डास व त्याचे चावणे

Submitted by भरत कुलकर्णी on 9 June, 2012 - 16:33

आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका.

डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात. तुम्ही घरे बंद ठेवा, जाळ्या लावा, आजूबाजूला असणारे पाण्याचे साठे साफ करा, आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवा आदी अनेक उपाययोजना करूनही डास कुठेतरी असतातच.

डासांच्या चावण्यापासून टाळण्याजोगे उपाय खालीलप्रमाणे आहेत:
१) मच्छरदाणी लावून झोपणे:- झोपेपुरता हा उपाय रामबाण आहे पण मनुष्य सारखा दिवसभर घरात काही झोपूनच राहत नाही. काममाजाच्या वेळी डासांचा त्रास हा होतोच.
२) गुडनाईट, कासवछाप वा तत्सम डासांकरताच्या वड्या, द्रव, चक्री जाळणे:- हा उपाय करून डास खरोखर पळतात की नाही यावर आपल्याला अनुभव असतोच. डास या वड्यांनाही दाद देत नाहीत हे खरेच.
३) शरीरावर डासांविरूद्ध असलेले मलम चोपडणे:- हा खर्चीक उपायदेखील दररोज करून कंटाळा यायला लागतो.
४) इतर काही उपाय (जे मी केलेले नाहीत पण आंतरजालावर शोधले असता सापडले):- जसे:- शरीरावर वेगवेगळे रासायनीक औषधे लावणे, कोरफडीचा रस लावणे, लिंबूरस लावणे आदी. (पण हे उपाय डास चावल्यानंतर होणार्‍या वेदना कमी करण्यासाठीचे आहेत/ असावेत.)

आताशा काही मोबाईल अ‍ॅप पण तयार केलेले आहेत पण त्याबाबत शंका आहे. काही ईलेक्ट्रॉनीक किट्स पण बाजारात आहेत की ते अल्ट्रासाउंड आवाज बाहेर टाकतात की त्यामुळे डास पळून जातात. हा उपाय कितपत योग्य आहे?

डास घरात शिरू नयेत किंवा शिरलेल्या डासांनी चावू नये किंवा कमीतकमी चावावे (!) यावर काय काय उपाययोजना असू शकतात?

त्याचप्रमाणे डास चावण्यामुळे होणार्‍या वेदना कमी कशा करतात?

वरील काही युक्त्यांपेक्षा निराळ्या युक्त्या मिळाल्यास सर्वांचे प्रबोधन होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारणतः संधिप्रकाशाच्या वेळी दिवस मावळताना डास घरात येतात . त्यावेळी दारे खिडक्या बन्द ठेवल्यास ७५ टक्के घरातल्या डासांची संख्या कमी होते.(नेमके त्याच वेळी आपण दारे खिडक्या उघड्या ठेवतो). डास अंधारातून उजेडाकडे जातात असेही वाटते. त्यामुळे रात्री घरात अन्धार करून डास विरोधी अस्त्रे लावल्यास बरेचसे डास बाहेर जातात. बाकी डास आता बहुसंख्य आयुधाना पुरून उरतात असे दिसते. डास न चावता त्याची नुसती गुणगुणही झोप उडवून त्रस्त करते व जागरण घडवते... विषय गम्भीर आहे.

गुडनाईट, कासवछाप वा तत्सम डासांकरताच्या वड्या, द्रव, चक्री जाळणे हे सर्व बकवास उपाय आहेत, त्याऐवजी वाळवीचे वारुळ, वाळव्यांनसहीत शोधून घरात आणायचे, एका घमेल्यात लाकडे पेटवून ती विझल्यावर(निखार्‍यावर) वाळव्यांच वारुळ, वाळव्यांनसहीत ठेवून चांगला धूर निघायला लागल्यावर झोपायच्या ठीकाणी (उश्याशी) ठेवून मस्त पैकी ताणून द्यावी, रात्रभर एकही मच्छर तुमच्या जवळपासही फिरकणार नाही.

अंगाला दारु लावुन झोपावे . शास्त्रज्ञांनी हे सिध्द केले आहे की डास दारु पित नाहीत. Biggrin त्यामुळे दारु च्या वासाने ते जवळ येणार नाही .

अंगाला दारु लावुन झोपावे . शास्त्रज्ञांनी हे सिध्द केले आहे की डास दारु पित नाहीत. खो खो त्यामुळे दारु च्या वासाने ते जवळ येणार नाही<<<

अंगाला दारु लावून दारुची नासाडी करण्याऐवजी, दारु पिऊन झोपावे म्हणजे मच्छर चावलेले कळणारच नाहीत.

यापेक्षा एखाद्या सुसंस्क्रुत व्यक्तिला शोभेल असा एक उपाय आहे- कडुनिँबाचा पाला कुठेही मिळतो. तर एका घमेल्यात तीन चार पुठ्ठ्यांना आग लावावी. व त्यावर हा लिँबाचा पाला टाकून धुर करावा. यायोगे डास तर मरतात शिवाय घरातले अपायकारक जीव जंतू ही मारले जातात.

हे वाळवीचे वारुळ रोज कुठून आणणार? वाळवी पाळावी लागेल अशाने. कडूनिंबाचा पाला जाळायचा म्हटला तरी कडुनिंबाचे झाड असावे लागेल आणि इतके पुठ्ठे रोज जाळण्यासाठी उपलब्ध असावे लागतील.

आमच्याकडे सद्ध्या डास नाहीत. कशाने गेले माहित नाही. कशाने येतात तेही कळत नाही. आले की काळं हिट् मारुन झोपून जायचं एवढंच करते. काळं हिट बर्‍यापैकी इफेक्टिव्ह आहे. पण हळूहळू डास त्यालाही जुमानणार नाहीत.

डास होऊच नयेत यासाठीच खबरदारी घेणे हाच उपाय. पण घर स्वच्छ ठेवले तरी परिसराचं काय? सगळीकडे उच्छाद मांडला गेला की पालिकेचे कर्मचारी औषध फवारतात.

केमिकल्स (लिन्ब्याच्या

केमिकल्स (लिन्ब्याच्या पाल्यासकट) ने सफोकेशन होण्याची भीती वाटते. रोज श्वासातून औषधे फुफ्फुसात जाणेही इष्ट नाही ना?

हो बाजो. केमिकल्स (अर्थात काळं हिटही) रोज इन्हेल करणे वाईटच. म्हणून आधी हिट मारुन दुसर्‍या खोलीत जाऊन बसायचं आणि नंतर गाई गाई. नाईलाजको इलाज क्या? झोपेचं खोबरं, डास चावून चावून अंगाची आग, मलेरिया, जागरणामुळे पित्तं होणे इत्यादी गोष्टींपेक्षा हे कमी वाईट.

बाजोंनी सांगितलेला उपाय ब्येस्ट.

मी सगळ्या खिडक्यांना (स्वैंपाकघराची वगळता) नेटलॉनच्या जाळ्या केलेल्या आहेत. ह्या जाळ्या वेलक्रो वापरून बसवतो. दिवेलागणीला ह्या जाळ्या संपूर्ण खिडकिला लावायच्या आणि सकाळी खिडकीच्या एका बाजुला गुंडाळून ठेवायच्या. गुंडाळी पडद्याआड सहज बसते. बाथरुम / टोयलेटचे दरवाजे संध्याकाळ ते सकाळ आठवणीने बंद ठेवायचे.

जाळ्यावर धूळ जमते पण त्या काढून धुता येतात. आणि तो व्याप मला केमिकल वापरण्यापेक्षा चांगला वाटतो.

>>विजय_आंग्रे | 10 June, 2012 - 12:07 नवीन
1
Vote up!

अंगाला दारु लावुन झोपावे . शास्त्रज्ञांनी हे सिध्द केले आहे की डास दारु पित नाहीत. खो खो त्यामुळे दारु च्या वासाने ते जवळ येणार नाही<<<

अंगाला दारु लावून दारुची नासाडी करण्याऐवजी, दारु पिऊन झोपावे म्हणजे मच्छर चावलेले कळणारच नाहीत.
<<
सकाळी उठल्यावर आजूबाजूला झिंगून पडलेले मच्छर चपलेने मारूण टाकणे. (नै तर दुसर्‍या दिवशी तुमच्या 'बार' मधे परत येतात अन येतांना स.कु.स.प. / इ.मि.प. सह येतात)

घराला जाळ्या बसवाव्यात,
चायना मेक ची एक ब्याट मिळते. त्याने थोडेफार घरात घुसलेले डास मारून टाकावे. व्यायामही होतो.

वैधानिक इशारा: छतावरील डास मारण्यासाठी स्टूल इ. वर चढू नये. स्टुलावरून पडून हेड इंज्यूरीने मेलेला एक इंजिनियर माझ्या माहितीत आहे.

तिन्हीसांजेला घर उघडे ठेवू नये. घरात पाणि वगैरे साठवून ठेवू नये. सांदी कोपरे कायम स्वच्छ करत रहावे. त्याने घरात डास वास्तव्य करत नाहीत.
ते काळं हिट तर काही कामाचं नाहिये Sad

एक वैज्ञानिक निरीक्षण:

डास जेव्हा दारू पिलेल्याला (म्हणजे फुल्ल टाइट) किंवा गुंगीचे औषध घेतलेल्या व्यक्तीला चावतात तेंव्हा त्यांची (पक्षी: डासांची) रक्त शोषून घेण्याची झडप बंद होत नाही आणि त्यामुळे पोट फुटून डास मरतात.