निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ वा भाग सुरू होऊन ६२ पोस्ट्स झाल्यासुद्धा! जागू आणि सर्व निसर्गप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन!
सगळ्यांचे फोटो सुंदर....

जागू, आम्हीपण बाळाच्या Wink (बुलबुलाच्या गं) बारशाला येणार हं!

आणि कोलाजमधे हा ऋतू जाणवतोय अगदी!!..... सुरेख!

अरे बापरे दिनेदा एवड्या वार्‍या ,
आम्ही त बापा देश सोडलाच नाही,
महाराष्ट्र ही पुरा पालथा घातला नाही

Proud

सेम हिअर.. दिनेशच्या रंगीबेरंगीवर बरीच माहिती आहे त्यांच्या मिडलइस्ट वास्तव्याची. पण बाकीच्या ठिकाणची माहितीही हवीच हवी.

नितीन, पांढ-या फुलांचा फोटो एकदम मस्त. ही फुले खरेतर किती दुर्लक्षित पण फोटोत काय गोड दिसतात. गोल्डन ड्युरांटा इतके गोड असेल असे कधी वाटलेच नाही. बिचारे कायम दुर्लक्षित..

ते एक गाणे आहे ना..

एक फुलले फुल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले.....

साधना, फुलांइतकीच गोड कविता!!
बाय द वे.. ही कविता कुणाची आहे? की चारोळी आहे? पूर्ण कविता असेल तर दे ना....

माबो चिरागातला जिनी झालाय शांकलीजी यहा सब मिलता है Happy
http://www.maayboli.com/node/23135 ( जिप्सी)

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले

मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना, मुळीच त्याला नटुनथटुनी लाजणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणासी मोहिले

त्या कुणाला काय ठावे, या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला, वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली, दुरुन त्याची पाऊले

एक दुसरे फूल त्याने, खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले, भाव अगदी आतले
करपली वेडी अबोली, दुःख देठी राहिले

स्वर - आशा भोसले
गीत - ग. दि. माडगूळकर

ईन मीन किती धन्यवाद देऊ तुला?.....
गदिमांचे शब्द आणि आशाबाईंचा स्वरसाज म्हणजे ....तूर्तास उपमा सुचत नाहीये...
तुला आणि जिप्सीला खूप खूप धन्यवाद!!

नमस्कार !
जागू आणि सर्व निसर्गप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन !

७ व्या भागातले मिसलेली (२७ ते ३५) पाने संपवुनच (नियमानुसार) इकडे हजर झालो ..
निदान या भागात तरी माझा एखादा फोटो दिसेल अशी अपेक्षा करतो ..

आज सकाळी सफरचंद धुऊन घेतलं, देठ काढायला गेलो तर त्या जवळ एक निमुळता सोंडेसारखा वाढलेला भाग दिसला,गणेशाचा चेहराच भासला, नंतर इथे कळालं आज संकष्टी आहे.

अनिल तूझा फोटो ? आवडेल आम्हाला.

शांकली, eprasaran.com वर या आठवड्यात मातृदिनानिमित्त उत्तम गाणी ऐकवली जात आहेत.
अवश्य ऐका. ही साईट दर आठवड्याला दर्जेदार कार्यक्रम सादर करते आणि आपल्या सोयीनुसार ते ऐकता
येतात.

दिनेशदा, जरूर ऐकू आम्ही.

मी आत्ता हा भाग सगळा नीट वाचला. दिनेशदा, तुम्हाला असलेल्या माहितीच्या एक कणभरही मला माहिती नाहीये. कित्येक वनस्पती, फुलं मी पुस्तकात बघून सांगते...तुम्ही जितकं जग, माणसं अनुभवलं आहे त्याच्या लक्षांशानीसुद्धा मी अनुभवलेलं नाही. अहो, कोकणातसुद्धा मी आत्ता गेल्या नोव्हेंबरात गेले! इतका माझा प्रवास!...

साधना, मुंबईत महोगनीची खूप झाडं आहेत. माझ्या अंदाजाने हा उंचच उंच आणि घेरदार असा (एकमेव नाही म्हणता येणार) पण अशा आकृतीबंधाची जी काही कमी झाडं आहेत त्यांपैकी एक आहे. याची पानं अगदी हिरवीगार असतात. किंचित बाकदार असतात. आणि मुख्यशिरेच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा किंचित कमी असते.

काल एकांकडे त्यांची बाग बघायला गेले होते. खूपच वेगवेगळी आणि सहसा पटकन बघायला न मिळणारी काही झाडं आहेत त्यांच्याकडे. हे त्यातलंच एक.... लँग लँग (Ylang Ylang) असं गमतीशीर नाव असलेलं हे फूल त्यांनी तोडून दिलं. याचं बोटॅनिकल नाव आहे Cananga odorata

1 249.jpg1 248.jpg

सुप्रभात निसर्गप्रेमी मित्र्-मैत्रिणिनो ! आज सकाळचा पहिला चहा तुम्हा सर्वांसोबत !
ईनमीनतीन वरील कविता उत्तमच आहे!

काल एकांकडे त्यांची बाग बघायला गेले होते. खूपच वेगवेगळी आणि सहसा पटकन बघायला न मिळणारी काही झाडं आहेत त्यांच्याकडे. >>>>> या मंडळींच्या घरात न बसता बागेतच बसलो होतो - जंपींग ग्रासचे भले मोठे लॉन व भरपूर झाडे. बागेत जाम व तुतीची झाडेही होती -तिथे गेल्यापासून आम्ही जाम व तुतीवर ताव मारला अगदी - ती मंडळीही - कोणी खायलाच नाही हो हे म्हणून आग्रहाने ते देत होती - तुतीच्या झाडाखालील जमिन काळी झाली होती पार.. तुतीचा सडा पडून पडून...... ती बाकीच्या झाडांची नावे वगैरे शांकली (अंजू) देईलच..... फारच देखणी बाग व बागेच्या मालकाच्या जिभेवर सर्व झाडांची बोटॅनिकल नावे - त्यामुळे माझी पूर्ण पंचाईत व शांकली अगदी खूष... (माझिया जातीचे मज भेटो कोणी .... या न्यायाने..)

आह्ह्ह्हा!!! आठवा भाग... जागु सुर्रेख कोलाज!!
खूप खूप सुंदर फुलं ,झाडं पाहायला मिळतायेत, रंजक माहिती वाचायला मिळतीये...
हे सर्व इथे शेअर करणार्‍यांच कौतुक आणी धन्यवाद !! Happy
प्रत्यक्ष डोळ्याने निसर्गदृष्ये मनसोक्त टिपून झाल्यावर ,आपल्या कॅमेर्‍याच्या डोळ्यात जमतील तितकी/तशी दृष्ये पकडून त्या ठिकाणी कधीच किंवा कमी जायची शक्यता असणार्‍यांना दाखवून ,वर्चुअल समाधान मिळवून देण्यात फोटोग्राफर्स चा सिंहाचा वाटा आहे,ही गोष्ट नाकारून कशी चालेल बरं..

शांकली, हेच ते फूल. बी च्या फोटोतले.
खुपच सुंदर गंध असतो याचा,

--------------------

काल मी मेन ऑफ रॉक्स हा माहितीपट बघत होतो त्यावेळी काही आठवणी ताज्या झाल्या.

आपण अनेकदा दगडाचे वेगवेग़ळ्या रंगाचे थर एकमेकांवर बसलेले बघतो. क्वचित दगडात एक बारीक पट्टी
वेगळ्या रंगाची दिसते.
आम्ही जागू कडे गेलो होतो त्यावेळी समुद्रकिनार्‍यावर काही दगड असे दिसले कि त्याच्या आतमधे छोटे
पांढरे स्फटीक होते. ते मी मामीच्या लेकीला, हिरे म्हणून गोळा करायला लावले होते.

ज्यावेळी खडक बराच काळ थंड होत राहतो त्यावेळी स्फटीकांना निर्माण होण्यास बराच अवधी मिळतो पण ज्यावेळी खडक (लाव्हा) लवकर थंड होतात त्यावेळी असे स्फटीक तयार न होता, एकसंध खडक दिसतो.

खडकात दिसणारे रंग मात्र त्यात असणारी खनिजे ठरवतात (क्वचित खडकाच्या आत शैवाल देखील असते.)
महाराष्ट्रातील मोठमोठे खडक आणि कडे पाहताना ते साधारण एकाच रंगाचे दिसतात (त्यापेक्षा वेगळे कुठे
दिसले असतील तर जिप्सी, सेनापती सांगतीलच) घाटात सुरुंगासाठी केलेले खोल खोदकाम दिसते पण तो
आतला भाग देखील एकसंधच दिसतो (कात्रज घाटातही दिसते.)

त्यामूळे ते एकसंधच निर्माण झाले असावेत पण मला कोल्हापूर ते बेळगाव मार्गावर, हायवेच्या लगत जे डोंगर कापून काढले आहेत त्यात अनेक रंगाचे पट्टे दिसले (बेळगावला जाताना आपल्या डाव्या बाजूला. जिथे डोंगरावर पवनचक्क्या आहेत तिथे)
हे पट्टे फारसे रुंद नाहीत पण संख्येने बरेच आहेत. त्या भागातून बस फार वेगात जात असल्याने फोटो
नाही काढता येत आणि हायवेच असल्याने थांबताही येत नाही.

तर वरच्या क्लिप मधे बघितल्याप्रमाणे हा प्रत्येक थर तयार व्हायला किमान हजारो वर्षे जातात. म्हणजे
मातीचा एक थर आधी बसला, त्यावर दाब पडून त्याचा खडक बनला, मग त्यावर दुसरा थर.
हे थर बहुतांशी जमिनीला समांतर आहेत. (काही ठिकाणी ते ऊभे देखील असतात, त्या ठिकाणी आडव्या
रेषेत भूगर्भाच्या हालचाली झालेल्या असतात. )

या प्रत्येक थरातील घटकाचा अभ्यास केल्यास त्या काळात तिथे वातावरण कसे होते, कुठले प्राणी व वनस्पति
होते, याचे आडाखे बांधता येतात.

बेळगाव रस्त्यावरच्या या भागाचा तसा अभ्यास झाला आहे का, हे मी वाचले नाही. तिथे असे थरावर थर बसायला पूर आले असण्याची पण शक्यता आहे. पण सध्या तोच भाग उंचावर असल्याने, तिथे आणखी कुठून पाणी आले असेल ?

तर कुणी या रस्त्याने जाणार असेल तर या भागाकडे नक्की लक्ष द्या आणि कुठे काही वाचायला मिळाले तर
अवश्य कळवा, इथेच.

सुप्रभात

आज मी घरातच आहे त्यामुळे दुपारी नि.ग. वर नसेन. कुठेतरी निसर्गात किंवा नर्सरीत चक्कर मारण्याचा प्लॅन आहे.

घाटात सुरुंगासाठी केलेले खोल खोदकाम दिसते पण तो आतला भाग देखील एकसंधच दिसतो (कात्रज घाटातही दिसते.)>>>> इथे (कात्रजला) आता सगळा डोंगरच फोडायला सुरुवात झालीये - घरे, गोडाउन्स, कारखाने आणि काय काय ......... त्यामुळे बघवत नाहीये जाता - येताना.... सगळेच एकमेकांना सामील - कोणाला दाद मागणार आणि कोण दाद लागू देतंय........

शांकली, हेच ते फूल. बी च्या फोटोतले.

येस मीही हेच लिहायला आले होते. मागे हिरवा चाफा नेटवर शोधत होते तेव्हा हेच सापडलेले. हे बहुतेक कॉस्मेटिक्स मध्ये वापरतात. मी लॅक्मेमध्ये होते तेव्हा कुठल्यातरी सौदर्यप्रसाधनाच्या रेसिपीमध्ये मला हे नाव सापडलेले.

शशांक, सगळ्याचेच सपाटीकरण होतय.

सौंदर्य स्पर्धेतल्या सर्व मुली एका साच्यातल्या, ऑलिंपिक मधले एका खेळातले सर्व खेळाडू एका साच्यातले,
जगातले सर्व मॅकडोनाल्ड एका साच्याचे..... विविधता मिटवायचा चंग बांधलाय मानवाने.

फॉन थ्यूनन थिअरी ऑफ सिटी एक्स्पांशन प्रमाणे शहरांचा विकास वर्तूळाकार होतो. गेल्या काही वर्षात पुण्याने
कोथरुड, पाषाण गिळंकृत केले. कात्रजच्या डोंगराने ती दिशा अडवली होती, ती मोकळी होतेय.

मुंबईच्या चारी बाजूने समुद्र असल्याने, मुंबई पनवेलच्या दिशेने वाढतेय.

आता सगळा डोंगरच फोडायला सुरुवात झालीये - घरे, गोडाउन्स, कारखाने आणि काय काय ......... त्यामुळे बघवत नाहीये जाता - येताना.... सगळेच एकमेकांना सामील - कोणाला दाद मागणार आणि कोण दाद लागू देतंय........

इथेही तेच. जुईनगर स्टेशनच्या बाहेर एक दुर्लक्षित तळे होते. त्यात शिंगाडे लागत अणि भय्या मंडळी ते काढताना मी पाहिलेय. गेले ते तळे गेल्या आठवड्यात. माणसांना गाड्या चालवायला जागा नाही म्हणुन झाडे, तळी, झाडांवरचे पक्षी आपले बळी देताहेत. जुईनगर स्टेशनच्या बाहेर सर्विस रोड आहे तिथे अर्धा किलोमिटरच्या रस्त्यावर गच्च दुतर्फा सोनमोहोराची झाडे आहेत. रस्त्यावर कायम सावली आणि थंडावा. तो रस्ताही जर पुढेमागे झाडांसकट गडपला तर मी खरेच जोरात रडेन.

Pages