नवीन किल्ल्याचा शोध!! - मायबोलीकर "हेम" यांचे अभिनंदन!!!!!

Submitted by जिप्सी on 27 May, 2012 - 03:33

प्रसिद्ध गिर्यारोहक राजन महाजन (ठाणे) आणि हेमंत पोखरणकर (नाशिक) यांनी आजवर अज्ञात असलेला लोंझा हा औरंगाबादजवळील किल्ला प्रकाशात आणला आहे.

गुगल सॅटेलाईट नकाशाचे वाचन करीत असताना महाजन, लागवणकर यांना अजिंठा-सातमाळ डोंगरांच्याजवळ सुटावलेल्या भागात गोलाकार डोंगरावर आयाताकृती टाक्या आढळल्या. हा नवीन भाग नजरेत पडल्यावर या दोघांची शोधक नजर जागृत झाली. २० मे रोजी त्यांनी चाळीसगाव- सिल्लोड दरम्यानच्या नागदच्या दिशेने प्रयाण केले. महादेव टाका डोंगररांगांच्या पायथ्याशी चौकशी केल्यानंतर त्यांना पायथ्याशी आश्रम असल्याचे व डोंगरावर महादेवाचे टाक(पाणी साठा) असल्याचे सांगण्यात आले. समुद्रसपाटीपासून सुमारे ४८५ मीटर व पायथ्यापासून सुमारे ८५ मीटर उंचीवर हे टाक आहेत. अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील या सुटावलेल्या डोंगरावर खोदीव पायऱ्या, जोत्याचे दगड, नक्षीकाम, कोरीव काम न केलेली लेणी आढळून आली. प्रशस्त गुहा, तेथे शिवलिंग, गुहा टोके, कोरीव खांब, एवढय़ा उंचीवर पाण्याची सुविधा, नागद बाजूस खोदीव पायऱ्या, देवीची मूर्ती, जोत्यांचे अवशेष, पीराचे स्थान, टाक्यांचा समूह, कोसळलेली तटबंदी हे ऐतिहासिक अवशेष पाहून गिर्यारोहक आनंदित झाले.
(लोकसत्ता)

आजच्या "लोकसत्ता" वृत्तपत्रातील हि बातमी:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229...

हार्दिक अभिनंदन हेम

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आयला, जबरदस्त......सहीच रे हेमू.....
अरे यार सर्व भटक्यांनी खरोखर तिथे भेट देऊन हा क्षण साजरा केला पाहीजे. नविन किल्ल्ला शोधून काढणे ही खूपच मोलाची आणि दुर्मिळ घटना आहे.
खूप खूप अभिनंदन

हेमंत आणि राजन दोघांचही मनःपूर्वक अभिनंदन! आणि जिप्सी आम्हाला इथे कळवल्याबद्दल खूप धन्यवाद!

ही बातमी कालच वाचली होती पण मायबोलीकरांचा यात सहभाग आहे हे वाचुन आनंद वाटला.
हेमंत आणि राजन.. तुमचे अभिनंदन.

इतक्क्क्क्क्क्क्क्या शुभेच्छा !!! आम्ही दोघेही खूप खूप आभारी आहोत! .. दोघांच्याही घरातील सर्व मंडळी उन्हाळी सुट्टीनिमित्त गांवी असल्याने, या धाग्यामुळे घरातील लोकांच्या शुभेच्छा मिळाल्याची भावना आहे. जिप्सिचे खूप आभार..!!
ही सकाळ मधील बातमी.. अधिक तपशीलासह..!!

http://epaper.esakal.com/Sakal/27May2012/Normal/Mumbai/page2.htm

Pages