तुम्हाला आवडलेलं लेखन, मायबोलीबाहेरच्या मित्रमंडळींना सांगायची सोय.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवरचं आवडलेलं लेखन, मायबोलीकर वेगवेगळ्या पद्धतीने मित्रमंडळीना कळवत असतातच. आता ते थोडं सोपं झालंय. प्रत्येक लेखनाखाली आता फेसबुक आणि गुगलवर टिचकीसरशी आवडलेलं लेखन कळवायची आणि अगोदर किती लोकांना ते आवडलंय ते पहायची सुविधा उपलब्ध आहे.

या सुविधेसाठी मायबोलीवर प्रवेश करायची (लॉगीन) गरज नाही. त्यामुळे जे मायबोलीकर नाहीत किंवा वाचनमात्र आहेत त्यांनाही लेखन आवडले तर कळवता येईल. फेसबुकावर किंवा गुगल मधे मात्र प्रवेश करावा लागेल.

मायबोलीवरच्या इतर सुविधांप्रमाणे याही सुविधेचा तुम्ही लाभ घ्यावा आणि मायबोलीकरांचं तुम्हाला आवडलेलं लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी असं आवाहन तुम्हा सर्वांना करतोय.

त्यामुळे आता नुसतं प्रतिसादात "माझं पण प्लस १" किंवा "अगदी सुपर लाईक" न म्हणता प्रत्यक्षातच ते करता येईल. आणि तुम्ही स्वतःच ते लेखन केलं असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची आणखी एक संधी तुम्हाला उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

गुगल प्लस तात्पुरते बंद करावे लागले आहे. गुगलच्या नियमांनुसार फक्त सभासदांना दिसेल अशा कुठल्याही पानावर गुगल प्लस लावता येत नाही. सुरुवातीला ते सरसकट सगळीकडे लावले होते. ते फक्त सार्वजनिक पानावर दिसेल असे केले की परत सुरु करता येईल.

अ‍ॅडमिन, इथे लाइक केल्यावर माझ्या फेसबुक पेजवरही त्याची नोंद दिसायला हवी ना? मला दिसली नाही. आणखी कोणी हे तपासून पाहिले आहे का?

नोंद दिसते. मी बर्‍याचदा तपासून पाहिले आहे. तुमचे पान कुठले याची लिंक दिलीत तर तपासून पाहता येईल.

गुगल प्लस वर सांगायची सोय पुन्हा सुरु झाली आहे. तुम्ही एका टिचकीसरशी तुमचे लेखन तिथेही इतरांना कळवू शकता.

मायबोलीचे गुगल प्लस पानही आता तयार आहे. तुम्ही गुगल प्लस वर असाल तर तिथेही मायबोलीचे चाहते होऊ शकता.
http://plus.google.com/+maayboli

Pages