बालके १२ अंड्यांमधून जन्माला आलेली असतात. तेरावे अंडे तेथून खोल व अथांग अशा सतीसरमधे अद्रुष्य होते. त्या बारा बालकांना १२ राषी तसेच १२ महिन्यांचे स्वामी बनवले जाते. तरीही त्या १३व्या न झालेल्या पूत्राबद्द्ल कश्यप ऋषी व त्यांची पत्नी शोक करु लागतात. कश्यप ऋषी पुन्हा एकदा भगवान शंकरांची कठोर तपःच्चर्या करतात. भगवान शंकर प्रगट होतात व आपल्या त्रिशुलाने एका बाजुचा पर्वताचा भाग तोडतात, त्यातून सतीसरचे बरेचसे पाणी वाहून जाते. याप्रकारे कश्यप ऋषींच्यामूळे काश्मिर भाग निर्माण झाला आहे. कश्यपवरुन काश्मिर असे नाव पडले आहे.

१३ वे अंडे एका जागी सापडते व त्यामधुनसुध्धा एक तेजःपुंज बालक जन्माला येते. त्याचे नाव मार्तंड असे ठेवण्यात येते. (त्याचे व सुर्यदेवांचे मंदिर अनंतनागजवळ आहे.) या तेराव्या बालकाला त्याची इतर १२ भावंडांनी आपापल्या महिन्यातील एअक दिवस द्यावा असे ठरते. त्यामूळे दर ३० महिन्यानंतर युणार्‍या "अधिक मासा"चा अधिपती हा मार्तंड आहे. असा समज आहे.

प्र.चि. १ - चार्-चिनार -
Chaar Chinar.JPG

प्र.चि. २
JK_MG_2440.JPG

प्र.चि. ३
JK_MG_2442.JPG

प्र.चि. ४
JK_MG_2445.JPG

प्र.चि. ५
JK_MG_2451.JPG

प्र.चि. ६
JK_MG_2452.JPG

प्र.चि. ७
JK_MG_2458.JPG

प्र.चि. ८
JK_MG_2523.JPG

प्र.चि. ९
JK_MG_2610.JPG

प्र.चि. १०
JK_MG_2611.JPG

प्र.चि. ११
JK_MG_2614.JPG

प्र.चि. १२
JK_MG_2676.JPG

प्र.चि. १३
JK_MG_2677.JPG

प्र.चि. १४
JK_MG_2685.JPG

प्र.चि. १५
JK_MG_2686.JPG

प्र.चि. १६
JK_MG_2760.JPG

प्र.चि. १७
JK_MG_2766.JPG

प्र.चि. १८
JK_MG_2793.JPG

प्र.चि. १९
JK_MG_2811.JPG

प्र.चि. २०
JK_MG_2813.JPG

प्र.चि. २१
JK_MG_2814.JPG

प्र.चि. २२
JK_MG_2817.JPG

प्र.चि. २३
JK_MG_2828.JPG

प्र.चि. २४
JK_MG_2829.JPG

प्र.चि. २५
JK_MG_2837.JPG

प्र.चि. २६
JK_MG_2851.JPG

प्र.चि. २७
JK_MG_2858.JPG

प्र.चि. २८
JK_MG_2861.JPG

प्र.चि. २९
JK_MG_2863.JPG

प्र.चि. ३०
JK_MG_2894.JPG

प्र.चि. ३१
JK_MG_2895.JPG

प्र.चि. ३२
JK_MG_2905.JPG

प्र.चि. ३३
JK_MG_2907.JPG

प्र.चि. ३४
JK_MG_2909.JPG

गुलमोहर: 

फोटो छानच आहेत. १ प्रश्ण.

१२ महिन्यांनंतर आदिती न राहवून दार ऊघडते, तो काय सुर्यासारखी तेजस्वी अशी १२ बालके १२ अंड्यांमधून जन्माला आलेली असतात. तेरावे अंडे तेथून खोल व अथांग अशा सतीसरमधे अद्रुष्य होते. त्या बारा बालकांना १२ राषी तसेच १२ महिन्यांचे >>> महिन्यांचे माहिती नाही. पण काही राशींना (जसे मकर व कुंभ) एकच स्वामी आहे ते कसे मग?

जाणकार सांगाल का?

सुंदर.

व्वा... सर्वच प्रचि सुंदर!!! आणी काश्मीर ची कथा ही खूपच इंटरेस्टिंग!!!
प्रचि.२७ मधे कोणता पूल दिस्तोय??

मस्त