शरद पवार यांच्यावर हल्ला

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2011 - 03:48

आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.

हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!

१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण

२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.

३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)

४. त्या शीख तरुणाला काबूत आणणार्‍यांपैकी एक जण किंचित हासत होता आणि इतर जण जरा कॅज्युअलच वाटत होते.

याच तरुणाने पुर्वीही एका मंत्र्यावर असाच हल्ला केला होता.

वरील चार मुद्यांबाबत आपल्याला काय वाटते? धक्कादायक प्रकार म्हणून धागा काढावासा वाटला. असा धागा चुकीचा असल्यास अप्रकाशित करेन.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या धाग्याने शंभरी गाठावी म्हणून बेफींनीच आपल्या एका आयडीद्वारे हा हल्ला घडवून आणल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय...

एका ज्येष्ठ नेत्याला अशा प्रकारे मारहाण करुन विरोध करणं हे नक्कीच चुकीच आहे,विरोधक, मराठी माणुस तर याच कधीच समर्थन करणार नाही, पण त्याचवेळी या आणि इतर सत्ताधार्‍यांकडुन सामान्य माणसाच्या,शेतकर्‍यांच्या,सामान्य कामगारांच्या भावना ज्या प्रकारे पायदळी तुडवल्या जात आहेत,त्यांना त्यांच्या किमान भावासाठी रस्त्यावर येण्यास भाग पाडल जात आहे, महागाईचे भयानक चटके बसत आहेत,त्यांच्या कडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे, त्याचा विस्फोट होणं अगदी स्वाभाविक आहे, हे जर असच चालु राहिल तर यापुढे असे शेकडो हल्ले अनेक सत्ताधर्‍यांवर होतील हे नक्की,कारण परिस्थिती तशीच आहे.
अनेकदा सरकारमधल्या मंत्र्यांनी दाखवुन दिल आहे कि त्यांना जनतेच्या मनात जे खदखदत आहे,जो असंतोष आहे, त्याची त्यांना काहीही फिकीर नाही, ते मग अशांना राजकाराणाच्या चष्म्यातुन बघतात्,रंग देऊन मोकळे होतात,हेही भयानक आहे.त्यामुळे मुळ प्रश्न बाजुलाच राहतो, दुर्लक्षित राहतो,यातुन मग त्यांच शोषण,उलट आपल्या प्राथमिक हक्कासाठी लढणार्‍या अशा सर्व घटकांवर बेदरकारपणे पोलीसांकडुन अन्याय केला जातो आहे, मारहाण केली जाते, त्यात एखादा जर विरोधी पक्षाचा आमदाराला बेदरकारपणे मारहाण केली जाते. उदा.सप्टे.२००७ मध्ये शिरोळ,जि.कोल्हापुर येथे एका विरोधी आमदाराला अमानुषपणे पोलीसांनी मारहाण केली,पुढे काहीही झालं नाही, सत्ताधार्‍यांनी साधा निषेध देखील केला नाही,चोकशी,कारवाई तर दुरच,मग ही माणसे नव्हेत का ? यांना केलेली मारहाणीच त्यावेळी यां मंत्र्यांना काहीच कसं वाटल नाही ? शेवटी ज्याच जळतं त्यालाच कळतं, हे सुत्र इथे लागु पडेल.

शपचं काय कुणावरही असा हल्ला होउ नये. निषेध!!
वर त्याने काहीही साध्य होत नाही उलट इतर महत्वाच्या गोष्टींवरचं लक्ष अशा बातम्यांवर केंद्रित होतं. काल आव्हाड म्हणे ठरवलं तर एका दिवसात महाराष्ट्रात चक्का जाम करु, साहेबांनी आदेश दिलाय म्हणुन काही करत नाही आहोत. हे तर सरळसरळ पक्षाची ताकत दाखवण्यासारखं झालं. वर काल दिवसभरात सर्व महत्वाच्या राजकीय पक्षातले महत्वाचे नेते येउन श.प. ना भेटुन गेले.जे आजवरच्या कोणत्याही अशा प्रकारच्या हल्यांच्या बाबतीत झालेले नाही. शपंचे सगळीकडे मित्र आहेत याचा पुरावा.
बाकी अण्णाचं मौनव्रत असतं तेच बरं असतं.. मागे त्यांच्याच टीमपैकी एकाने म्हटल्याप्रमाणे टीम अण्णांनी 'उच्चारसंहिता' बनवुन ती पाळण्याची गरज आहे. कुठे काय बोलावे ते कळत नसेल तर बोलु नये. Sad

प्रचार माध्यमं सांगताहेत त्याप्रमाणे तो हरमिंदर खरंच मानसिक रुग्ण आहे का?

आपल्या धाग्याने शंभरी गाठावी म्हणून बेफींनीच आपल्या एका आयडीद्वारे हा हल्ला घडवून आणल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय...>> बघु

एका नेत्याला मारल म्हणून एवढी चर्चा.पण एखाद्या सामान्यासाठी ही होईल का?
मारणे सपूंर्ण पणे चुकच आहे. पण मार्ग न सापडल्यामुळे म्हणा किंवा एकंदर सगळ्या
परिस्थितीने गांजल्यामुळे म्हणा त्याच्या हातून हे घडल असाव बहुदा,ह्या सर्व परिस्थितीला
खरच कारणी भुत कोण?

पण त्यांनी आणि त्यांच्या कन्येनीच सांगितलंय की विसरून जा आणि पुढे कामाला लागा.

अहो अस्सं कस्सं!! अजून तर कितीतरी पोष्टी लिहायच्या आहेत आम्हाला. शिवाय या घटनेचा फायदा घेऊन अजून बरेचसे पैसे बर्‍याच लोकांना करायचे असतील. माझ्या मते शरद पवारांच्या पक्षाला हवे तेव्हढे पैसे यातून मिळाल्याखेरीज हे प्रकरण संपणार नाही.

शिवाय सचिनचे शतक झाले नाही! मग करायचे काय? त्याचे शतक झाले असते तर लोक शरद पवार का पाटील का कोण तो त्याला विसरले असते!

आणि याची चर्चा करायची नाही तर काय लोककल्याणाचा विचार करायचा, की देशाच्या संरक्षणाचा?? भलतंच काही तरी!!

आता बदला म्हणून कुणा महाराष्ट्रीयाने चक्क लोकसभेतच जाऊन हाणा कुणा शीख मंत्र्याला!! कुठे गेले ते थेट विधानसभेत रस्त्यावरच्या गुंडासारखे मार्‍यामार्‍या करणारे महाराष्ट्रीय जनतेचे थोर नेते??

"आव्वाज नही क्या! हमने एकहि मारा पर .... " असे मराठीत सांगायचे मग.

उपोषणाची फॅशन गेलेली दिसते आहे, आता थप्पड मारणे हा नवीन खेळ.
यालाच भारतातील राजकारण म्हणतात.

काल आव्हाड म्हणे ठरवलं तर एका दिवसात महाराष्ट्रात चक्का जाम करु, साहेबांनी आदेश दिलाय म्हणुन काही करत नाही
>>
वा वा, म्हणजे जे करण्यासाठी लोकांनी निवडून देऊन नेता बनवले आहे, त्याच्या बरोब्बर उलट करणार!
धन्य ते पुढारी आणि त्यांना निवडून देणारी जनता.

बेफींनीच आपल्या एका आयडीद्वारे हा हल्ला घडवून आणल्याचं वृत्त नुकतंच हाती आलंय...
----- त्यांचे किती आय डी आहेत?

झक्की काका

अमेरिकेतलं ऑक्युपाय संपलं कि नाही अजून ? आणि जॉर्ज बुशचं इराकवर हल्ले करण्याचं कारण खोटं निघालं म्हणून झडलेले वाद शिळे झालेत वाटतं ?

करा करा.. आमच्या देशातल्या मूर्ख जनतेवर बोचरी टीका करा Proud पण ती आम्हाला समजली पाहीजे हो ! आम्हाला वाटतंय तुम्ही आमचा गौरवच करताय..

बाकि काय म्हणतेय अमेरिका ? सबकुछ आलबेल ना ?

आव्हाड ना? राष्ट्रवादी ना? मग बरोबर.
कुठूनका होईना, अगदी अण्णान्च्या निमित्ते देखिल, विषय "बामणान्वर" घसरवलाच पाहिजे हे यान्चे सूत्र अण्णान्ना नथुराम म्हणताना पाळलय कसोशीने!

बोम्बलायला तिकडे वर नथुराम देखिल वैतागला असेल या तुलनेने अन इकडे राळेगण मधे अण्णाही! Proud
या धाग्यावरल्या पहिल्या पानावरील माझ्या पोस्ट मधिल हे वाक्य>>>>
वर "महाराष्ट्रीय" हा शब्द मुद्दामच कंसात लिहीला, कारण नुस्ते आम्ही महाराष्ट्रीय म्हणून उपयोग नाहीये हो. कारण यांच्या पक्षाचे महाराष्ट्रीयपण केवळ अन केवळ, याला नैतर त्याला हाताशी धरुन, येनेकेनप्रकारेण "बामणे" झोडपण्यात वाया चालले आहे. <<<<<
यातिल बामणे झोडपण्याचे तथ्य इतक्या लगेचच, अन याच घटनेत हे सिद्ध करतील असे वाटले नव्हते मला Proud Wink

हा हल्ला महाराष्त्रात एखाद्या बामणाने केला असता तर ?

असो. अण्णांची बदनामी करायचा प्रयत्न करुन राष्त्रवादीने स्वत:ला विनाकारण अण्णांच्या विरुद्ध उभे केले आहे जे आतापर्य्त फक्त कौग्रेस विरुद्ध होते.

इथे ज्यांनी ह्या हल्याचा आणी अण्णांच्या बोलण्याचा निषेध केला आहे त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे - शरदरावांना तोंडात मारले हे कळले तेव्हा पहिली गोष्ट काय डोक्यात आली होती ?

शरद पवारांच्या मुस्काडात हाणल्यानतंर, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवर शरद पवारांची प्रतिक्रीया पुढील प्रमाणे :-

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावरील हल्ल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेबाबत शरद पवार म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत परखड भाषेत प्रतिक्रिया दिली. त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया मी वृत्तपत्रामध्ये वाचली. मी व्यक्तिश: शिवसेनाप्रमुखांचा आणि महाराष्ट्राचा अंत:करणापासून आभारी आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते एकत्र आल्यामुळे देशासमोर महाराष्ट्राची वेगळी प्रतिमा दिसली. संसदेतही या हल्ल्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी राजकीय मतभेद असतानाही सर्व नेते एकत्र आल्याचे चांगले चित्र दिसले.’

सामना.....

कुणाला तरी मुस्काडात बसली, खासदाराना भत्ते किती असावेत, पेन्शन किती असावी... असल्या मुद्द्यावर सगळे पक्ष एक होतातच.. त्याचा जनतेला काय फायदा?

बाकि काय म्हणतेय अमेरिका ? सबकुछ आलबेल ना ?
अमेरिकेची कुणाला पडली आहे? भारताबद्दल जे प्रेम, आस्था आहे, ते अमेरिकेबद्दल नाही! भारतावर टीका असली, तरी मला जे खरे वाटते ते मनापासून लिहीतो. अमेरिका काही खड्ड्यात जात नाही, जरा चैन कमी होईल इतकेच! पण इथून भारतातली वाईटच बाजू दिसते हो, कुणि चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्नच करत नाही!!

तुम्ही भारताची चांगली बाजू असा एक बाफ सुरु करा
तीन चारदा प्रयत्न केला, प्रतिसाद मिळत नाही. भारतातले भारतीय माझी टिंगल करतात त्याबद्दल!! मग मी पण त्याना, त्यांच्या राजकारणाला, त्यांच्या इथे मांडलेल्या विचारांना जाम शिव्या देतो. अजून कुणि माझे काय चुकले आहे ते सिद्ध केले नाही, फक्त 'आमच्यावर टीका करू नका!'

आणि मी कधी टीका न करता लिहीले तर तिकडे कुणि लक्ष देत नाहीत, फक्त घाण कुठे ते शोधत हिंडत असतात!! तेव्हढेच लक्षात ठेवतात! मग घ्या ना, खूप घाण आहे इथे माझ्याजवळ!!

नि नाही करणार? कुणीहि यावे नि भारतीयांना लाथा घालाव्या असेच दिसते तुम्हा सर्वांच्या लिखाणातून! मग मी पण माझ्यातली वाईट मळमळ इथे ओततो! नाहीतर दुसरे कोण माझे ऐकून घेणार?

आता संशोधनक्षेत्रातील माबोकर वाचले, बरे वाटले.

माबोवरचे ठाकरे !!
छे: छे: ते केव्हढे थोर, मी काहीच नाही.
अहो लोक जमवून राडा करणे जमणार आहे का मला? पैसे खाऊन एन्रॉन बाबतीत नव्हत्याचे होते करणे जमणार आहे का मला? म्हणजे पैसे खाल्ले हे वाईट असे मी म्हणत नाही, त्यालाहि काहीतरी अक्कल, धैर्य लागते. ते माझ्यात नाही, नि म्हणून भारतात माझा निभाव लागणार नाही, म्हणून मी येत नाही तिकडे एव्हढेच.

त्यांचे नातेवाईक राज! महाथोर!! चक्क विधानसभेत गुंडगिरी घडवून आणली! विधानसभेत असे काही करत नाही इतर सभ्य देशात. भारतात काय सगळेच चालते म्हणा. चांगले का वाईट हा प्रश्नच नाही. मला काही जमणार नाही, त्यांना जमते, ते थोर.
मी नुसता नावे ठेवत बसतो! अगदी क्षुद्र वृत्ती हो. पण आहे ना तशी वृत्ती, मग ती घालवता येत नाही तोपर्यंत इतरांना त्रास होईल. मला वाईट वाटते, पण दुसरे काही सुचतच नाही इथे.

हटकेश्वर, हटकेश्वर!!

FB वर आणि समस वर फिरत असलेला एक उखाणा....

शरद पवारांच्या सौ ने घेतलेला उखाणा
घोटाळे करून करून कमावले मोठे घबाड. नवरा माझा लबाड......
शरद रावांचे नाव घेते.....हरविंदरने फोडले त्यांचे थोबाड...............

असा एखादा उखाणा आदरणिय नेते स्वर्गीय प्रमोद महाजन ( माझ्या मते पंतप्रधानपदाचे लायक उमेदवार) यांच्या हत्येबद्दलही फिरत असेल तर इथंच द्या ना प्लीज..

माझ्या पतीने खाल्ले पैसे , दिले दीरास कसे बसे
अंबानीचे... वगैरे वगैरे

किमान अटलजींच्या गुडघेदुखीवर तरी ( ते फक्त अविवाहीत आहेत.. ब्रह्मचारी नव्हे असं त्यांनी म्हटलंच आहे. तेव्हा कुणीतरी उखाणा घेऊ शकेलच Wink )

मानसिक संतुलन ढळल्यामुळे माझ्या हातुन चुक झाली असे कारण सांगुन जामिन मिळवला असे वाचल्याचे आठवते. त्याच्याकडे शस्त्र नव्हते आणि मानसिक संतुलन कारण ग्राह्य धरुन कदाचित त्याची शिक्षा सौम्य (साधी कैद) करतील असे वाटते. पवारांनी पण हे प्रकरण खुप ताणले नाही.

आपल्या कामगिरीने, हरविंदर पासुन अण्णा हजारें पर्यंत अनेकांचं मानसिक संतुलन बिघडवण्यास कारणीभुत म्हणुन पवांरांवर कारवाइ करता येईल कां? Happy

>>एका माजी मंत्र्याला मारणारा माणूस परत दुसर्‍या आजी मंत्र्याजवळ पोहोचतोच कसा<<

मलाही हे कोडे उलगडलेले नाही. ही बाब संशय येण्याजोगी आहे, आठच दिवस आधी सुखराम वर हल्ला करणार्‍या या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. सुरक्षाव्यवस्थेला हा माणूस तेथे आलेला पाहून काही करावे असे कसे वाटले नाहि?पवारांच्या विरोधकांना हे सर्व घडून यावे असे वाटत होते किंवा हे नाटक घडवून आणले गेले असे कोणाला वाटले तर त्यात चूक नाही.
सुरक्षा यंत्रणा पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत जर खरोखरच गलथान राहात असतील तर तुमचे आमचे कसले संरक्षण होणार?

>>एका माजी मंत्र्याला मारणारा माणूस परत दुसर्‍या आजी मंत्र्याजवळ पोहोचतोच कसा<<
------ तो व्यावसायिक थप्पड-मारणारा होता. कॅमेर्‍यासाठी थप्पड, तुम्ही पैसे दिले आहेत म्हणुन तुम्हाला लागणार नाही याची काळजी घेतली जाईल, विरोधकांनी पैसे दिले असतील तर पैशाच्या प्रमाणात फटक्याचा जोर असेल... आता बाहेर सुटला असेल तर त्याचे पुढचे टारगेट कोण असेल?

पोलिसांनी त्याला वेळीच आवर का नाही घातला, कॅमेरासमोर किती वेळ बोलत होता. त्यामुळे तो सर्व स्टेज शो होता असे वाटते... अर्थात अण्णांना त्याची जबर किंमत चुकवावी लागली... (येक ही मारा या त्यांच्या प्रतिक्रिये मुळे).

Pages