बटाट्याची भाजी - एक पद्धत

Submitted by लोला on 9 May, 2012 - 09:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ मध्यम बटाटे. उकडून, साले काढून फोडी केलेले किंवा न उकडता काचर्‍या.
१ पातीचा कांदा, पातीसह. कांदा फार मोठा नको. पात कोवळी असावी. कांद्यासह बारीक चिरुन घ्यावी.
१ चमचा वाटलेले/किसलेले आले.
१ हिरवी मिरची बारीक चिरुन.
मोहरी, जिरे, बडिशेप - प्रत्येकी १ लहान चमचा. (२ चमचे पंच फोडण चालेल. मेथी-कलौंजी पण येईल, हरकत नाही.)
१ चमचा धणे - खरंगटून. अगदी पूड नको.
अर्धा चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा साखर
१-२ चमचे तेल
१ चमचा लिंबाचा रस.
मीठ
थोडी कोथिंबीर चिरुन.

क्रमवार पाककृती: 

पसरट भांड्यात किंवा पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे.
हिंग घालावा.
मोहरी-जिरे-बडिशेप (किंवा पंच फोडण) आणि धणे फोडणीत घालावे.
आले, मिरच्या, हळद घालावी.
आले-मिरच्या थोड्या परतून घ्याव्या.
मग पात आणि कांदा घालून नीट परतावे. पात चांगली परतली गेली पाहिजे.
मग बटाट्याच्या फोडी, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून वाफ काढावी.
काचर्‍या असतील तर वाफेवर शिजवाव्यात.
वरुन कोथिंबीर घालून वाढावी.

bbhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

पातीच्या कांद्याऐवजी ताजी मेथी, कसुरी मेथी, सुका पुदिना, शेपू यातले काहीही चालेल.

ही पद्धत 'नेहमीचीच, वेगळी, नवीन, सोप्पी, यम्मी, नो खस्ता, खस्ता' की कशी ते तुम्ही ठरवा.

माहितीचा स्रोत: 
मी. उकडून ठेवलेले बटाटे आणि नुसतेच खाल्ल्यामुळे एकच उरलेला पातीचा कांदा यातून हे तयार झाले.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ( बाकी काही विशेषणे लावत नाही ) Wink नक्की करुन बघणार.
तुझ्या सगळ्या रेसिपीजचे फोटो प्रोफेशनल कुकबुक्समध्ये असतात तसे असतात. छान वाटतं बघायला Happy

मस्तच! करून बघणार. दोश्यामध्ये घालायला पण चांगलीये.
तुझ्या सगळ्या रेसिपीजचे फोटो प्रोफेशनल कुकबुक्समध्ये असतात तसे असतात. छान वाटतं बघायला >> +१

दोश्यामध्ये घालायला पण चांगलीये. >> मला पण हेच वाटलं एकदम Happy
सोपी, लहान मुलांना आवडणारी हे लावले विशेषणं

मस्त वेगळी,सोप्पी ,यम्मी..........रेसिपी Happy
दोश्याचे पीठ तयार आहे, आजच करेन ही भाजी.

>> तुझ्या सगळ्या रेसिपीजचे फोटो प्रोफेशनल कुकबुक्समध्ये असतात तसे असतात. छान वाटतं बघायला
+१

धन्यवाद.
कधीतरी करुन खाऊन पण बघा. Wink

अमामी, बघा लावून. पण ही कोरडी भाजी आहे, तेव्हा भाजून कोरडीच वाटा.

बिनधास्त प्रयोग करायचे हो. काही वाईट लागत नाही. खाणेबल तरी होईलच, फुकट जाणार नाही. फारच आवडले तर पुन्हा केले जाईल.

जरा स्ट्राँग फ्लेवर असलेली कुठलीही हिरवी पाने चालतील पातीऐवजी. लसणीची पात, थाई बेसिल, ऑरेन्ज-मिन्ट बेसिल, थाईम, टॅरॅगॉन, ओव्याची पाने इ.

मस्त दिसतेय...
Pihu च वाचून आठवल माझ्या फ्रिजमध्येपण डोसा पीठ आहे. Happy विसरून गेले होते डोसा पीठ. धन्यवाद Pihu.
डोसाबरोबर ही भाजी लवकरच करावी लागेल.

मस्त! बडिशेपा ने आणि कांदा पातीने चव वेगळी येईल. नेहमीची तीच तीच भाजी खाउन कंटाळा येतो. तेव्हा ही जरा वेगळी भाजी पुरी बरोबर छान लागेल.