ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न?

Submitted by सावली on 13 May, 2012 - 15:44

आता जुलैमधे ऑलिंपिक चालु होईल. त्याची उत्साहात वाट बघणे चालु आहे. त्या निमित्ताने बरेच दिवस डोक्यात असलेले दोन प्रश्न.


स्विमिंग, जिमनॅस्टीक अशा खेळांमधे अगदी लहानपणापासुनच मुलं उतरली तर ती योग्य वेळेत ऑलिंपिक पर्यंत पोहोचु शकतात. म्हणजे ऑलिंपिक मधे खेळणे हा मुलांचा निर्णय असतो की नसतो? कि पालकच मुलांच्या पाठी लागतात. त्यात एखाद्याला असाधारण गती असेल तो विजेता पदापर्यंत पोहोचतो.
ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात ? मुलं बघतात का पालकच?

२.
दुसरे म्हणजे भारतात मुलं ऑलिंपिकमधे जावी म्हणुन कोण प्रयत्न करते? एखाद्या गावात रहाणार्‍या मुलीला पोहोण्यात गती असेल तरीही ती ऑलिंपिकच्या स्पर्धेपर्यंत पोहोचणे दुरापास्तच. मला वाटतं इतर देशात प्राथमिक शाळेत मुलांचा कल लक्षात येऊन शिक्षकांकडुन प्रयत्न होतात. जसे २०१६ ऑलिंपिक साठी तोक्यो कँडीडेट सिटी होते तेव्हा मुद्दाम सर्व डेकेअर मधे पोस्टर लावली होती. शिक्षक मुलांना खेळ दाखवुन, तेव्हाच्या ऑलिंपिकमधले जपानी विजेते दाखवुन प्रोत्साहित करत होते. एकुण तेव्हाचे वातावरण पाहुन मला वाटायचे कि आता ४/६ वर्षाची असलेली मुलं २०१६ मधे ऑलिंपिक साठी स्पर्धक म्हणुन जावी ( किमान त्यांनी तशी तयारी करावी ) अशा प्रकारचे हे प्रयत्न असावेत.
पण भारतात यासाठी काय होते? एखाद्या खेळात विषेश प्राविण्य असलेल्या मुलांची निवड कशी होते आणि ते कसे पुढे जातात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

म्हणजे ऑलिंपिक मधे खेळणे हा मुलांचा निर्णय असतो की नसतो? कि पालकच मुलांच्या पाठी लागतात. >>>> मला स्वत:ला अनुभव काहीच नाही. पण जेव्हड्या खेळाडूंची चरित्र/आत्मचरित्र वाचली आहेत त्यावरून तरी एखादा खेळ खळणे, त्या खेळात उच्च स्थानापर्यंत पोहोचणे, त्यातच करियर करणे हे त्या खेळाडूंच्या पालकांचेच निर्णय असतात. आपल्या पाल्यातले योग्य ते गुण वेळीच हेरून त्याला खतपाणी घालण्याचं काम ज्यांना जमलं त्यांची मुलं विजेते खेळाडू झाले. एकदा सुरुवात करून दिली की मग ती मुलं आपपली पुढे गेली पण सुरुवात करून देण्याचं काम नक्की पालकांचच होतं.

ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात ? मुलं बघतात का पालकच? >>>> भारतात तरी हे स्वप्न फार कमी जणम बघत असतील असं वाटतं... एकंदरीत ऑलिंपिकबद्दल भारतात तरी फारच अनास्था आहे असं गेल्या काही दिवसांत जाणवलं..

टोक्योतल्या डेकेअरबद्दल वाचून छान वाटलं.

भारतातले माहित नाही (कलमाड्याला माहित असेल) पण चीनमधे अगदी शालेय वयातच जर एखाद्या मूलाने /
मुलीने एखाद्या खेळात खास गति दाखवली, तर त्याचे शालेय शिक्षण बाजूला ठेवून त्याला पूर्ण वेळ त्या
खेळाकडे लक्ष देता येईल अशी सरकारी योजना, असल्याचे वाचले होते.

अगदी थेट नाही, पण यू ट्यूबवर सिक्रेट्स ऑफ सेक्स असा माहितीपट आहे (लहान मुलांना बघण्यासारखा नाही.) त्यात बोटांच्या लांबीच्या गुणोत्तरावरुन, कुठली व्यक्ती खेळाडु म्हणून विशेष कामगिरी करु शकेल,
याचे आडाखे दाखवलेले आहेत. अश्या चाचणीतूनच खेळाडूंची निवड व्हावी, असे काहिसे सूचवले आहे.

दिनेश.. चीनमधल्या बर्‍याच अघोरी गोष्टीही वाचनात आल्या होत्या.. खेळाकडे लक्ष देणं ठिक आहे. पण तिथे इच्छा असो वा नसो उचलून मुलांना त्या खेळाच्या कॅम्पमध्ये पाठवून देतात.. आई वडिलांच्या इच्छा वगैरे कोणी विचारत नाही.. असेच कॅम्प करून त्यांना २००८ च्या ऑलिंपिकमध्ये सगळ्यात जास्त पदक मिळाली होती.

पराग धन्यवाद.
ऑलिंपिकबद्दल भारतात तरी फारच अनास्था आहे>> हो असे वाटते. १०० पेक्षा कमी दिवस राहुनही फारसे काही बोलले जात नाहीये त्याबद्दल.
दिनेशदा, चीन च्या कॅम्प्स प्रकाराबद्दल मी ही कुठेतरी वाचलेलं. पण फारशी माहिती नाही.

हो पराग, तेच तर. जास्तीत जास्त पदके मिळवायचीच, अशी योजना होती ती.
आजकाल सर्वच खेळ प्रकारांसाठी कसे शरीर असावे, याचे अगदी अनुभवातून ठरलेले ठोकताळे आहेत.
तसे शरीर, तसा आहार, तसा सराव करुन उत्तम कामगिरी करता येते.

पारंपारीक कौशल्ये (जसा रशिया जिमनॅस्टीक मधे, केनया चालण्या / धावण्यात ) आता जरा मागे पडल्यासारखी
वाटताहेत.

१०० पेक्षा कमी दिवस राहुनही फारसे काही बोलले जात नाहीये त्याबद्दल. >>> अगदी ! हल्ली मी ऑफिसमध्ये आमच्या टीमला इमेल्स पाठवतो ऑलिंपिकची अगदी बेसिक माहिती सांगणारे.. हे हार्डली काही जण पूर्ण वाचतात.. कितीतरी जणांना ह्यावर्षी ऑलिंपिक आहे हे ही माहिती नव्हते ! सगळे खेळ अर्थातच प्रत्येक जण फॉलो करत नाही पण एव्हड्या मोठ्या क्रिडास्पर्धेबद्दल निदान थोडीफार तरी माहिती असावी असं मला वाटतं..

आपल्याकडे दरदिवशी हातातोंडाशी गाठ असलेली कुटुंबांची संख्या प्रचंड आहे.. त्यामुळे एक ठराविक वय झालं की जास्तीत जास्त शिकून लवकरात लवकर नोकरीला लागून पैसे घरात आणणे... किंवा त्याच वयात डायरेक्ट काही तरी काम करून पैसे कमावणे हे बरेच जण करतात.. असे असताना खेळ ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळतच नाही.. शाळांमधे सुद्धा खेळाचे प्रमाण फारच कमी आहे... आठवड्यातून दोन तास खेळासाठी दिलेला असतो... अर्थात काही मुलं आहेत जी खेळातच करियर करतात... पण संख्या फार कमी आहे.. आणि सध्याचा दर्जा बघता आधी निदान आशियाई खेळांसाठी पात्र ठरणे हाच निकष धरून चालले पाहिजे..
आणि आपल्या सरकारी विभागातले महान अधिकारी ह्यांच्या बद्दल तर काही न बोललेलेच बरे.. वय वर्ष ८० झाले तरी आपले पद सोडायचे नाही.. काहीही बदल करायचे नाहीत.. पैसे देताना काया खळखळ करायची असे असल्यावर खेळाडू तरी कसे तयार होणार...
कित्येक खेळात स्पॉन्सरशिप साठी खेळाडूंनाच झगडावे लागते... सराव करायचा की लोकांकडे पैसे मागत फिरावे ह्यातच अडकतात..
ज्वाला गुट्टा जी बॅडमिंटनसाठी दोन गटात ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे तिला पण स्पॉन्सरशिप साठी पळापळ करावी लागते आहे.. तिथेही क्रीडा मंत्रालयाकडून गम्मत चालुच आहे...

सहारानी काही खेळ सपोर्ट करायचे ठरविले आहे.. त्यामुळे निदान ते खेळ तरी सध्या बर्‍या अवस्थेत आहे...

आणि क्रिकेटचा अतिरेक... ह्याबद्दल न बोललेलेच चांगले....

चीन आता २०२०च्या ऑलिंपिक्सची तयारी करीत असेल. तिथे अन्य गोष्टींप्रमाणे मुले ही राष्ट्रीय संपत्ती आणि त्यांच्याबाबतचे निर्णय सरकारच्या हाती असल्याने चीनचे दाखले नकोत.

भारतात असे प्रयत्न बहुतेक खाजगी क्षेत्रातच होतात. सायना,सानिया, अनेक मुष्टियोद्धे हे स्वतःहूनच खाजगी प्रशिक्षणकेंद्रांत गेलेत.

काही राज्यांमध्ये स्पोर्ट्स हॉस्टेल्स आहेत.

तीरंदाजीसारख्या खेळात आदिवासींमध्ये असलेल्या उपजत कौशल्याचा लाभ घेण्यासाठी साईने योजना चालवल्याचे ऐकले. निवडक खेळाडूंना लष्कराकसून प्रशिक्षण देण्याच्या योजनेबद्दल ऐकले आहे.

आंतरशालेय स्पर्धांमधूनही उगवते खळाडू हेरण्याचे काम होते.

ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात ? मुलं बघतात का पालकच?>>>>सावली, मला वाटतं की सुरुवात तरी एखाद्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये अडकवण्यापासून होत असावी. मुलांना त्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये रुची वाटली आणि त्या खेळात ते प्रगती करत असतील तर या प्रश्नाची सुरुवात होत असावी.

एक उदाहरण देते. माझी पुतणी आहे १२ वर्षांची. जिम्नॅस्टीक्स करते ती, चांगली गती आहे त्यात तिला. बर्‍याचशा स्पर्धांमधून पदकं मिळवली आहेत तिने. तिच्या आईवडिलांनी तिला कशात तरी गुंतवायचं म्हणून सुरुवात केली असेल. आता जसजशी ती त्यात प्रगती करतेय त्यावरून आता यात पुढे जाऊन मोठमोठ्या स्पर्धांमधून भाग घेऊन ऑलिंपिकचं स्वप्नंही ती बघेल असा अंदाज आहे माझा, अर्थात व्यवस्थित प्रशिक्षण वै मिळालं तिला तरच शक्य आहे हे.

आपल्याकडे दरदिवशी हातातोंडाशी गाठ असलेली कुटुंबांची संख्या प्रचंड आहे.. त्यामुळे एक ठराविक वय झालं की जास्तीत जास्त शिकून लवकरात लवकर नोकरीला लागून पैसे घरात आणणे... किंवा त्याच वयात डायरेक्ट काही तरी काम करून पैसे कमावणे हे बरेच जण करतात.. असे असताना खेळ ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळतच नाही >>> खेळातही करियर होऊ शकते याची जाणिव इथे नाहीये. ती करुन द्यायला हवी.

शाळांमधे सुद्धा खेळाचे प्रमाण फारच कमी आहे... आठवड्यातून दोन तास खेळासाठी दिलेला असतो>> आम्ही मुलांना खेळायला न नेता अभ्यास घेतो हे सांगणार्‍या शाळाही आहेत असे ऐकले आहे Sad

सायना,सानिया, अनेक मुष्टियोद्धे हे स्वतःहूनच खाजगी प्रशिक्षणकेंद्रांत गेलेत.>> हे त्यांच्या पालकांनी ठरवले होते की त्यांना स्वतः रस होता याबद्दल वाचायला आवडेल.

आंतरशालेय स्पर्धांमधूनही उगवते खळाडू हेरण्याचे काम होते.>> कोण हेरते? आणि पुढे कसे फॉलोअप करतात?

आडो , चांगले उदाहरण. तुझी पुतणी नक्की अशा आंतरराष्ट्रिय खेळात जाईल यासाठी शुभेच्छा. Happy
ऑलिंपिक जिमनॅस्टीक मधे उतरायचे असेल तर मला वाटते तीने आताच तयारी करायला हवी या खेळात लहानपणीच उतरता येतो फार मोठेपणी नाही.

सावली, तिचा दिवस भरगच्च असतो. सुट्टीतही ती यातच बिझी असते, शिवाय कुठे कुठे (मुंबई-पुणे) स्पर्धा असल्या की तिथे जातेच ती भाग घ्यायला.

<<खेळातही करियर होऊ शकते याची जाणिव इथे नाहीये. ती करुन द्यायला हवी. >>
खेळाच्या कोणत्याही प्रकारात एवढी स्पर्धा आणि अनिश्चितता आहे, की आर्थिकद्रुष्ट्या भक्कम असणारेच खेळासाठी एवढी वर्षे आणि पैसा घालू शकतात. अन्यथा ऐन शिक्षणाची वर्षे आणि उमेद खेळासाठी दिली आणि त्यानंतर जिथे पोहोचायचे होते, तिथे नाही जाऊ शकले, तर 'घर का ना घाट का' अशी परिस्थिती येण्याची शक्यता जास्त. ह्या आणि अशा काही समस्यांमुळे खेळाकडे पूर्ण वेळ करीयर म्हणुन बघणे शक्य होत नाही असे मला वाटते.

आडो, तुझ्या पुतणीला खूप खूप शुभेच्छा... २०१६ आणि २०२० ह्या ऑलिम्पिकसाठी तिला चान्सेस आहेत... आत्तापासूनच प्रयत्न करायला पाहिजेत... जिमनॅस्टीक हा प्रकार प्रचंड डिमांडींग आहे ... आणि शरीर एका ठराविक वयापर्यंतच पूर्ण लवचिक असते.. चीन, रशिया, अमेरिका वगैरे देशांचे ऑलिम्पिकच्या मुलींचे वर बघितले की लक्षात येईल.. १६ ते २२ वगैरे मधे असतात सगळ्या...

सावली... जाणीव करुन द्यायलाच पाहिजे.. पण त्याला पाहिजे तेव्हढा सपोर्ट बाकिच्यांकडून पण मिळाला पाहिजे..

सानिया बद्दल तीच्या मुलाखतीमध्ये ऐकलेले सांगते. तीच्या आईने ध्यास घेतला होता. तीच्या पालकांना त्यांच्या मुलांना खेळाची आवड निर्माण करायची होती. तीच्या आईने तीच्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र हेरून ठेवले होते. तीला तीथे घ्यावे अशी त्यांची फार इच्छा होती. सानियाचे वय लहान होते म्हणून प्रॉब्लेम येत होता. पण त्यांनी परस्यु करून तीच्यासाठी चांगले प्रशिक्षक निवडले.

इतक्या लहान मुलांना आपल्याला हे खूप छान येतेय, हेच करायचेय हे कळत असेल असे वाटत नाही. त्यामुळे रत्नपारखी गुरू आणि काळजावर दगड ठेवून मुलांना ट्रेनिंगच्या चरकात घालणारे आईवडील असा योग जुळून आला तरच क्रीडारत्ने घडत असतील.
सचिनचा लहानपणचा दिनक्रम एखाद्या कंपनीच्या सीइओपेक्षा जास्त भरगच्च, धावपळीचा होता.
सानियाने स्वतः टेनिस निवडले असे वाचल्याचे आठवते. "“My mother took me to a coach, who initially refused to coach me because I was too small,” said Mirza. “After a month, he called my parents to say he’d never seen a player that good at such a young age""

सायना आधी कराटे शिकत होती. बॅडमिंटन कोणी निवडले ते कळले नाही.
http://saina-nehwal.blogspot.in/2008/06/biography_22.html

काही खेळ जरा समज आल्यावर निवडले जातात , ते खेळाडू स्वतःहून निवडत असावेत. जसे मुष्टियोद्धे, शूटिंग. काही भारतीय शूटर्सना एनसीसी करताना आपल्याला शूटिंग आवडतेय, जमतेय असा शोध लागला.

नुसतेच ऑलंपिक कशाला साध्या राज्यस्तरीय आणि नॅशनल स्पर्धांसाठी जाताना त्रास होतात. स्पर्धांच्या खर्चाचा खेळाडूचा पुर्ण भार पालकांना घ्यावा लागतो. (बर्‍याच खेळांमध्ये) अकोमडेशन तर इतके वाईट असतात की पालकांना आपल्या दहा अकरा वर्शांच्या मुलांना पाठवायची भिती वाटावी. तरीपण पालक पाठवतात. हे त्यांचे कौतुक. खेळातील पॉलिटिक्सच तर आणखिनच वेगळे.

घरात काही उदाहरणे आहेत नॅशनल लेव्हलला खेळणार्‍यांची. शेवटी दहावी झाल्यावर खेळ कि शिक्षण हा विचार आला तेव्हा घरच्या व्यक्तिंनी या खेळात काय करीअर होणार? असा प्रश्ण विचारुन बंद केले ते. खरतर त्यांनीच खेळाला प्रोत्साहन दिले होते. पण आठ नऊ वर्शात पाहिली परीस्थिती काय आहे. भारतात खेळात करीअर म्हणजे बरीच अनस्टॅबिलीटी आहे, असं एकंदरीत दिसून आले.

हे माहिती सात, आठ वर्षांपुर्वीची आहे आता त्यात बदल घडले असतील तर उत्तमच.

स्वाती, अगदी सहमत
माझ्या मित्राची जुळी मूले ( मुलगा व मुलगी ) राज्य पातळीवर जिमनॅस्टीक्स खेळत असत. त्यांची
होणारी गैरसोय मी स्वतः बघितलीय.

आता मुलगी डॉक्टर झालीय आणि मुलगा एम. बी. ए.

ह्या आणि अशा काही समस्यांमुळे खेळाकडे पूर्ण वेळ करीयर म्हणुन बघणे शक्य होत नाही>>> मान्यच आहे. पण आर्थिकदृष्ट्या सबळ लोकही कुठे खेळात फारसे आहेत असे वाटते.
पण स्वाती म्हणाली तसे अकोमडेशन , सोयी इ. भागही असेल.
खेळातील पॉलिटिक्सच >> हे सगळ्याच देशात असेल ना?, फक्त आपल्याच नव्हे.

इतक्या लहान मुलांना आपल्याला हे खूप छान येतेय, हेच करायचेय हे कळत असेल असे वाटत नाही. त्यामुळे रत्नपारखी गुरू आणि काळजावर दगड ठेवून मुलांना ट्रेनिंगच्या चरकात घालणारे आईवडील असा योग जुळून आला तरच क्रीडारत्ने घडत असतील.>>> Happy

सानिया बद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद.

स्वाती अनुमोदन..
national level BAdminton खेळणारी एक गुणी मुलगी आपल्या आई बाबांना आपल्यावर खर्च झेपत नाही म्हणून खेळ सोड्लेली पाहिलेय...

ओपन वाचलं तर आन्द्रे अग्गास्सिला अजिबात टेनिस आवडत नसताना त्याच्या बाबाने हिट्लर शाहीने त्याच्याकडून दिवसाला अमुक बॉल्स मारलेच पाहिजेत इ. पद्धतीने लहानपणापासून ते करवून घेतल....

आपल्याकडे खेळासाठी कोचिंग ही पैशाची तयारी सगळ्याच पालकांची कशी असणार? शालेय पातळीवरही असं काही सुविधा म्हणून आहे असं वाट्त नाही..

ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात ? मुलं बघतात का पालकच?>>> सावली, पालकांपेकक्षाही प्रशिक्षक आणि संघटना ही स्वप्न बघतात आणि पालकांना दाखवतात. आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थी खेळाडूंमधून योग्य रत्नं हुडकून त्यांना पैलू पाडण्याचं काम त्या करतात. पण संघटना/ प्रशिक्षकांपर्यंत मुलांना, त्यांचा कल/ आवड जाणून घेऊन पोचवणे हे पालकांचेच काम असते.

जिम्नॅस्टिक्सचं उदाहरण घ्यायचं तर ऑलिंपिकमधे या खेळामधे भाग घेणार्‍या महिला खेळाडू साधारण दहा ते बारा वर्षांपासूनच्या पाहिलेल्या आहेत. तर पुरुष खेळाडू वय साधारण पंधरा ते सोळा वर्षांपासून पुढे..
आपल्याकडे या वयातील मुली साधारण जिल्हा पातळीवर खेळत असतात. कोणी एखादा/ एखादी असाधारण देशपातळीवर चमकला तर त्याच्यावर मेहनत घेण्याची तयारी आपल्याकडील संघटना दाखवतात, पण पुरस्कर्ते मिळेपर्यंत त्यांच्या नाकीनऊ येते. आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे लालफितीचा कारभार.
तरीही, आपल्याकडे खेळाबद्दलचा दृष्टीकोन बदलत आहे. अजून दहा वर्षांनी आशादायक चित्र बघायला मिळावं अशी इच्छा आहे.

ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात ? मुलं बघतात का पालकच?>>>>

माझी मुलगी ११ वर्षांची आहे. तिला international level athlet व्हायची इछा आहे. आणि आम्हा दोघांचा तिला पूर्ण पाठिंबा आहे.

खरं बघता तिला ते किती जमेल ह्याबद्दल मी साशंक आहे. पण अर्थात मी तिला कधी असे दर्शवले नाही.

बर्‍याच महिन्यानी हा धागा वर काढतेय...

माझा मुलगा (९ वर्षे) गेले १ वर्ष बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतोय. त्याला ह्या खेळात भयंकर इंटरेस्ट आहे. दुसर्‍या कोणत्याही खेळाचा तो सध्या विचारही करत नाही, आणि पहातही नाही. पण......
हे शटलचे वेड जरा जास्तीच होतेय का अशी भिती वाटतेय. शाळेत जाण्याची वेळ सोडून बा़की अभ्यास वगेरे काहीच होत नाहिए त्याचे. शाळाही खूप वेळ आहे त्याची. आठवड्याचे सगळे दिवस तो बॅडमिंटन खेळतो (आम्हाला काही कारणाने सोडायला नाही जमले तरच त्याचे बुडते. आम्ही असे शक्यतो होऊ देत नाही).
हे आहे असेच चालू द्यावे कि, 'खेळ वेड' कमी करावे असा प्रश्न पडला आहे.
आम्हाला त्याने खेळात करीअर केले तरी चालेल, पण आत्तापासून अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन खेळावरच फोकस करु दिले, तर पुढे त्याला अवघड जाईल का? हे सगळे कसे बॅलन्स करावे?

प्रश्न दुसरीकडे हलवायचा असल्यास कृपया धाग्याचे नाव सांगा.

>>शाळाही खूप वेळ आहे त्याची.>> म्हणजे किती ते किती? त्याचे रोजचे टाईम टेबल काय आहे? लिहिले नसेल तर लिहून काढा. कारण वेळेचे व्यवस्थित आयोजन केले तर शाळा, अभ्यास, खेळ, विश्रांती याचे गणित बसवता येइल. अगदी सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत प्रत्येक अ‍ॅक्टिविटीला टाईम स्टॅम्प लावायचा. त्याच्या कोचशी बोलून रोज किती सराव अपेक्षित आहे ते बघा. शाळेला आठवड्याची सुट्टी असते तेव्हाचे त्याचे टाईमटेबल काय आहे तेही लिहा. आत्तापासून अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन खेळावरच फोकस असा विचार करु नका. कुठल्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवायचे तर शिस्तबद्ध प्रयत्न आवश्यक आहेत. खेळात प्राविण्य मिळवायचे म्हणून बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष असे केल्याने त्याला कदाचित चुकीचा संदेश मिळेल. अभ्यासाबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत ते ही लिहून काढा. नुसती टक्केवारी विचारात घेणार की भाषा, गणित हे मूळ बिल्डिंग ब्लॉक्स पक्के हवेत बाकी घोकंपट्टीचे विषयात कमी तयारी चालेल तेही ठरवा. त्याबद्दल शिक्षकांशी बोला. अतिसरावाने बर्न आउट होणे, शारीरिक इजा या गोष्टींचाही विचार करा. त्याबाबत पेडीशी बोलून घ्या. मुलाच्या लॉन्ग टर्म सक्सेससाठी शिक्षक, कोच, डॉक , पालक सगळे एका पेजवर हवेत. मुलाला त्याचे स्वतःचे मिशन स्टेटमेंट तयार करु दे. - 'मला ही गोष्ट हवी आहे आणि त्यासाठी मी या गोष्टी करणार आहे. ' या टाइपचे. म्हणजे त्यालाही फोकस करणे सोपे जाईल.

तुमच्या मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात छान यश मिळो. Happy

स्वाती, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
शाळा सकाळी ८ ते २:३० आहे. तो सकाळी ७:३० ते दुपारी ३ बाहेर असतो. संध्याकाळि ५ ते ६:३० कोचींग असते.
त्यानंतर तो दमलेला असतो, आणि जेमतेम शाळेचा अभ्यास काही असेल तर करुन झोपतो.

अश्विनी, ९ वर्षाच्या मुलासाठी रोजचा होमवर्क एवढा अभ्यास पुरेसा आहे. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी त्या त्या आठवड्यात काय शिकवले त्याची थोडी उजळणी करावी. एखादा भाग कच्चा असेल तर करुन घ्यावा. काही होमवर्क कोचिंगला जाण्याआधी पुरे करता आले तर दमुन घरी आल्यावर जास्त ताण पडणार नाही.