मायबोलीची ओळख व अनुभव

Submitted by दीप्स on 26 March, 2009 - 03:39

नमस्कार मित्रांनो ,

इथे तुम्ही तुमची मायबोली ह्या साइटशी ओळख कशी झाली , तिथे आलेले अनुभव हरकत नसेल तर शेअर करु शकता Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली हे नाव मला माझ्या नवर्‍याकडून कळलं होतं. तेव्हा घरी नेट नव्हतं. नवरा ऑफिसमधून मा बो वर टाईमपास करायचा आणि मला घरी येऊन गमती जमती सांगायचा. (तेव्हा इथं देवनागरी टायपायची सुविधा नव्हती बहुतेक. मिंग्लीश होतं म्हणून नाहीतर माझा नवरा मा बो च्या वाट्याला गेलाच नसता!) तेव्हाच 'मा बो' हे नाव मनात नोंदवून ठेवलं होतं. ही २००४-०५ च्या आसपासची गोष्ट असेल.
दरम्यान मिंग्लीश मध्ये काही-बाही लेखन चालू केलं होतं.
घरी नेट आल्यावर इथे एक व्हीजीट मारली. लेखन प्रसिध्द करायचं म्हणून मेंबरशीप घेतली. तेव्हा इथे नूतनीकरण चालू होतं. त्यामुळे 'नवीन लेखन आत्ता प्रसिध्द करता येणार नाही' असा मेसेज दिसायचा नेहेमी. इतर कुठल्याही लिंक्सवर क्लिक करायच्या फंदात मी तेव्हा पडले नाही. स्वतःचं लेखन करण्याव्यतिरिक्त इथे अजूनही काही असू शकतं हे तेव्हा माझ्या नेट-बालबुध्दीला लक्षातच आलं नाही. (नवर्‍याच्या टी.पी.चे किस्से ऐकलेले असूनसुध्दा!) त्यामुळे अधून मधून इथे येऊन फक्त नूतनीकरण पूर्ण झालं की नाही ते पाहून जायचे. असं सात-आठ महिने केल्यावर वन फाईन डे मा बो चं बदललेलं रूप स्क्रीनवर झळकलं. मग हळूहळू मी माझं लेखन प्रसिध्द करायला सुरूवात केली. एक दिवस अचानक डावीकडे 'विचारपूस' या शब्दाशेजारी कंसात १ हा आकडा दिसला. (तेव्हा विचारपूस, सदस्यत्व, जाण्याची नोंद इ. लिंक्स डावीकडे असायच्या.) तेव्हा कळलं की इथे 'विचारपूस' असा एक प्रकार पण असतो आणि मा बो वरचं कुणीतरी माझ्याशी बोलतंय. मला जो काही आनंद झाला की विचारता सोय नाही!
माझ्या लेखनाला इथे लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला, माझा हुरूप नेहेमीच वाढवला त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. एक दिवस माझा ओबामावरचा लेख मुखपृष्ठावर दिसायला लागला आणि सोबत पल्लीचं रेखाटन सुध्दा. त्यादिवशीही (आश्चर्याच्या धक्क्यासहित) अतिशय आनंद झाला होता.
हळूहळू माझ्या लेखनाला आलेल्या प्रतिक्रियांतून, वि.पू.तून ओळखी वाढायला लागल्या. आणि मग एक दिवस चिमणनं (चिंतामणी गोखले) 'कट्ट्या'चं आमंत्रण दिलं. सुरूवातीला मी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती कारण चिमणनं सांगितलं होतं की आम्ही काही मित्र तिथे गप्पा मारतो. मी म्हटलं आपण काय करणार तिथे जाऊन... पण अनेकांच्या विचारपुशीत कट्ट्याचा वारंवार उल्लेख यायला लागला. मग एक दिवस थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर तिथेही व्हिजीट मारली आणि तेव्हापासून कट्टर कट्टेकरीण झाले आहे. तिथे चिमण, अँकी, दीप, केदार, रुनी, कविता, दक्षी, नयना, परेश, स्वाती, विनय, मंजी, राज्या (अजून अनेकजण)... सगळे मिळून जी धमाल, टाईमपास, टवाळक्या, बडबड, चटरपटर करतात ना त्याला तोड नाही. कधी कधी असं वाटतं की आपण महत्वाची कामं टाकून उगीचंच वेळ घालवतोय पण जी महत्वाची म्हणून कामं असतात ना ती झक्कत आपण करतोच. पण असा टी.पी. करायला मात्र मिळेलच असं नाही. थोडक्यात काय, तर कट्ट्याशिवाय आताशा चैनच पडत नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईकर कट्टेकर्‍यांचं गटग झालं. पण मी तेव्हा जाऊ शकले नाही. मी खूप हळहळले. (ही माझी सिग्नेचर त्यानंतरच केलेली आहे. मी ना पुण्याच्या गटग ला जाऊ शकले ना मुंबईच्या... तेव्हा कट्ट्यावर ही कॉमेंट झाली होती :हहगलो:)
आता यानंतरच्या गटगची मी वाट पाहतेय... अर्थात, तोपर्यंत कट्टा आहेच आणि मा.बो. आहेच!

~~~
कट्टे की लली, ना पुणे की, ना मुंबई की Sad

नीरजा ने त्या वेळी, गणा पाव रे, या गाण्यावर ( गाणे म्हणत ) नाच केला होता. धमाल पावसात भिजलो होतो सगळे. ( मलाही त्यावेळी या मुलीला इतकी लोकगीते कशी येतात असे वाटले होते ) दक्षिणा ने पण एक धमाल गाणे गायले होते. मुर्गीचे बहुतेक.

पुढेही एकदा सिंहगडावर गेलो होतो, त्यावेळी क्षिप्रा, आरती, जी एस वगैरे होते. मिहीर, सोनचाफा पण होते. सगळी रात्र जागवली होती. सई पण होती. तिने, ने मजसि ने, हे गाणे सुधीर फडक्यांच्या चालीवर गायले होते. जी एसने पण एक गाणे गायले होते.
पुढे सगळेच भेटत गेले. जुन्या मायबोलीकरांपैकी अनेक जणाना मी प्रत्यक्ष भेटलोय.

२४ ऑगस्ट २००६
"ते काही नाही... आपणही लिहायचं इथे. आजवर नुस्तच वाचलं... नाही आवडलं कुणाला तर नाही आवडलं. शिकू, सुधारू... आणि अगदीच नाही जमलं तर? .. तर मग वाचतच राहू..."
धीर करून पहिली कविता इथे लिहिताना हा आणि हा एकच विचार होता मनात.

त्या पूर्वी कुणीतरी बोलता बोलता म्हणालं होतं, मायबोलीडॉटकॉम वर जा ना.... चांगलं लिहितायत. मी आपली "myboli" शोधतेय. शेवटी सापडली एकदाची. कवितांमधे जास्तं मन होतं म्हणून तेच वाचलं जायचं.
लिहायला सुरूवात करण्याच्या साधारणपणे पाचेक महिने आधीतरी मी मायबोलीवर येऊन फक्तं वाचायचे. आधी कविता, अगदी क्वचित ललित आणि कथा. बाकीच्या बीब्यांचा तर पत्ताही नव्हता.
तोपर्यंत एकेक आयड्या बघितल्या होत्या. निनावी, लिंबूटिंबू... म्हटलं खर्‍या नावाने लिहित नसावेत... काय आयडी घ्यायचा बरं? आपण काही फारसं लिहिणार नाही.. उगीच येता जाता आवडलं तर "व्वा! छान!" म्हणणार. त्याचवेळी मी पुलंचं "दाद" वाचत होते. ज्यात त्यांनी पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना, काही पत्रोत्तरं असा खजिना आहे. म्हणून घेतलेला आयडी ’दाद’!

आयुष्यातली अगदी पहिली कथा "रुबिक क्यूब आणि कृष्ण", इथे लिहिली. मग जमतय म्हणताना व्यक्तिचित्रण लिहिलं.
मायबोलीवर लिहू लागणं, सातत्याने लिहीत रहाणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम वाचायला मिळणं, शिकायला मिळणं ह्या सगळ्या सगळ्याला काही पूर्व सुकृताची जोड असणारच. त्याशिवाय का, मायबोलीकरांचं प्रेम आणि प्रोत्साहन वाट्याला आलय?

अनुल्लेख, सुचना, रोख-ठोक प्रश्नं, मला इमेल करून दिलेल्या धमक्या, माझ्या लेखाला उद्देशून दुसरीकडे टोमणा इत्यादी माझ्याही वाट्याला आलं.
त्यातूनच, स्वत:ची "सो कॉल्ड" कलाकृती वगैरे अलिप्तपणाने बघण्याची एक नवीन सवय लागली. एखाद्याने सांगितलेलं, पटलं तर घेतलं, शिकलं, स्वत:ला सुधरलं.... नाहीतर कृष्णार्पणमस्तू! हे एकदा ठरवल्यावर लिहिणं आणि त्यावरल्या अपरिहार्य प्रतिक्रिया सगळच एकदम "सहज" होऊन गेलं.

ज्या माणसांना अजून बघितलेलंही नाही अशांकडून इतकं उदंड प्रेम,असं तसं शिकायला आणि फॉर्मली शिकायला (गजल कार्यशाळा) मिळालं की, आज ह्या सगळ्या सगळ्यांना माझ्या मनात माझ्या जिवलगांसारखं जवळचं स्थान आहे. पुढे-मागे कधी हातून काही चांगलं लिहिलं गेल्यास त्याचं अधिकतम श्रेय मायबोली, तिची पिल्लं, त्यांचं प्रेम, प्रोत्साहन आणि दटावणी ह्यालाच असेल.
असो...

अजून कुणालाच प्रत्यक्षं भेटले नाहीये. येत्या डिसेंबरात मुंबईला जाईन तेव्हा कदाचित भेटी-गाठी होतील... इथे येणार्‍या लेखांना, चित्रांना, प्रतिक्रियांना... चेहरा, स्वर लाभेल...
(दिपू, ह्या अफलातून हिगू साठी साष्टांग नमस्कार!)

मला इमेल करून दिलेल्या धमक्या >>> अरे बापरे.. असेही अनुभव आलेत मा.बो वर चक्क इमेल मधून धमक्या बापरे... Sad

अजून एका आयडी ला असे अनुभव आलेत ऐकले होते...

पण म्हणजे नक्की कसल्या धमक्या होत्या.. असे होणे हे फारच गंभीर बाब आहे Sad

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

झक्की, गल्ली चुकलं काय वो तुमचं?

असं दिसतंय Wink
वयोमानाप्रमाणे कुठे लिहायचंय हे लक्षात रहात नसावं त्यांच्या. Wink

मायबोलीशी माझी ओळख कशी झाली ?

१९९९ ला नविनच नोकरी चालू झाली होती. संध्याकाळी सहजच गूगल वर टी. पी करत मी मराठी असं सर्च मारलं .. मायबोलीची लिंक मिळाली.. बकुळीची फुलं वाचायला मज्जा आली. छान वाटायच. पण मग तिथेच हितगुज ची लिंक सापडली. म्हण्ट्लं बघु तरी काय आहे.. काहितरी अगम्य मिन्ग्लिश मधे मोठ्या मोठ्या पोस्ट्स दिसल्या.. भिति वाटली. काय तो उरक लोकांना मराठी इंग्लिश मधे लिहिण्याचा Lol

मधेच कधीतरी आठवण आली की मी बकुळीची फुलं वेचायला यायची. हो वेचायलाच. एका छानश्या डायरीत लिहिलेली आहेत अजूनही माझ्याकडे.

नंतरच्या वर्षभरात मी मायबोली विसरून गेले .. २०००ला पुन्हा नव्याने आले मायबोली वर ..पुन्हा हितगुज वर काय आहे नविन पाहिलं तर आश्चर्य.. काही पोस्ट्स शुद्ध मराठीत होत्या. त्यातच झुळूक सापडली.. आपण् सुद्धा एखाद दुसरी पोस्ट लिहुया म्हणून बघितलं तर सभासद व्हा ही लिंक दिसली. हे सगळं नविन होतं वापरायच नाव.. कदाचित वेगळं असेल म्हणून dafodils23 असा माझा ईमेल आयडी होता तोच वापरला. याहूचा आयडी पण टाकला रजिस्ट्रेशन मध्ये. Happy झाले साभासद. झुळुकेवर पोस्ट टाकली.. डायरितली Happy मग काय मिळाले फटके.... इथे फक्त स्वत:च्या चारोळ्या लिहाव्यात. Sad
मी नविन आहे मायबोलीवर ..ठिक आहे.. म्हणून माफी मागितली.

प्रश नावाचा एक आय्डी होता त्याने मला याहूवर अ‍ॅड केले. याहूवर मिन्ग्लिश मध्ये गप्पा मारायला शिकवणाराही तोच. आणि मग मला मित्र मैत्रिणींचा मोठ्ठा ताफाच मिळाला. प्रशांत माझा दादा झाला. मोठा भाउ. त्याकाळीही कंपुबाजी होती.. जुने नवे मायबोलीकर वाद होते. काही टवाळखोर होते .. आणि एक महान बिबी होता. जीटीपी नावाचा ..जनरल टाईम्पास.. कुणी नवं पाखरू दिसलं मायबोली वर की त्याला बोलवायचं जिटीपी वर .. आणि मग काय्....फुल्ल टू धमाल. हहपुवा Lol .. मला याहूवरच्या कॉन्फरन्स मधे आधीच प्रेमळ धमकी वजा इशारा दिला गेला.. आम्ही कुणी असल्या शिवाय तिथे जायचे नाही. Lol

वेल्दोडा, योगिबियर्, हवाहवाई, एक रसिक, राना, रसिकयश, प्रसादशीर, परागकण, राधाटी, नंदिता, जुईर, मस्तानी, प्रभा, अथक असे बरेच जण होते. जिटीपी वरून याहूवरून मग आम्ही काही जणांनी भेटायचे ठरवले. शैलू त्याची बायको आरति, मस्तानी (सुखदा) असे आम्ही वैशालीला भेटलो. खूप मस्त वाटलं .. असे कुणितरी आयडी कुठे ओळख झाली आणि प्रत्यक्ष भेटलो. Happy

पुण्यात एक मेगा जिटिजी झाला.. त्याकाळी त्याला AMBA म्हणायचे. तो तब्येत बरी नसल्यामुळे मी मिसला. प्रसाद शिरगाव्कर तेव्हा महान विडंबनं लिहायचा. त्याला भेटायचं होतं वाकड्याला भेटायचं होतं, झक्कींना बघायचं होतं. आणि बरेच महान कवी येउन गेले .. सग्गळ्ळं मिसलं. वाईट वाटलं.

मग मुंबईला जिटीजी ला दिनेश्, राना, जुई, प्रश, सत्यजित, राधा असे १५-२० जण भेटलो. पुण्याहून मी सुखदा, आणि अंबर गेलो..सकाळी जाउन संध्याकाळी पुण्याला परत. जाम धमाल केली.
परत येतानाच जुन मध्ये पावसाळ्यात सिंहगडावर एक जिटीजी करायचाय असा विचार अंबर ने बोलून दाखवला. मग आम्ही तिघांनी मिळून ठरवले. सुखदा म्हणे पावसाळी सहल .. मी म्हण्ट्लं नको.. वर्षा विहार छान वाटेल. केली योजना.. मेलामेली फोनाफोनी याहूच्या चाटा कॉन्फरन्स करुन ठरला मग कार्यक्रम.

इथे वर बरेच् जणांनी आपापले अनुभव सांगितले आहेतच सिंहगडाच्या जिटीजी चे.
अज्जुक्का, अर्चिल, नात्या, सत्यजित, अंतूबरवा, राना, मन्या, क्षिप्रा, सोनचाफा, सायबरमिहीर, पेशवा, दक्षिणा, मॅग्गी, दिनेशवीएस, मयुरेशके असे बरेच जण आले होते.

अ‍ॅडमिन च्या भारतभेटीचे औचित्य साधून त्यानाही वेळात वेळ काढून प्लिज या असे आग्रहाचे आमंत्रण दिले. मला स्वतःला अश्या माणसाला भेटायची फार उत्सुकता होती. मायबोलीसारखी साईट निर्माण करून केवढं मोठ्ठ काम केलंय त्यांनी. त्याना शतषः धन्यवाद. ते आले.. म्हणून सिंहगडाचा जिटीजी संस्मरणिय ठरला.

मायबोलीने मला काय दिले ? ... खूप काही .. शब्दात सांगता येत नाही.. चांगलं वाचायला शिकवलं...बोलायला शिकवलं..खूप सारे स्नेही दिले..आणि मला सर्वस्व दिलं. Happy होय. सर्वस्व. Happy

असं म्हणतात कि लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेल्या असतात.. माझ्यासाठी अ‍ॅडमिनच ब्रह्मदेव Happy
त्यांनी आम्हा उभयतांना आशिर्वाद दिला..:)
मग काय सिंहगडाच्या जिटिजी नंतर सुरू झाली एका लग्नाची गोष्ट....

****************
पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे... Lol

मस्तच लिहिलेस गं डॅफो Happy बकुळफुलांची डायरी घेऊन ये आता जीटीजीला

शैलजाला अनुमोदन... डॅफो सहीच... Happy

जुनी मंडळी आहेत कुठे सध्या? राना सोबत ठाण्याच्या GTGला गेलो होतो तेव्हा राधाटी, नंदिता, जुईर, प्रभा, सत्यजित यांची भेट झाली होती... तेव्हाच GTPचा महिमा पण कळला होता...

good site
need help in marathi font
so many words i could not type
Can u pl guide us?
Vaidehi

कामानिमित्त जर्मनीतील कार्यालयात जावे लागले. कुटुंबापासुन दूर असल्यामुळे वेळ जात नव्हता, सारखी घरची आठवण यायची. मेल तपासणे, मराठी वर्तमान वाचणे ही दोन कामे वगळूनही वराचसा वेळ मिळायचा. गुगल अर्थ डाऊनलोड करुन माहितीतील सगळी ठिकाणे परत-परत बघुनही कंटाळा यायचा. २२ जानेवारी २००८ रोजी सहजच गुगलवर मायबोली टायपले आणि काय चमत्कार. साक्षात्कारच झाला. मायबोलीचा पडदा समोर आला. झटकन सभासद झालो. इतर वाचन करीत असतानाच विचारपुसीत फुलांच्या गुच्छासहीत स्वागत. घाबरत-घाबरतच झकासरावला विचारपुसीतुन रामराम केला. मग आमचे दररोजचे संभाषण चालू झाले. दरम्यान मा.बो. वरील वाचनाचा प्रचंड साठा संपतच नव्हता (संपणारही नाही. पुन्हा पुन्हा वाचावे, पहावे अश्या अगणीत साहित्याने नटलेली आमची मायबोली..). सुरवातीला काही तांत्रिक अडचणींमुळे बि.बि या प्रकारात मला लिहिता येत नव्हते. दरम्यान मायबोलीचे नुतनीकरण चालू होते. गोबु फारच नाराज होता या प्रकाराने, नंतर त्यालाही सवय झाली. फारऐडंचे क्रिकेटवेड, दिनेशदांचे झाडांवरील ज्ञान,

मी माबोवर रजिस्टर वगैरे केलं आणि मग तीनेक वर्षं काही न काही कारणाने इथे फिरकलोच नव्हतो...
इथे नाही आणि कुठेच नाही Sad

साधारण दीड वर्षापूर्वी अचानक माझा ब्लॉग सुरू केला... आणि त्याच सुमारास विनय देसाईशी बोलताना माबोचा विषय निघाला.... मग माबोवर पुनरागमन झालं. मग मिसळपाव समजली आणि मिपाकरही झालो.

ब्लॉग, माबो आणि मिपामुळे देशोदेशीचे खूप चांगले स्नेह जुळायला लागले..... मागच्या भारतभेटीत पुण्याला मायबोलीचा मस्तपैकी कट्टा ही झाला Happy

<<झक्की, गल्ली चुकलं काय वो तुमचं?>>

कुणाच्या तरी इ-मेलला मराठीतून उत्तर लिहीण्यासाठी मी इथे लिहीले, नंतर ते इथेच राहिले! लक्षात राहिले नाही डिलिट करायचे. (डिलिटला मराठीत काय म्हणतात?)

डिलिटला मराठीत काय म्हणतात?>> नष्ट करणे, मिटवणे, पुसणे, नाहीसे करणे.

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मी मा.बो. वर पहिल्यांदा केंव्हा आलो ते नेमकं आठवत नाही पण चार-पाच वर्षं झाली असतील. माझं लक्ष वेधून घेतलं ते कवितांनी. खूप छान-छान कविता वाचायला मिळायला लागल्यामुळे म.बो.चं व्यसनच जडलं.
मी अधून मधून कविता लिहायचो पण पूर्णतः 'अप्रकशित' कवि असल्यामुळे काही दोन-चार दोस्त मंडळींखेरीज माझ्या कवितांना वाचक नव्हता पण मला त्याचं काही वाटायचं नाही. शाळा संपल्यानंतर व्वृत्तं, छंद, गण, मात्रा यांची ओळख सुद्धा बुजली होती. साहित्य-वाचन, अभ्यास, व्यासंग वगैरे करायला वेळही पुरेसा नसायचा. त्यामुळे मी लिहिलेली कविता अगदी आणि फक्त 'माझी'च होती [आणि आहे]. कुणाचा प्रभाव वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता कारण प्रभावाखाली यायला आधी चौफेर वाचन असायला हवं, त्या बाबतीत मी अगदीच कोरडा! क्वचित कधी चार ओळी खरडल्याच तर त्या बहुदा लगेच फाडून फेकून देत असे.

एकदा माझ्या एका परदेश-स्थित मित्र-दांपत्याकडून आलेल्या पत्रांत माझ्या मैत्रीणीने 'घर' ह्या विषयावरची एक 'छान-गोड'शी कविता पाठवली होती. त्या वेळी माझ्या व्यक्तिगत जीवनांत भरपूर अस्वस्थता आलेली होती. त्या पत्रांतल्या कवितेला उत्तर म्हणून मी एक कविता लिहीली. तेंव्हा एका 'महत्वा'च्या आणि अत्यंत रटाळ 'मिटींग' मधे बसलो होतो. माझ्याशेजारी माझी एक सहकारी मैत्रीण बसली होती. असल्या कंटाळवाण्या मिटींगमधे मी मी चक्क 'नोट्स' घेतोय की काय अशी तीला शंका आली म्हणून तीने माझ्या पुढ्यांतल्या कागदांत डोकावून विचारलं," हे काय लिहीतोयस?" माझ्या कवितेचा कागद वाचून ती म्हणाली,"छान आहे!" मी तीला कवितेची जन्मकथा सांगीतली आणि म्हणालो, " मी ही कविता टाईम-पास म्हणून केलीय आता फाडून टाकणार आहे". तीने मला त्यापासून परावृत्त केलं म्हणून मी ती ठेवून दिली पण पत्रोत्तरांत वापरली नाही कारण माझ्या व्यथित 'मूड'चा पत्ता, दूर लंडनमधे रहाणार्‍या मित्रांना मला लागू द्यायचा नव्हता.

पुढे 'घर' ह्याच विषयावर आणखी काही कविता लिहायला मला माझ्या दुसर्‍या एक मैत्रीणीने प्रवृत्त केलं. हाय-कोर्टांत प्रॅक्टीस करणारी एक ज्येष्ट वकील माझी बर्‍यापैकी मैत्रीण असूनही ती कविता करते हे मला माहीतच नव्हतं! तीचा एक काव्य-संग्रहही प्रसिद्ध झाला होता! तीला मी माझी कविता [लाजत-लाजत] वाचायला दिली आणि तीला ती चक्क आवडली! मग गम्मत म्हणून आमचं ठरलं की 'घर' ह्याच विषयावर आम्ही प्रत्येकी एकेक कविता करून एकमेकांना दाखवायची. तीच्या कविता अर्थातच अधिक सफाईदार आणि सुंदर होत्या. [तीच्या दुसर्‍या काव्यसंग्रहांत तीची काही 'घरं' भेटतात!]. माझ्या कविता मात्र आजतागायत अप्रकाशितच राहिल्या आहेत.

मा.बो. वरच्या कविता वाचता-वाचता मलाही एकदा सुरसुरी आली आणि मी माझ्या 'घर' विषयावरच्या काही कविता सुरुवातीला पोस्ट केल्या . त्यावरच्या प्रतिक्रिया चक्क उत्साहवर्धक होत्या! त्यानंतरच्या काळांत मी आणखी बर्‍याच कविता केल्या [घरा नंतरचं मला लागलेली दुसरी काही खूळं म्हणजे 'सावली' आणि 'आकाश'] आणि बहुतेक सर्व मा.बो. वर रतीबासारख्या टाकल्या. अजूनही टाकतो पण हल्ली मी गद्य प्रकारांतच जास्त रमलो आहे.

हळू हळू [जशी माझी भीड चेपली तसं] मी मा.बो. काही चर्चांमधे हिरिरीने भागही घेऊ लागलो. साहित्य, समाज, राजकारण ह्या आणि अशा सगळ्याच विषयांवर आपली बरी-वाईट मतं बिनदिक्कत मांडण्याचा मा.बो. हा एक छान 'फोरम' आहे हे लक्षांत आलं. एकूण काय, मा.बो. ने मला 'वाचता-लिहीता' केलं!

आपली मतं कोणी समर्थपणे खोडून काढली किंवा दुरुस्त केली तर ते हसत-हसत स्वीकारण्याची खिलाडू-वृत्तीही मबोनेच जोपासली. आणखी महत्वाचं म्हणजे मराठींत चुकत-माकत का होईना, पण टायपिंग करण्याची सोय करून दिली, सवय लावली. त्याकरताही मी मा.बो.चा शतशः ऋणी आहे.

मा.बो. मुळे मित्र-संग्रहांत भर पडली हा आणखी एक मोठाच फायदा झाला. काहीजण प्रत्यक्षांतही भेटले! [वैभव जोशी हा एक प्रथितयश कवी त्यांतलाच]. त्यांच्याशी आणि इतरांशीही मा.बो. वर 'गप्पा-टप्पा' किंवा 'सवाल-जवाब' झडतात. 'दोन-दिले, दोन-घेतले' करून खूप बरं वाटतं!

नेहमीच्या वर्तमानपत्रं-मासिकांत न भेटणारे कितीतरी विषय मा.बो.वर सामोरे येतात. विचार करायला भाग पाडतात. आपली 'श्रीमंती' वाढवतात.हे मा.बो.करांचे उपकारच म्हणायला हवेत.

"उद्या काही कारणाने मा.बो. बंद पडलं तर?" हा विचारही करवत नाही.

बापू करन्दिकर

'दोन-दिले, दोन-घेतले' करून खूप बरं वाटतं!>> एकदम मान्य,बापू!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

काय सुंदर काम केलय दीपु तुम्ही !:) मायबोलीवर प्रत्येक जण वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन येत असतो पण प्रत्येकाच्या येण्यामागे एवढी मोठी कहाणी असते हे केवळ हा बीबी वाचल्यावर कळतय. सगळ्यांचे अनुभव वाचताना मीही विचारात गुंतले.

मी इथे नेमकी कधी आले ? २००२ मध्ये मे जून महिन्यात कधीतरी माझ्या ऑफिस मधल्या एका मित्राने याहू मेसेंजर वर मला एक लिंक दिली. कोणत्यातरी बीबी ची. वाचून मला गम्मत वाटली पण त्या गप्पांना उत्स्फूर्तपणे दाद द्यायची तर सभासद नसणं आड आलं. त्यानंतर "रोमात असणं" "बी बी वर जाणं" "मेसेज पोस्टणं" ह्या शब्दरचनांशी ओळख झाली. पण तरीही अनोळखी माणसांना कोणत्याही विषयावर मतं द्यायची भीतिच वाटायची.. 'उगाच कशाला कोणाला दुखवा?' असा विचार मनात यायचा.. जुन्या मायबोलीवर वेगवेगळ्या बीबी वर जाणं समजतही नव्हतं तेव्हा (आताही फार जमतं असं नाही!) पण साधारण अंदाज होता की स्वतःच्या खर्‍या नावाचा आयडी घेत नाहीत. म्हणून माझं आवडतं फूल निवडलं.. सोनचाफा.

आयडी घेतला म्हणून फार वापरला असं नाही. एक दिवस संवाद मध्ये महेश केळुसकरांची मुलाखत ऑफिसला जाण्याच्या तयारीत असताना ऐकली. त्यात त्यांनी त्यांची झिनझिनाट ही कविता म्हटली. अर्धवट कळली बाकी डोक्यावरून गेली. ती पूर्ण वाचावी असा विचार आला.. ऑफिसमध्ये जाऊन मोठ्या प्रयत्नाने महेश केळुसकरांचा बीबी आहे का ते शोधलं आणि आश्चर्य म्हणजे तो मिळालाही. पण त्यावर कविता काही नव्हती.. तिथे असलेल्या चर्चेवरून ती कविता एक मायबोलीकर डॉ. विठ्ठल ठाकुर ह्यांच्याकडे असल्याचं कळलं. मी भयंकर मेसेज पोस्टला तिथल्या तिथे आणि कविता हवी असल्याचं लिहिलं.. तेव्हा ते महिरपी कंसात देव १/२ करत लिहावं लागत होतं. त्या कसरतीत अगणित चुका केल्या शुद्धलेखनाच्या आणि त्याची माझी मलाच लाज वाटली.. पण कुठूनसे अनिलभाई अवतरले आणि 'हळूहळू जमेल सगळं' असा दिलासा देऊन गेले. डॉ ठाकुरांच्या कृपेने कविता मेलबॉक्स मध्ये सुखरूप येऊन पोहोचली. नंतर कुठच्यातरी बीबी वर झक्की हा आयडी पाहिला. मला हा शब्द नवीन असल्याने त्यांना त्याचा अर्थ विचारायची बुद्धी (की दुर्बुद्धी ?) झाली. त्यावर उत्तर आलं की नाही, किंवा आलं असल्यास काय आलं हे आजतागायत माहीत नाही.. कारण एकदा गेले त्या बीबी वर पुन्हा जाणं हे कधीच जमलं नाही. (ह्याच कारणासाठी दुर्बुद्धी म्हटलं हो झक्की.. रागवू नका!)

त्यानंतर ऑफिसमधून अंताक्षरी खेळायला सुरुवात झाली.. आणि माझ्या पोस्ट्सची संख्या कधी नव्हे ते वाढू लागली. देवनागरीत टाइप करण्यावर जम बसला. सिंहगडावरच्या वर्षाविहाराचं कळल्यावर पुणेकराना गाठून तिथे पहिलं जिटिजी पार पडलं.. प्रत्यक्ष भेटलेला पहिला मायबोलीकर म्हणजे दिनेशदा. पक्क्या मुंबईकरासारखे आम्ही दोघे अगदी वेळेवर सारसबागेजवळ हजर झालो आणि नंतर अज्जुका अवतरली. ती दोघं एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याने ते मायबोलीकर आहेत हा अंदाज आल्यावर मी आणि त्यांच्यात संवाद सुरु झाला.. त्यानंतरचं मुळशीचं झालं.. ह्या वर्षी संख्या कमी होती पण क्षिप्रा, अज्जुका, सत्या, डॅफो, आरती ह्या ओळखी पक्क्या झाल्या. सई, क्षिप्रा, मिहीर, आरती, दिनेशदा, वर्षाऋतू, बाँबे व्हायकिंग, जी.एस आणि मी सिंहगड चढून जायचं म्हणून पुन्हा एकदा सिंहगडावर जाऊन रात्र जागवून दुसर्‍या दिवशी पडत-धडपडत खाली पोहोचलो होतो. तिसरं कर्जतचं वर्षाविहार पार पडलं. मिल्या, पूनम, राहुल फाटक, विनय देसाई, भ्रमरविहार, इंद्रा, घारुअण्णा (इतर काही नावं/आयडी विसरले.) अशा नव्या ओळखी झाल्या..

इथल्या लेखनाबद्दल सांगायचं तर कधी कधी महिना दोन महिने देखिल इथे येणं होत नाही. मग संपर्क तुटलेला असतो. संदर्भ बदललेले असतात. नवीन आयडी आलेले असतात. कोण कसा प्रतिसाद देईल ते माहित नसतं.. त्यामुळे कोणत्या चर्चेत भाग घेणं किंवा कुठेही मत मांडणं मी शेवटी टाळतेच. ललित आणि कथा हे वाचनप्रकार रोमत येऊन जमेल तेव्हा वाचते. चित्रकला, छायाचित्र, हस्तकला हेही आवर्जून पहाते.. अर्थात सगळं वाचून कधीच होत नाही. ऑफिसमधून हक्काने काँप्युटर मायबोलीसाठी वापरणं जसं जमतं तसं ते घरून जमत नाही. अशी माझी तक्रार आहे. पण अशी तक्रार घरचा व्यवसाय असणार्‍यांना करून चालत नाही. :((.. माझा नवरा कन्नडिगा असल्याने मराठी तरुण भारत प्रयत्नपूर्वक वाचंण्याशिवाय तो दुसरं काही करत नाही. त्याच्या दॄष्टीने हा 'टाईमपास' असला तरी त्याचा माझ्या मायबोलीवर येण्यावर आक्षेप नाही.. भले तो इथे काहिही वाचत नसला तरी त्याच्या मित्रमैत्रिणींना मायबोलीबद्दल आवर्जून सांगत असतो.. वेळेच्या अभावामुळे फार काही लिहायला होत नाही (फार काही सुचतच नाही आणि येत नाही तर लिहिणार काय डोंबल पण तरीही :p!). .शेवटी कितीही झालं तरी इथे आल्यावाचून चैन पडत नाही हे खरं.

मुंबई सोडल्यापासून तिथले कट्टे दुरावले आहेत.. इथे बेळगावात सीमाप्रश्न अजून वादात आहे तोवर धड मराठी नाही धड कानडी नाही अशा भागात मायबोली हा मला असलेला हक्काचा आधार आहे हे मात्र नक्की.. Happy

मी मायबोलीकर झालो 1 जून, 2002 पासून deepblue या नावाने.. पण काही टारगट 'अगं' अगं' करुन टार्गेट करु लागल्याने.. दीपस्तंभ या नावाने 20 सप्टेंबर, 2004 पासून पूनर्जन्म घेतला.. त्यामुळे घोर अनर्थ टळले..

२००२ साली कोणाचीही सिफारस नसताना मी स्व:ताच मायबोलीवर एखादी उल्का पृथ्वीवर आदळावी तसा आदळलो.. प्रथमदर्शनी काही दर्शनीय न आढळल्याने येणे तसे कमीच होते.. माझी एखाददुसरी लाट मायबोलीच्या दिशेने आक्रमण करायची.. पण वाळूचे काही कण वेचताच तिचा आवेश कमी होत कृष्णामाईपेक्षाही संथ वेगाने वाटचाल व्हायची.. मग हळुहळू सिंहगड रोड, चारोळ्या, V&C, कविता.. इत्यादी विभागात येणेजाणे वाढले.. आणि भरती येऊन लाटांवर लाटा येऊ लागल्या..

दोन वर्षे वविला हजेरी लावली..

सध्या एव्हढं पूरे.. बाकीचे नंतर..

दिप्या... अनेक आशिर्वाद आणि शुभेछा तुला Happy

काहीतरी शोधतांना मायबोली सापडली!
म्हणजे गुलमोहर सापडला.. पुढचे अनेक महिने मायबोली म्हणजे गुल्मोहर इतकेच वाटायचे. त्यातही कविता वाचणे अगदी आवर्जून व्हायचे.

तेव्हाचा मायबोलीचा फॉर्मॅट अर्काईव्ह प्रकारचा होता. त्यामुळे कवितांच्या बीबी वर महिनाभर एकेकाच्या कविता येतच रहायच्या आणि त्यामागे प्रतिक्रियाही. खूपदा एका कवितेला दाद म्हणून दुसरे कुणी कविताच लिहायचे. त्यातली एक आठवण म्हणजे, बेटीने एक अप्रतिम कविता लिहिली होती (तसे तिच्या सगळ्याच कविता अप्रतिम म्हणता येण्यासारख्याच असायच्या) 'यशोधरा' ! सिद्धार्थ गौतमाच्या पत्निचे मनोगत होते त्या कवितेते! त्यावर प्रसाद शिरगावकरची तितकिच अप्रतिम कविता गौतमाचे मनोगत मांडणारी आली होती!

मला सुरवातिला उत्तर देणारा आणि संवाद साधणारा प्राणी म्हणजे 'रसिकयश'! याने पुढे आपले रुपांतर कालांतराने 'येश्वंत' आणि नंतर 'बी' असे करून घेतले. एकाच वेळेला हुशार आणि मूर्ख वाटणार्या या प्राण्याशी तशी दोस्ती आणि दुश्मनीही जमली. पण ती इतपर्यंतच राहीली.
पुढे मीही एकदोन कविता टकल्या पण प्रतिक्रिया शून्य! अर्थातच राग्राग झलाआणि तसे लिहूनही झाले तेव्हा क्षिप्राने समजूत घातली.. मग काही कविता वाचल्यावर आपली कविता अगदीच सुमारआसल्याचा शोध लागला. मग अगदी जिद्दीने प्रयत्न करून थोडे बरे लिहायला लागलो.त्याप्रमाणे प्रतिक्रियाही आल्या आणि सूचनाही! प्रत्येकाचा चांगला उपयोग झाला! (इतका की आता लिहीणेच बंद केले! Happy )

तेव्हा कवितांचा बीबी खरोखरच भरात होता. प्रसाद शिरगांवकर्,बेटी,हेम्स्,शुमा,क्षिप्रा,सखी,ध्रुव आणि इतरही खूप चांगले सातत्याने लिहीत. नाव आठवत नाही पण एका कवयित्रीची 'गुलमोहर' सिरीज खूपच गाजली आणि आवडलीही होती. प्रसाद्चे 'चांदण्यांचे पीक' अगदी भरात होते. तो मायबोलीचा अद्य गझलकार! क्षिप्रा आणि सखी यांच्या संयत आणि थोड्या जुन्या धाटणीच्या (पारंपारीक मराठी कवयित्रिंच्या धाटणीच्या) कविताही खूप आनंद द्यायच्या! पुढे केव्हातरी सिंहगड बीबी वर पोचलो आणि धमाल चालू केली! तिथेच किरु,दीप्स्तंभ्,श्र,लिम्बू,गंधार आणि इतरही ओळखीचे झाले. धमाल यायची तिथेही.! पुढे मला सतावण्यासाठीच किरू आणि एक्दोघांनी 'दक्शा' हा आयडी घेतलाये असे समजून मी त्या आयडीच्या मागे हात धूवून लागायचो. पण मावळसृष्टिच्या वविला दक्शा प्रत्यक्श आलेली पाहून मी अगदी उडालोच होतो. तेव्हपासून मायबोलीवर जपून लिहिण्याचा संकल्प केला.
त्याच वविला प्रथमच प्रसाद मोकाशीला भेटलो. पुढे आमची चांगलीच गट्टी जमली. त्याच्या कविता वाचणे हा एक वेगळाच अनुभव असतो. साहेब सध्या जास्त लिहीत नाहीत पण कधीतरी लिहिलेल्लही जबरी असते.
अश्यात्च पुढे वैभवच्या कविता वाचायला मिळाल्या. त्याने घेतलेली झेप आणि तितकीच मोठी भरारी खूप आनंदित करते. वैभव आणि प्रसादच्या बाबतित सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या कविता वाचतांना एक मत्सर वाटतो की इतके कसे सुंदर लिहू शकतात आणि आपल्याला त्याच्या काही टक्केही नाही सुचत! पण त्यातच त्यांच्याबद्दलचे आणि त्यांच्या लिखाणाबद्दलचे प्रेम आहे हे दोघेही नक्कीच समजू शकतिल.

माय्बोलीमुळे झालेले पण त्याचा मायबओलीवरील लिखाणाशी सुरवातिला काही संबंध नसलेले मित्र म्हणजे दिनेश्,जीएस्,आरति,कूल्,फदी! दिनेशना मामा ठाकूर म्हणून हाक मारतांना मजा येते. गोव्यात असतांना त्यांच्याबरोबर दुचाकीवरून केलेली भटकंती कायम लक्षात राहील अशी असायची. रस्त्यावरच्या झाडापानापासून लता,आशाच्या जुन्या अनोळखी गाण्यापर्यंत त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे एक मेजवानी असते.

पुढे पुण्याला आलयावर जिएस आणि मंडलींसोबत गडव्हेंचरच्या नावाने केलेले दुर्गभ्रमण असेच सोबत राहील. अगदी मागच्याच रवीवारी जाऊन आलो इतका ताजेपणा अजूनही मनात आहे. प्रत्येक रविवारी ट्रेक संपता संपता जीएस ला शिव्या देत पुढच्या वेळेस येणार नाही म्हणत शुक्रवारपासून यावेळि कुठे जायचे म्हणून त्याला भंडावून सोडण्यात आम्ही अगदी तरबेज झालो आहोत.आता पुन्हा केव्हा मुहुर्त लागतो ते पहायचेय! Happy

पूर्वी दर तासाने मायबोलीवर चक्कर असायची.. अन्यथा अगदी चुकल्यासारखे वाटायचे!पण सध्ज्या तसे होत नाही!
मायबोलीचा सध्याचा फॉर्म तितकासा भावत नाही हेही एक आहे.
पण एक मात्र आहे.. मायबोली हा आता जगण्याचा एक भाग झालाये.
जयावीच्या गाण्याची इथे हमखास आठवण होतेय..
"ही माझी मायबोली"!
________________________
-Impossible is often untried.

"ही माझी मायबोली"! Happy अगदी अगदी... मस्तच गाण आहे ते... Happy

(इतका की आता लिहीणेच बंद केले! ) :d

मला ही वेब-साईट १९९७ पासुन माहिती अाहे. त्यावेळी मी जपान मध्ये होतो, मराठी भाषेशी जो काही संपर्क होता तो या वेब-साईटमुळेच होता. खुप बर वाटायच तेंव्हा. कारण मी चक्क एका खेड्यात रहायचो. अाजूबाजूला भारतीय असे कोणीच नव्हते. जवळच्याच एका शहरात, एका मोठ्याशा खेड्यातच, एक पाकिस्तानी रेस्टॉरंट...पण तिथला अाचारी मात्र दिल्लीचा होता, हा एक दुवा सोडला तर अापला देश, लोक, बातम्या काहिच संपर्क नव्हता. त्यावेळी इंटरनेट देखील नुकतच अालेलं होत. मायबोली हा मात्र एक अाधार होता...

शतश: धन्यवाद.

चान्गल लिहिलस रे गिर्‍या! Happy

बाफ चा विषय वाचुन लगेच माझे खाते तपासले, म्हटले बघुया तरी किती वर्षे झाली आपल्याला इथे.. फक्त तीन वर्षे!!!!!!!???????? विश्वासच बसेना.. मला तर वाटतेय गेली कित्येक वर्षे मी इथेच पडीक आहे.

आठवायला गेले तर आठवेना मी नक्की कशी आले इथे ते. अंधुक अंधुक आठवतेय, मी 'सरीवर सरी' हे संदीप खरेचे गाणे ऐकले कुठेतरी आणि मग ते नेटवर शोधायला लागले. हितगुजशी पहिली भेट तेव्हाच झाली. त्याआधी मी मराठीतील वेबसाईट्स फारश्या पाहिलेल्याच नव्हत्या. इथले फाँट्स फारसे चांगले नव्हते, वाचायला थोडा त्रास व्हायचा. पण तरीही इथे रोज येऊ लागले. इतरही मराठी वेबसाईट्स्ची ओळख झाली, पण टिकली ती फक्त हितगुजशीच....सुरवातीला मी मनोगतवर नियमीत असायची, पण मग हळुहळू हितगुजची सवय झाली. आणि मला वाटते हितगुजच्या फॉर्मट्मुळे ह्यावर वावरणे जास्त आवडायला लागले. तेव्हाचा फॉर्मॅट मात्र मला खुप आवडायला. मी तेव्हा मनोगतवरही खुप असायचे. त्या तुलनेत इथला फॉर्मॅट आवडत होता.

ललीत, कथा, फोटो, चित्रकला वगैरे सुरवातीपासुनच आवडीने पाहायचे. कवितांपासुन मात्र मी पहिल्यापासुनच जराशी दुर आहे. कवीचे नाव पाहुन मुड असेल तरच वाचते, अन्यथा नाही.

सुरवातीला मी माझे_मन हे नाव घेतलेले, पण थोड्याच महिन्यात त्याचा पासवर्ड विसरले. अ‍ॅडमिनला लिहिले, त्यांनी नविन पासवर्ड पाठवलाही, पण कसे काय कोण जाणे, त्याने लॉग्-इनच होईना. मग अ‍ॅशबेबी वर आले. इथे आधी बरेच महिने मी रोमातच होते. क्वचितच चुकुन प्रतिक्रिया दिली असेन. मग हळुहळु प्रतिक्रियाही द्यायला लागले. नविन हितगुज सुरू झाल्यावर नमुचा धागा सुरू करणार का म्हणुन विचारले, अ‍ॅडमिननेही लगेच सुरू करुन दिला आणि तिथे बरेच माबोकर ओळखीचे झाले.

एकदा जीएसने ट्रेक साठी सवंगडी मिळणार का म्हणुन विचारले, लगेच संधी साधली आणि आयुष्यातला पहिलावहिला ट्रेक केला (सरसगड - कधीही न विसरला जाणारा ट्रेक). तिथेच गिरी, कुल, आरती, फदी हे सगळे भेटले. महीमंडणगडाला दिनेशही भेटले. त्यांच्याशी तर माबोवर आधीच ओळख झाली होती. तो ट्रेकही अगदी न विसरता येण्याजोगा.

आता तर मला माबोचे व्यसनच जडले आहे. ऑफिसात नेट कनेक्षनचे रेशनींग आहे, आणि मी ते पुरेपुर फक्त माबोसाठी वापरते. इथे आले नाही तर अगदी चुकल्याचुकल्यासारखे वाटते. मी खुप जणांना माबोचा पत्ता देते आणि इथे रोज रोज या असे अगदी आवर्जुन सांगते. मला इथे येऊन जो आनंद मिळतो तो त्यांनाही मिळावा असे मला वाटते.

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

रेशनिन्ग आहे म्हणजे नेमके काय कसे आहे?

म्हणजे स. ११ ते १२, दु. १ ते २ मग ३-४.... असे.

म्हणजे काय होते, आपण मोठ्या हिरिरीने मोठ्ठा प्रतिसाद लिहावा आणि प्रकाशित करा अशी आज्ञा द्यावी की लगेच 'your access level doesnot permit this webpage' अशी मोठ्ठी अक्षरे कॉम्प्युटरने आपल्या तोंडावर फेकावी...... ती इतक्या जोरात लागतात की मग पुढच्या वेळेचा नेट अक्सेस आल्यावर परत तो प्रतिसाद टायपायची हिंमतच निघुन जाते. तरी मी नशिबवान, माझ्या ऑफिसमधल्या काही माबोकरांना ह्याच्यापेक्षा ही कमी वेळ मिळतो....:(

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

मि कान्चन... बरेच दिवस मायबोलिकर आहे... इथले बरेच लेख न चुकता वाचते... त्यामुळे नन्दिनि, दाद, पल्लि अशा अनेक लेख्कन्शि जवलचे नाते असल्यासरखे वाटते....

सर्व लेखन मधुन प्रथम मला हे मिलाळे कि.... मि १ माणुस म्हनुन जास्त भावनाशिल झाले आणि सवेदन्शिल हि... दुखि लेख वचुन पटकन डोळ्यत पानि येते, ... अनु विनोदि वचुन खुप हसु येते कि control होत नाहि... ... थोद्क्यत मि आधिहि emotional होते... पण अता जरा जस्तच आहे...

हेमलकस बद्दल वचुन आता तिथे नक्कि जायाचा ठरवल आहे... अनेकन्चि परदेश वारि ऐकुन आता ते हि मनात ठरवले आहे...

कधि कधि मि लेखाना प्रतिसाद देत नाहि... पण मि ते वाच्लेले अस्तत आणि मनात त्याला भर्भरुन दाद हि दिलेलि असते...

खरच मि मि सग्ळ्य लेख्कन्चि खुप खुप आभारि आहे... इतका उत्क्रुश्त दर्जच लिखाण अम्हाला वाचायचि सन्धि दिल्या बद्दल...

तुम्हा सर्वान तुम्च्या gr8 लेखन पुढे हे बाळबोध वाटेल ... पण मला माझ्या भावना सर्वनपर्यन्त पोचवायच्या त्या...

~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!

२००८ च्या सप्टेंबरमध्ये एक पुण्यातील मित्र लोनावळ्यात भेटला. कुठलीतरी गझल गुणगुणत होता. या आधी कधीही न ऐकलेली ती मराठी गझल आत कुठेतरी स्ट्राईक करुन गेली. त्याला विचारलं कुणाची आहे रे... नवीनच दिसतेय....? तर म्हणाला मायबोली म्हणुन साईट आहे, त्यावर पुलस्ति म्हणुन एक गझलकार आहेत त्यांची आहे. आणि मग पुलस्तिंना वाचण्यासाठी म्हणुन मायबोलीवर आलो. आणि आता मायबोलीचाच झालोय.

***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)

मी पण कविता शोधत शोधत इथे आले. २००४-०५ साली बहुतेक. सहसा न मिळणार्‍या कविता माबो वर मिळतात हे कळल्यावर तर एव्हढी खूश झाले. त्या वेळेस मायबोलीवर फक्त गाणी आणि कविताच असतात असा माझा समज होता. नंतर हळूहळू कळलं मायबोली काय चीज आहे ते. मी सरळ हितगुज उघडून पद्य विभगात जावून कविता वाचायचे, पण नंतर त्या गप्पंमधेहि मला जाम इंटरेस्ट वाटायला लागला. वाटलं, हे लोक आपल्यासारखच बोलतात! आम्ही बहिणी बर्‍याच वाक्यांचा शॉर्टफॉर्म करायचो, : तोमावैप्राआ ( तो माझा वैयक्तीक प्रश्न आहे!) खात्याख चोमचा अशा म्हणी . खूप विचार करुन बोलणारीला "हि काय सोचू आहे " असं म्हणायचो , हे अशा टाइपच बोलणं मला इथे सापडलं .
मला सर्वात आनंद झाला जेव्हा गणपत वाणी कविता सापडली, आधी किती ठिकाणी शोधली, (इथेहि शोधलं होतं) आणि इंदिरा संतांची " रक्ता मधे ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण......" हि कविता.
मग गुलमोहोर दिसलं . मग काय खजिनाच हातात आला. दाद, psg, नंदिनी आणि अजून बर्‍याच जणांच्या कथा वाचल्या, बखर वाचली . एक कॉलनी वर कथामालीका होती कोणाची ते आठवत नाही , कॉलनीतल्या गोष्टी . मस्त होत्या. मिल्याची विडंबनं !!!
मग बर्‍याच गॅप नंतर आले तर मायबोली बदलली होती .नवीन मायबोलीत प्रवेश असं दिसायच. मला तर नुस्त वचायचं होतं मी जुन्याच माय्बोलीत जायचे. मग नवीन मायबोलीत पण फिरता येउ लागलं.. .. अणि शेवटी एक दिवस झालेच सभासद. मराठी कधीच टाइप केलं नव्ह्तं पण केल्यावर वाटलं कि सोप्पय.
( बाsssssस, गाडी स्ट।र्ट केल्यावर थांबताच येत नाहिये. Happy )
मला दीप ने सांगितले तुझे अनुभव इथे लिहि, आधि वाटलं मला इथे कोण ओळखतय? पण अशीच ओळख होईल ना? म्हणून लिहीलं.
धनु

Pages